सातारा : रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी साताऱ्यात निघालेल्या मोर्चाला खासदार उदयनराजे भोसलेंनी उपस्थिती लावली. उदयनराजे अचानक मोर्चात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

रामोशी समाजासाठी आयुष्य ओवाळून टाकू, असं म्हणत उदयनराजेंनी रामोशी समाजाच्या मागण्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर रामोशी समाजाने भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा साताऱ्यातील एसटी स्टँडपासून सुरू झाला. या मोर्चामुळे साताऱ्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती, तर काही ठिकाणची वाहतूक अन्य रस्यावरुन वळवण्यात आली होती.

रामोशी समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असून आजपर्यंत त्या त्या वेळच्या शासनाने फसवल्याचं रामोशी सामाजाचे म्हणणं आहे.

रामोशी समाजाच्या कोणत्या मागण्या आहेत?

  • आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक  यांची शासकीय कार्यालयात छायाचित्र लावून दरवर्षी जयंती साजरी करावी.

  • धनदांडग्यांनी तसेच शासनाने ताब्यात घेतलेल्या इनाम अ, बच्या वतनी जमीन रामोशी समाजास परत कराव्यात.

  • बेरड, रामोशी व त्यांच्या तत्सम जातींचा समावेश अनुसुचित जातीमध्ये करावा.

  • आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच राष्ट्रीय स्मारक उभ करण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात यावी.