समाजामुळे तुम्ही, तुमच्यामुळे समाज नाही, उदयनराजेंचा पवारांना इशारा
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 07 Sep 2016 02:57 PM (IST)
पुणे : खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना घरचा आहेर दिला आहे. तुमच्यामुळे समाज नाही, समाजामुळे तुम्ही आहात हे लक्षात ठेवा, असं म्हणत भोसलेंनी निशाणा साधला आहे. तुमच्यामुळे समाज नाही, समाजामुळे तुम्ही आहात, समाज कधी पायाखाली घेईल सांगता येत नाही, असा इशारा उदयनराजे यांनी पवारांना दिला आहे. अॅट्रोसिटीच्या मुद्द्यावरुन भोसलेंचं पवारांशी दुमत होतं.