पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं योग्य नाही, असं मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. उदयनराजे पुण्यातील कात्रज परिसरात होत असलेल्या 'शिवसृष्टी'ची पाहणी करण्यासाठी गेले होते.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात शिवसृष्टीचं काम सुरु आहे. 'सध्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. या शिवसृष्टीला सरकार मदत करत आहे. पण सर्वांनी या शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज आहे.' असं उदयनराजे म्हणाले.

Udayanraje | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर उदयनराजे म्हणतात.. | अहमदनगर




शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांचं काम खूप मोठं आहे. जेम्स लेनला शिक्षा झाली पाहिजे. राज्य सरकार बांधणार असलेल्या स्मारकाचं काम कुठपर्यंत आलं माहिती नाही, पण शिवस्मारक झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली.
कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला तेव्हा भिडे गुरुजी तिथे नव्हतेच, उदयनराजे भोसलेंचा खुलासा

छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मागच्या जन्मी माझ्याकडून थोडं पुण्याचं काम घडलं असेल, म्हणून मी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो. मी नेहमीच छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून होईल तितके प्रयत्न करत असतो, असं याआधी उदयनराजे म्हणाले होते.

मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, माझ्या लोकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांचे हेच गुण आयुष्यभर माझ्यामध्ये आहेत आणि ते आयुष्यभर राहावेत, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवलं होतं.