Uday Samant Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर हायड्रोजन पॉलिसी स्वीकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.  पुढील 15 ते 20 दिवसात राज्यात हायड्रोजन पॉलिसी लॉन्च केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. कोकणात मत्स्य व आंबा उद्योगाला चालना देण्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात मारिन पार्क व मँगो पार्क केला जाणार असल्याची माहिती यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते लोटे एमआयडीसी येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना सामंत यांनी उद्धव ठाकरें यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्याशिवाय अंधेरी पोट निवडणुकीत नोटाला पडलेली मते प्रत्येक पक्षासाठी चिंतनाचा विषय असल्याचेही सामंत म्हणाले. 


नोटाला झालेले मतदान हा प्रत्येक पक्षासाठी चिंतनाचा विषय
अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला असला तरी या निवडणुकीत 12 हजारांहून अधिक मतदारांनी नोटा हा पर्याय स्वीकारला हे नक्कीच चिंतादायक आहे. हा विषय आरोप-प्रत्यारोप करण्याचा नसून प्रत्येक पक्षासाठी हा विषय चिंतनाचा आहे, असे मत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.


रिफायनरी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करणार
बारसु-सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत असतानाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र हा प्रकल्प नियोजित ठिकाणीच उभारण्यासाठी ठाम भूमिका मांडली आहे. कोकणातील तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने रिफायनरी प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा असून शेतकऱ्यांचे गैरसमज लवकरच दूर केले जातील व हा प्रकल्प मार्गी लावला जाईल असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लोटे एमआयडीसी येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.


170 चे 182 होणार हे थांबवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न
शिंदे-फडणवीस सरकारमधील 170 चा आकडा हा 182 होणार याची खात्री विरोधकांना असल्यामुळेच हे थांबवण्यासाठीच मध्यावधी निवडणुकांची चर्चा केली जात असल्याची टीका राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्री आमचा होईल असे सांगितले जात आहे, पण मुख्यमंत्री एकच असतो आता त्यासाठी कायदा बदलणार का, असा खोचक सवाल देखील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला.


आणखी वाचा : Poladpur Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपये मदतीची घोषणा