ठाण्यात बांधकाम सुरु असताना इमारत खचली, दोघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2016 04:22 PM (IST)
ठाणे: इमारतीचं बांधकाम सुरु असताना माती खचल्याने, दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 8 ते 10 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. ठाण्यातील पातलीपाडा परिसरातील हिरानंदानी इस्टेटमध्ये ही दुर्घटना घडली. अब्दुल हुसेन असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली आहे.