चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन महिलांचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2016 05:50 AM (IST)
चंद्रपूर : चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे दोन महिलांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी डॉक्टरवर हलगर्जीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपुरातील डॉक्टर भुपाल यांनी काही महिलांना इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर त्यांना त्रास झाला आणि त्यातच दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कुटुंबीयांच्या आरोपानंतर डॉक्टर भुपाल यांच्याविरोधात हलगर्जीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी महिलांना कोणतं इंजेक्शन दिलं होतं याविषयी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण नाही.