Pune ATS News : देशविरोधी कृत्याच्या (Pune ATS News) संशयावरुन पुण्यातून (Pune) दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ATS ने ही कारवाई केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातून सोमवारी मध्यरात्री दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोघेही मागील दीड वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड आहेत. मात्र पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे. प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन असं या दोन कर्तबगार पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे. या दोघांना पकडून देणाऱ्यांना NIA कडून पाच लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
कोथरुड येथे पोलीस पेट्रोलिंग पथक प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी 3 दुचाकी चोरांना पकडले. या चोरांनी आजपर्यंत चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी या तीन आरोपींना ते राहत असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. त्या वेळी तिन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न करु केला मात्र एक आरोपी पळून जण्यात सफल झाला तर दोन आरोपी इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातून एक जिवंत काडतूस आणि चार मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
दोघेही मोस्ट वॉन्टेड आरोपी होते...
इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं होतं. संपूर्ण चौकशी केली असता. त्यांनी देशविरोधी कृत्य केल्याचं समोर आलं. त्यातच हे प्रकरण नंतर एनआयएकडे पुढील तपासासाठी देण्यात आले आणि तपासादरम्यान युनुस साकी आणि इम्रान खान या दोघांची नावं समोर आली. हे दोन्ही आरोपी एनआयएच्या याच प्रकरणात वॉन्टेड आरोपी होते. त्यांना पकडून देणाऱ्यांना NIA कडून पाच लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
15 महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात लपून बसले होते...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहेत. हे दोन दहशतवादी इसिसच्या सुफा संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे. 2022मध्ये मार्च महिन्यात राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये याच तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त केलं होतं. बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी पावडरही जप्त करण्यात करण्यात आलं होतं. त्यांना पकडून देणाऱ्यांना पाच लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. मागील 15 महिन्यांपासून ते पुण्यातील कोंढवा परिसरात लपून बसले होते. अखेर त्यांच्यातील दोघांना जेरबंद करण्यात आलं आहे तर त्यांच्यातील एक साथीदार अजूनही फरार आहे.
हेही वाचा-