वृक्षारोपणाला उत्तम प्रतिसाद, 75 लाख झाडांची लागवड
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 02:23 AM (IST)
मुंबई : राज्य सरकारकडून महाराष्ट्रात आज तब्बल 2 कोटी झाडं लावण्यात येणार आहेत. वन विभागाकडून एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातल्या नागरिकांना किमान एक तरी झाड लावण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाडं लावण्याचं नियोजन वन विभागाकडून करण्यात आलंय. या उपक्रमाच्या मुंबईतील कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावर्षी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाद म्हणून प्रत्येकी एका झाडाचे रोप भेट देण्याची सूचना केल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.