पिंपरीः शिरुर तालुक्यातील फाकटे गावातील शेतकऱ्याच्या तब्बल 150 कॅरेट डाळिंबावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आजच्या बाजारभावानूसार तब्बल चार ते साडेचार लाखाचं नुकसान झाल्याचा या शेतकऱ्याचा दावा आहे.

 

भर दुष्काळात शेतकरी मोठ्या आव्हानांचा सामना करुन पिकं जगवत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकटासोबतच मानवनिर्मीत संकटांचा सुद्धा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.

 

फाकटे गावाता मिनीनाथ वाळूंज यांची डाळिंबाची शेती आहे. यंदा दुष्काळ असल्याने टँकरच्या सहाय्याने पाणी घालून त्यांनी डाळिंबाची बाग जगवली. मात्र चोरट्यांनी डाळिंब चोरुन वाळिंज यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं. याप्रकरणी टाकळीहाजी पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.