शिर्डी : विषबाधेमुळे बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड रोडवरील आंबेडकरनगर येथील ही घटना आहे. दीपक सुपेकर कुटुंबातील चौघांना जेवणातून विषबाधा झाली होती. यापैकी मोठ्या बहिणीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


दीपक सुपेकर कुटुंबियांनी गुरुवारी रात्री एकत्रित जेवण केलं. मात्र सकाळी मुलगा कृष्णा (6 वर्ष) आणि मुलगी श्रावणी (9 वर्ष) तिसरी मुलगी वैष्णवी तसेच पत्नी भगिरथी यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान कृष्णाची प्रकृती चिंताजनक बनली होती, त्यात त्याचा रविवारी मृत्यू झाला. तर श्रावणी हिचा सोमवारी उपाचारादरम्यान मृत्यू झाला.

जेवनात दाळ-भात, बटाटा, टोमॅटोटी भाजी असे पदार्थ खाल्ल्याची भगिरथी यांनी माहिती दिली. पत्नी भगिरथी आणि तिसरी मुलगी वैष्णवी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. वैष्णवी सुपेकरला उलट्या, अतिसार आणि थंडीताप याचा त्रास होत आहे. कृष्णा आणि श्रावणी यांचा अतिसाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूच नेमकं कारण समजू शकेल असं डॉक्टरांनी सांगितलं.

VIDEO | Village News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा