नांदेड : मोबाईल फोनची जुनी बॅटरी निकामी समजून दगडाने फोडत असताना आचानकपणे स्फोट झाला आणि यात घटनेत दोन मुले जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात ही घटना घडली.
बौद्धपुरा येथील 16 वर्षीय सिद्धार्थ भवरे आणि त्याचा भाऊ 10 वर्षीय शिवम भवर हे दोघे घरासमोरील आंगणात खेळत होते. खेळत असताना त्याच्या हाती मोबाईल फोनची जुनी बॅटरी लागली. कुतुहलापोटी बँटरीशी खेळत असताना सिद्धार्थने त्या बॅटरीला दगडाने ठेचायला सुरुवात केली. अचानक त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला.
यामध्ये सिद्धार्थच्या उजव्या भागाच्या तोंडाचा जबडा स्फोटात छिन्न-विछिन्न होऊन कान, खांदा,आणि छातीला गंभीर दुखापत झाली. तर सोबत खेळत असलेला शिवमच्या उजव्या हाताच्या करंगळी आणि आंगठ्याला छिद्र पडले.
स्फोटाचा अवाज ऐकून त्याच्या वडिलांसह शेजाऱ्यांनी अवाजाच्या दिशेने धाव घेतली. समोरील दृश्य पाहून सर्वजण हदरले. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोचार करुन गंभीर जखमी असलेल्या सिद्धार्थला यवतमाळला हलवण्यात आले.
मोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना स्फोट, दोघेजण जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2018 10:56 PM (IST)
सिद्धार्थ आणि शिवम खेळत असताना त्यांच्या हाती मोबाईल फोनची जुनी बॅटरी लागली. कुतुहलापोटी बँटरीशी खेळत असताना सिद्धार्थने त्या बॅटरीला दगडाने ठेचायला सुरुवात केली. अचानक त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -