सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील बोरगावमध्ये उजनीच्या उजव्या कालव्यात चार शाळकरी मुलं वाहून गेली आहेत. यात दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, तर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे.


आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेले दोघे भाऊ मुंबईहून श्रीपूर येथे उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावाला आले होते. मात्र पोहता न आल्यानं मामासोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे.

ओम सतीश लोणी (वय 13) व प्रसन्न सतीश लोणी (वय 10) अशी मृत भावंडांची नावं आहेत. कालव्यात वाहून गेलेल्या विराज संतोष शिवनगी व विकी संतोष शिवनगी या दोघांना बोरगांव वाचवण्यात यश आलं आहे. बुडालेल्या दोन्ही भावंडांचे मृतदेह अद्याप सापडले नसून त्यांचा शोध सुरु आहे.