पुण्याच्या स्वारगेटमधील कार्यालयातील बैठकीत हा वाद झाला. पिंपरी चिंचवड शहरातल्या समस्या मांडताना आपापले मुद्दे मांडताना शाब्दिक चकमक उडाली.
दरम्यान वादावर पडदा टाकण्यासाठी तुकाराम मुंढेंनी माफी मागितल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळेंनी केला आहे. तर मुंढे पिंपरी चिंचवड मध्ये आल्यानंतरच PMPML ला दीडशे कोटींचा निधी पालिका देईल, अशी ठाम भूमिका सावळे यांनी मांडली. आणि यावरूनच वादाची ठिणगी पेटली.
कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. मात्र राजकारण्यांसोबत त्यांचे अनेकदा खटके उडाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांची नवी मुंबईतील कारकीर्दही चांगलीच गाजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात आणि पिंपरीत तुकाराम मुंढे आणि राजकारण्यांमध्ये संघर्ष समोर आला आहे.
संबंधित बातम्या :