मुंबई : 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच या भन्नाट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.


'पानी फाऊंडेशन'ने या स्पर्धेचा हा प्रोमो रिलीज केला आहे. 'तुफान आलंया....!' मध्ये विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे अशा तीन संघाचा समावेश असेल.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत साताऱ्यातील वेळू अव्वल

8 एप्रिलपासून सत्यमेव जयते वॉटर कप 2017 ला सुरुवात होणार आहे. या पर्वात महाराष्ट्राच्या 30 तालुक्यांमधून तब्बल 2024 गावं सहभागी होणार आहेत. 8 एप्रिल 2017 ते 22 मे 2017 दरम्यान ही स्पर्धा रंगेल.

एबीपी माझावर दर शनिवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.



वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी 30 तालुके

पुणे – पुरंदर, इंदापूर
वाशिम – कारंजा
सातारा – कोरेगाव, माण, खटाव
औरंगाबाद – फुलंब्री, खुलताबाद
उस्मानाबाद – भूम, परंडा, कळंब
लातूर – औसा, निलंगा
वर्धा – आर्वी
यवतमाळ – राळेगाव, कळंब, उमरखेड
अकोला – अकोट, पातुर, बार्शी-टाकळी
सांगली – खानापूर, आटपाडी, जत
सोलापूर – सांगोला, उत्तर सोलापूर
बीड – अंबेजोगाई, केज, धारुर
अमरावती – वरुड, धारणी

पाहा व्हिडीओ

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/kP8u63o09LA" frameborder="0" allowfullscreen></iframe>

सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या पर्वात 116 गावं सहभागी झाली होती. पानी फाऊंडेशनने महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यात ही स्पर्धा घेतली होती.

पहिल्या वॉटर कप स्पर्धेचा निकाल


पहिला क्रमांक  : साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या वेळू गाव ( 50 लाख रुपये)

दुसरा क्रमांक : साताऱ्याच्या जायगाव आणि बीडच्या खापरटोन गावांना विभागून (30 लाख रुपये)

तिसरा क्रमांक : बीडच्या राडीतांडा आणि अमरावतीच्या वाठोडा गावांना विभागून (20 लाख रुपये)