नांदेड : मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोविड काळात सेवा बजावणारे डॉक्टर यांना मागील 2 महिन्यापासून शासनाने वेतनच दिले नसल्याबाबत 12 ऑगस्टला एबीपी माझाने वृत्त दाखवले होते. या डॉक्टरांवर आर्थिक टंचाईमुळे उपासमारीची वेळ आली होती. अशा डॉक्टर्सची संख्या ही बारशे पेक्षा जास्त आहे. ज्या मराठवाड्यातून महाराष्ट्राला आरोग्यमंत्री लाभले त्याच मराठवाड्यातील कोविड योद्ध्यांना उपासमारीचा सामना करावा लागणे खेदजनक होते. एबीपी माझाने याबाबत वृत्त प्रसारित केल्यानांतर महाराष्ट्र शासनाला आता जाग आली असून मराठवाड्यातील तब्बल 1400 पेक्षा जास्त डॉक्टरांना दोन महिन्याचे थकीत असलेले वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना वॉर्डात जीवाची बाजी लावून रुग्णांवर उपचार करणारे हे कोरोना योद्धे बाधित रुग्णांचा जीव वाचावा ते लवकर बरे व्हावेत म्हणून काम करत आहेत. या डॉक्टरांना सरकारने कोरोना योद्धे अशी पदवी दिली. सोबत 10 हजारांची वाढ देण्याचा निर्णय देखील घेतला. पण पगार वाढ मिळणे तर दूरच त्यांचे मूळ वेतन देखील मागील 2 महिन्यांपासून शासनाने देण्याचे औदार्य दाखवले नव्हते. अनेक डॉक्टरांचे विविध कर्जाचे हप्ते यामुळे थकले होते. शिवाय आर्थिक संकट ओढवले होते. पण आता त्यांना थकीत पगार मिळाल्यामुळे ते आनंदी झाले असून एबीपी माझामुळे न्याय मिळाल्याची त्यांची भावना आहे. यासाठी त्यांनी एबीपी माझाचे आभार देखील मानले आहे. 15 ऑगस्टपासून पुकारलेला काम बंद आंदोलन देखील या डॉक्टरांनी रद्द केले आहे. आपण पाहुयात कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयातील किती डॉक्टरांचे वेतन थकीत होते.
महाविद्यालय निवासी डॉक्टर संख्या इंटर्न डॉक्टर संख्या एकूण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद 490 200 690
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड 155 100 255
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर 174 95 269
Vijay Wadettiwar | आंतरजिल्हा एसटी बससेवा नियम पाळून सुरु करणार : विजय वडेट्टीवार