मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेत्यांची मुलं उतरली आहेत. आताच्या काळात राजकारण जितकं ऑन फिल्ड होत नाही तितकं सोशल मीडियावर दिसत होत असतं.
कोण काय बोलतं, कोण काय भूमिका मांडत युवा पिढीतील नेते ट्विटर,फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.

पार्थ पवार हे सध्या चर्चेत आले ते ह्याच ट्विटर माध्यमातून व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे. सुशांत सिंग प्रकरण असो आणि राम मंदिर भूमिपूजन यावरून पार्थ यांनी ट्विट केले आणि ते वादात अडकले.

पार्थ यांना आजोबा शरद पवार यांनी फटकरल्यावर त्यांच्या मदतीला आले भाजप आमदार नितेश राणे. 'पार्थ पवार लंबी रेस का घोडा आहे' असं म्हणूज पाठिंबा दिला. ट्विटरवरून राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप आमदाराने पाठिंबा दिला आणि चर्चा सुरू झाली.



विशेष म्हणजे मे महिन्यात ट्विटरवर रोहित पवार विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगला होता. शरद पवार यांनी साखर उद्योगाबाबत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून यावरून निलेश राणे यांनी टिप्पणी करत ट्विट केलं त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आणि तिथून या दोन्ही तरुण नेत्यात वाद झाला. निलेश राणे यांचे वर्तन यावरून रोहित पवार यांनी टोमणा मारल्यास निलेश राणे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. एकमेकांच्या लायकी पर्यंत हे नेते गेले. राष्ट्रवादी आमदार विरुद्ध भाजप नेता असा हा वाद झाला मे महिन्यात झाला असताना ऑगस्ट मध्ये रोहित पवार यांच्या भावाच्या मदतीला आले निलेश राणे यांचे धाकले बंधू नितेश राणे.



त्यामुळे एकीकडे निलेश राणे विरुद्ध रोहित पवार चित्र असताना पार्थ पवारला मात्र नितेश राणे पाठिंबा देतात. रोहित पवार आणि पार्थ या दोन भावांमधील 'सख्य' पाहून राणे बंधूंची भूमिका देखील खूप काही सांगून जाते.

राजकारणात कोण कुठे आहे ,कोणत्या दिशेने जात आहे याचे द्योतक त्या नेत्याच्या ट्विटर किंवा सोशल मीडियाच्या पोस्ट मधून कळत असत..आजच्या काळात राजकारण हे सोशल मीडियावर केलं जातं, याचं हे उदाहरण आहे.