व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?
मेसेजचं सत्य काय?
पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट करण्यात आली असल्याची माहिती देणारा मेसेज खोटा असून, अद्याप तारखेत कोणतेही बदल करण्यात आले नाही.
आणखी 15 दिवसांच्या अवधीसाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती
पीक विमा भरण्यासाठी आणखी 15 दिवसांची वाढ मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला विनंती केली आहे. मात्र, अद्याप केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
बँकांबाहेर लोकांच्या रांगा
राज्यातल्या शेतकऱ्यांची आज धावपळ पाहायला मिळतेय..कारण पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ऑनलाईनच्या घोळामुळं ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.
विरोधकही आक्रमक
पीक विम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना विधानसभेत चांगलंच धारेवर धरलं. शेतकरी रांगेत तात्कळत असताना सरकार काहीच करत नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ताबडतोब मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विखेंनी केली. तर आज संध्याकाळपर्यंत पीक विम्याची मुदत वाढली नाही मी स्वत: दिल्लीला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
याशिवाय बँकेच्या रांगेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत कृषीमंत्र्यांनी जाहिर केली.