बीड : पीक विम्याच्या बाबतीत एकीकडे शेतकरी संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे बँक कर्मचारी गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचं आज समोर आलं आहे.

परळी तालुक्यातील धर्मापुरीच्या जिल्हा बँकेच्या शाखेत पीक विमा भरल्यानंतर बँकेने चक्क ‘32 जून 2017’ तारीख असलेल्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत. चुकीचा महिनाच नाही, तर अस्तित्त्वात नसलेली तारीखही बँकेने पावतीवर छापली आहे.

पीक विम्यावरुन बँका शेतकऱ्यांची थट्टा करतात की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.



दरम्यान, राज्यातल्या शेतकऱ्यांची आज धावपळ पाहायला मिळते आहे. कारण पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ऑनलाईनच्या घोळामुळे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.