मनमाड : मनमाड-मालेगाव रस्त्यावर काडीपेटीचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला. पहाटे 5:30 वाजताची ही घटना आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.
समोरुन येणाऱ्या ट्रकच्या धडकेमुळे आग लागल्याचं समजतं. चालकाने प्रसंगवधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभी करत, क्लिनर आणि चालकाने तिथून पळत सुरक्षित ठिकाणी पोहचला
दरम्यान, अग्निशमन दलाचे तीन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
ट्रकने पेट घेतल्यामुळे मनमाड-मालेगावला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. परंतु ट्रकची विझल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे.