बूटचोरी राड्यानंतर लग्न मोडलेल्या युवतीचा पुन्हा निकाह
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2018 10:33 AM (IST)
बूटचोरी राड्यानंतर लग्न मोडलेल्या वधूची सोयरीक बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी जुळली.

बीड : बूटचोरीवरुन झालेल्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या मुलीला नवा जोडीदार मिळाला आहे. बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी वधूची सोयरीक जुळली. लग्नात मुलीकडच्या मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे, असा सध्याच्या लग्नातला ट्रेण्ड आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात बूट चोरण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि रविवारी भर लग्नातच राडा झाला. सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला. अंबाजोगाईमधील सायगावमध्ये राहणाऱ्या युवकाशी तरुणीचं लग्न झालं. निकाह मोडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला. नेमकं काय घडलं? नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी सुलतान युनूस शेखचा रविवारी निकाह झाला. लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. मात्र सामोपचाराने हा वाद मिटला, लग्नही झालं.