मुंबईः नंदुरबारमधील नवापूर तालुक्यात रेल्वे ट्रॅक खचल्यामुळे जळगाव ते सूरत या मार्गावरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. नवापूर तालुक्यातील पाचोराबारी या गावात ढगफुटी झाल्यामुळे रेल्वे ट्रॅक वाहून गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात पावसाने धुमाकूल घातला आहे. रेल्वे ट्रॅक वाहून गेल्यामुळे अनेक ट्रेन पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे ट्रॅकच्या कामासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

 

सुरत-जळगाव मार्गावरील या ट्रेन्स रद्द

  • 59078 भुसावळ-सुरत पॅसेंजर

  • 59075 सुरत-भुसावळ पॅसेंजर

  • 59076 भुसावळ-सुरत पॅसेंजर


 

सुरत-जळगाव मार्गावरील वळविलेल्या ट्रेन्स

  • भोपाळ-रतलाम-गोध्रा-वडोदरा-अहमदाबाद मार्गे डायव्हर्टेड

  • 12834 हावडा-अहमदाबाद

  • 12656 चेन्नई-अहमदाबाद नवजीवन

  • 12906 हावडा-पोरबंदर

  • 12833 अहमदाबाद-हावडा

  • 12937 राजकोट-रेवा


 

सुरत-वसई रोड-कल्याण-नाशिक-जळगाव मार्गे डायव्हर्टेड

  • 11453 अहमदाबाद-नागपूर प्रेरणा

  • 12844 अहमदाबाद-पुरी

  • 18502 गांधीधाम-विशाखापट्टनम

  • 19045 सुरत-छपरा ताप्ती गंगा

  • 12655 अहमदाबाद-चेन्नई नवजीवन

  • 17038 बिकानेर-सिकंदराबाद

  • 19058 वाराणसी-उधना