दापोलीच्या समुद्र किनारी स्टंट, कार उलटून पर्यटकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2016 11:28 PM (IST)
रत्नागिरी : समुद्रीकिनारी वेगानं गाडी चालवण्याचा स्टंट एका पर्यटकाच्या जीवावर बेतला आहे. रत्नागिरीच्या दापोली समुद्र किनाऱ्यावर गाडी उलटून एकाचा मृत्यू झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करताना गाडी उलटल्यामुळे पर्यटकाचा मृत्यू झालाय. सागर मालुसरे असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव असून तो पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर सागरला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यामुळे नसती स्टंटबाजी करणं कसं जीवावर बेतू शकतं याचं उदाहरण समोर आलं. पाहा व्हिडिओ :