सिंधुदुर्ग : नाताळाच्या सुट्टीच्या निमित्ताने देश विदेशातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळाची निवड करतात. सुट्टीचा हंगाम सुरु असल्याने कोकणातील पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. कोकणात पर्यटकांना स्कूबा डायव्हींग, बॅक वॉटर सफारी, जलक्रीडा साहसी खेळ अनुभवता येतात. तसेच कोकणी खाद्य पदार्थांचा आस्वाद आणि मेजवानीचीही चव चाखता येते. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात. सुट्टीचा हंगाम आणि सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात.
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागलीत. तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. कोकणच मॉरिशिस म्हणून नावारूपाला आलेलं देवबाग मधील सुनामी बेट. तळकोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होत चाललं आहे. गोव्या पाठोपाठ आता सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागली आहे. पर्यटकांना मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या दिमतीला स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि माशाचं मस्त जेवण हे सारं पर्यटकांना भूरळ घालत असतं. त्यामुळे सहाजिकच अलीकडे सिंधुदुर्गमधील पर्यटकांची संख्या वाढली आहे.
तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथले वॉटर स्पोर्ट्स आणि स्कूबा डायव्हींग. महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलय हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पर्यटकांची ही इच्छा इथं तळकोकणात पूर्ण होते. तारकर्लीच्या समुद्रतील रंगीत मासे, पाण वनस्पती आणि समुद्रातला तळ सारं काही पाहून पर्यटक हरखून जातात.
नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात तसेच गोव्यात जाण्याचे प्लान आखले जातात. मात्र यावर्षी पर्यटकांना कोकणाला जास्त पसंती दिलीय. परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतायत त्याच सुविधा आता कोकणात देखील मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागलयेत.
डिसेंबरमधील ख्रिसमस आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांचा कालावधी, त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुण्यासह देश विदेशातून येणार्या पर्यटकांसाठी कोकण किनारपट्टी डेस्टिनेशन ठरली आहे.
डिसेंबर महिना म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीचाच असतो. नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत हा योग साधण्यासाठी पर्यटकांनी सुट्ट्यांचे काही महिन्यांपूर्वीच नियोजन केलेल असत. नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी मालवण, तारकर्ली, देवबाग, देवगड, भोगवे, शिरोडा, चिवला समुद्र किनार्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. यासाठी यावेळी हॉटेल, घरगुती राहण्याची सोय असलेली ठिकाणे पर्यटकांनी या आधीच हाऊसफुल्ल झाली आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Dec 2019 09:31 PM (IST)
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागलीत. तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. कोकणच मॉरिशिस म्हणून नावारूपाला आलेलं देवबाग मधील सुनामी बेट. तळकोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होत चाललं आहे. गोव्या पाठोपाठ आता सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -