1. पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्सून  कोकणात येणार, हवामान खात्याची गुडन्यूज, मुंबईत मात्र 10 जूननंतर दाखल होण्याचा अंदाज


वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.


2. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यात 1 हजार 81 तर मुंबईतही 739 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, वाढत्या रुग्णांमुळे मुंबई पालिका अलर्टवर


3. पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती तर 2 आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याचं स्पष्ट


4. महाराष्ट्राला जीएसटीचा सर्व थकीत परतावा दिल्याचा केंद्राचा दावा, तर केंद्राकडून 14 हजार कोटी येणे बाकी असल्याची अजित पवारांची माहिती, आज पत्रकार परिषदेत अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष


5. अंजनेरी, किष्किंधानंतर हनुमानाच्या जन्मस्थळाचा नवा वाद, सोलापूरच्या कुगावात हनुमानाचा जन्म झाल्याचा महंत सीताराम  बल्लाळ यांचा दावा, मंदिराचं सर्वेक्षण करण्याची मागणी


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 02 जून 2022 : गुरुवार



6. मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत


7. माजी काँग्रेस नेता हार्दिक पटेल आज सकाळी 11 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार, 15 हजार कार्यकर्त्यांसह कमळ हाथी घेणार


काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेण्याच्या तयारीत हार्दिक पटले आहेत. पक्ष प्रवेशापूर्वी हार्दिक पटेल यांनी ट्वीट केले आहे. राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात एक छोटा शिपाई बनून काम करणार असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केल्यापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून हार्दिक पटेल आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. 


हार्दिक पटेल आज दुपारी 12 वाजता पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी गुजरातमध्ये पक्ष प्रवेशाचे पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राज्यात भाजपची सत्ता आहे. हार्दिक पटेल यांनी ट्वीट करून म्हटले की, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एक नवा अध्याय सुरू करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात मी लहान शिपाई बनून काम करणार आहे.


8. अयोध्या आणि मथुरेत मद्य विक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय, अयोध्या आणि मथुरेतील मद्य दुकानांचे परवानेही रद्द करणार


9. गायक केके यांच्या मृत्यूभोवतीचं गूढ संपलं, केकेचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्यानंच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर, केकेवर आज मुंबईत अंत्यसंस्कार


10. अमेरिकेत ओक्लोहोमामधील रुग्णालायात अंदाधुंद गोळीबार,  हल्लेखोरासह 5 जणांचा मृत्यू, अमेरिकेत यंदाच्या वर्षात गोळीबाराच्या 233 घटनांची नोंद