दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


१. पीएफच्या व्याजदरात घट, व्याजदर 8.5 टक्क्यांवरुन 8.1 टक्क्यावर, ईपीएफओने सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसली
 
२.  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून मोर्चेबांधणी, दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
 
३. पुणतांब्यात आज आजी-माजी कृषीमंत्री आंदोलकांची भेट घेणार. कृषीमंत्री दादा भुसे आंदोलकांना भेटणार 
 
४. कोरोना रूग्ण वाढल्याने केंद्राचं राज्य सरकारला पत्र, कोरोना वाढल्यानं चाचण्या वाढवण्याच्या सूचना, तर राज्य आरोग्य विभागाच्या सचिवांकडून सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र


५. मोदींच्या कानपूर दौऱ्यादरम्यान दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्री योगींचे प्रशासनाला निर्देश, तर दगडफेक करणाऱ्यांच्या मालमत्तांवर बुलडोझर करवाईची शक्यता


६. अविमुक्तेश्वरानंद आज कथित शिवलिंगाच्या पूजेसाठी  ज्ञानवापी मशिदीत जाणार, पूजेला प्रशासनाकडून परवानगी नाही. शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाईचा प्रशासनाचा इशारा 


७. पुण्यात आजपासून साखर परिषद, मुख्यमंत्री ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवारांसह दिग्गजांची उपस्थिती


८.देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा व्हावा, दिल्लीत 200 शेतकरी संघटनांचे अधिवेशन होणार, राजू शेट्टींची माहिती


Raju Shetti : देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाची मागणी जोर धरत आहे. देशातील विविध संघटनांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील 200 हून अधिक शेतकरी संघटनांचे दिल्लीत तीन दिवसांचे अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन 6, 7 आणि 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे. याबाबत दिल्लीत अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग यांच्या निवासस्थानी देशातील प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. 


९. मुंबईत आतापर्यंत 3 हजार 679 मॅनहोलवर संरक्षक जाळी लावण्याचं काम पूर्ण, झाकणे न उघडण्याचे महापालिकेचे आवाहन


१०. तीन तासांच्या सामन्यानंतर एलेक्जेंडर दुखापतग्रस्त, राफेल नदालचा फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश