माजी कसोटीवीर बापू नाडकर्णी यांचं वृद्धापकाळाने निधन
दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Jan 2020 11:31 PM
येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर मुंबईत 'नाईट लाईफ' सुरु होणार, आदित्य ठाकरेंची माहिती, सर्व थिएटर, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती
शिवसेना खासदार संजय राऊत उद्या बेळगावला जाणार
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी जवळ ची घटना
रेल्वे खाली येऊन तिघांचा मृत्यू
मृतकांमध्ये 1 स्त्री आणि 2 पुरुषांचा समावेश..
बीड विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर काँग्रेसचे संजय दौंड बिनविरोध, भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजन तेली यांचा अर्ज मागे
नवी दिल्ली : निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, 22 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारीला फाशी
नवी दिल्ली : निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, 22 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारीला फाशी
पुणे महामेट्रोच्या एका मार्गाचा नामविस्तार होणार,
पुण्याहुन पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या मेट्रोचे नामकरण पुणे-पिंपरी-चिंचवड महामेट्रो करण्याचा निर्णय,
अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे मेट्रोच्या बैठकीत निर्णय,
पुण्यातील इतर सर्व मार्गाना पुणे महामेट्रो असंच नाव कायम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोटमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, जखमी रिषभ पंतवर बंगळुरुमध्ये उपचार, बॅकअप यष्टीरक्षक म्हणून के एस भरतच्या नावाची सूचना
भारत वि. ऑस्ट्रेलिया - राजकोटमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
हुतात्मा दिन अभिवादन कार्यक्रमासाठी आलेले महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राजेंद्र पाटील यद्रावकर आपल्या कार्यकर्त्यासमवेत हुतात्मा चौकात दाखल झाले. पण तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अभिवादन करण्यापासून रोखून ताब्यात घेतले.
भिवंडीत 2 कोटी 75 लाखांचा गुटखा जप्त. वर्षाच्या सुरवातीलाच ठाणे अन्न निरीक्षक कार्यालयाची मोठी कारवाई...
माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याची नोटीस, सुधीर मुनगंटीवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासह ज्या माजी मंत्र्यांनी अद्याप शासकीय बंगले रिकामे केले नाहीत त्यांना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत.
संगमनेरमध्ये तरुण आमदारांशी संवाद...आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरेंची मुलाखत...
साईबाबांच्या जन्मभूमीवरील वादावर आता पाथरीकर 29 पुरावे सादर करणार आहेत. पाथरी संस्थानच्या कृती समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, साईंच्या जन्मभूमीवर शिर्डीकर विनाकारण वाद घालत आहेत. रविवारपासून शिर्डी बंदचे आवाहनही करण्यात आलं आहे. मात्र हा वाद घालणं निरर्थक असून आम्ही साईबाबांच्या जन्मभूमीबाबत 29 पुरावे त्यांनाही सादर करु. तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही सादर करु, अशी भूमिका आता पाथरीकरांनी घेतली आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंद
23 जानेवारीच्या अधिवेशनासाठी मनसेची पोस्टरबाजी, शिवसेना भवनासमोर मनसेचे पोस्टर्स..
ठाणे-घोडबंदर रोड येथे खासगी बसला आग, राजस्थानहून मुंबईला येताना बसला आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. वाहतूक धीम्या गतीने सुरू
अहमदाबाद-मुंबई पहिली खासगी तेजस एक्सप्रेस आज धावणार..
गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील 50 विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीतून 'इस्रो' या भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली. इस्रो संस्थेमध्ये गडचिरोली येथील आदिवासी विद्यार्थ्यांना भेट मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तीन प्रकल्पातील एकूण 43 आश्रमशाळा तसंच दोन एकलव्य शाळेतील एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून 'भारतभ्रमण' या जिल्हयातील नाविण्यपूर्ण उपक्रमातून ही अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती.
इस्रोने दूरसंचार उपग्रह जीसॅट-30 चं (GSAT-30) आज यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलं. आज पहाटे 2 वाजून 35 मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील बेटावरील कैरो बेटावरुन यशस्वीपणे हे प्रक्षेपण करण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन-माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वे रुळला तडा गेला आहे. त्यामुळे अप-धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. इंदिरा गांधी आणि करिम लालाच्या भेटीचं वक्तव्य संजय राऊतांकडून मागे, वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव, तर काँग्रेस नेत्यांकडून राऊतांना निर्वाणीचा इशारा
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, तर वंशजांवरील राऊतांच्या विधानामुळे संभाजी भिडेंकडून सांगली बंदची हाक, शिवसैनिकांकडून बंद मागे घेण्याची विनंती
3. आपण घड्याळवाले नसलो तरी घड्याळवाले आपले पार्टनर, बारामतीत सुळेंच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर, तर पवारांकडून मुख्यमंत्री आणि अजितदादांची फिरकी
4. पॅरोलवर असलेला इंडियन मुजाहिदीनचा डॉ. जलीस अन्सारी मुंबईतून बेपत्ता, देशभरातील 50हून अधिक बॉम्बस्फोटांचे कट रचल्याचा आरोप
5. प्रजासत्ताक दिनी होणारा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदचे 5 अतिरेकी अटकेत, मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकं हस्तगत
6. मुंबई, नाशकात तापमानाचा पारा घसरला, हवेतला गारवा वाढल्यानं ठेवणीतले ऊबदार कपडे बाहेर