राजघराण्यावर बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या छत्रपती उदयनराजे प्रेमींकडून सातारा बंदची हाक

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jan 2020 11:47 PM
आता पश्चिम रेल्वेवर धावणार अर्ध वातानुकूलित लोकल, रेल्वे बोर्डाची या लोकलला तत्वतः मंजुरी , या लोकलमध्ये 9 डबे विना वातानुकूलित तर 3 डबे वातानुकूलित असणार ,

यावर तांत्रिक काम पूर्ण करून पश्चिम रेल्वेच्या कारशेडमध्ये अशी लोकल बनवण्यात येणार, मग चाचण्या करून मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांच्याकडे पुरावे मागणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरणार, तुम्हाला पुरावे हवे असतील तर साताऱ्यात या आम्ही तुम्हाला पुरावे देऊ, आबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया
छत्रपती उदयनराजे आणि राजघराण्यावर केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या छत्रपती उदयनराजे प्रेमींकडून सातारा बंदची हाक
पश्चिम रेल्वेवर धावणार अर्ध वातानुकूलित लोकल, रेल्वे बोर्डाची या लोकलला तत्वतः मंजुरी, लोकलमध्ये 9 डबे विना वातानुकूलित तर 3 डबे वातानुकूलित असणार, पश्चिम रेल्वेच्या कारशेडमध्ये अशी लोकल बनवण्यात येणार, चाचण्यांनतर मुंबईकरांसाठी लोकल उपलब्ध होणार
‘तानाजी’ चित्रपट करमुक्त करा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी
सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती खासदार संभाजी राजेंनी केलेल्या 'सारथी' संस्थेतील अनियमितेच्या आरोपांवर चर्चा, ओबीसी मंत्रालयाचे सचिव जे. पी. गुप्ता यांच्या उचलबांगडी नंतर मदत पुनर्वसनाचे सचिव के. डी. निंबाळकरांवर अतिरिक्त भार, उद्यापासून सचिव के. डी. निंबाळकर करणार चौकशी सुरु

कोल्हापूर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला. काँग्रेसला 12 पालकमंत्री पद मिळाली होती. बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होतं. ते पालकमंत्री पद घेणार नाही. पक्षातील दुसऱ्या मंत्र्याला संधी मिळावी म्हणून कोल्हापूर पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ आग्रही होते. पण कोल्हापूर काँग्रेसकडे असल्याने सतेज पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे.
दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण, दोषींच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू
साताऱ्याच्या गादीचा आम्ही आदर करतो. पण उदयनराजेंनी शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. शिवाजी महाराजांवर कोणाचाही मालकी हक्क नाही : संजय राऊ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्याच्या विचारात सरकार आहे. ठाकरे सरकारने याबाबत नवा प्रस्ताव आणला आहे. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची अडीचशे फूट निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती वाढवून साडे तीनशे फूट होणार आहे. उंची वाढवल्यामुळे पुतळ्याचा खर्च देखील वाढणार आहे. परिणामी 709 कोटींचा खर्च आता 990 कोटी होणार आहे. या स्मारकाचा पाया 100 फुटांचा असेल. आज कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठण्याची शक्यता,
अवैध दारुविक्री आणि महसूल नुकसानामुळे विचार,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आधिकाऱ्यांमध्ये चर्चा
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला आणि गंदेरबालमध्ये मागील 48 तासात झालेल्या हिमस्खलनात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सैन्याच्या चार आणि एका बीएसएफ जवानाचा समावेश आहे. तर पाच नागरिकही यात मृत्युमुखी पडले आहेत.
चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड दरम्यानचा ब्रिटीशकालीन फेररे उड्डाणपूल 16 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी साधारण सहा महिन्यांच्या कालावधी लागणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड परिसरातील वाहनचालकांना मनस्ताप होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड स्थानकादरम्यान असलेला फेररे उड्डाणपूल 1921 साली बांधण्यात आला. धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला हा पूल महिन्यापूर्वी अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला. आता या पुलावर हलक्या वाहनांनाही बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
मंकी हिल आणि कर्जत दरम्यान दक्षिण पूर्व घाटमाथ्यात सुरु होणाऱ्या कामानिमित्त मध्य रेल्वेने पुणे आणि पंढरपूर मार्गावरील काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामामुळे काही गाड्या रद्द होणार असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वे ने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल पुणे-पनवेल (रोज) पॅसेंजर गाडी 16 ते 20 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. यासह सीएसटी-पंढरपूर (त्रि-साप्ताहिक) पॅसेंजर गाडी 16 ते 18 जानेवारीदरम्यान, पंढरपूर सीएसटी (त्रि-साप्ताहिक) पॅसेंजर गाडी 17 ते 19 जानेवारी या काळात बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांनी विनयभंग केलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. ही मुलगी डेहराडून येथे एका ओळखीच्या घरी सापडली आहे. निशिकांत मोरे यांनी या मुलीचा तिच्या वाढदिवसादिवशी विनयभंग केला होता. याप्रकरणी मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन, पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने ही मुलगी निराश झाली होती. या नैराश्यातून तिने आठ दिवसांपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आणि घरातून बेपत्ता झाली होती.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. देशात आजपासून 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर निर्बंध, हॉलमार्कच्या प्रक्रियेसाठी वर्षाची मुदत, नियम मोडल्यास सराफाला 1 वर्षाची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड

2. फास्टॅग स्कॅन न झाल्यास टोलनाक्यावर फुकटात प्रवास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिसूचना, तर फास्टॅग नसल्यास दुप्पट भुर्दंड

3. मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला 46 कोटींचं अनुदान, मुख्यमंत्र्यांची महापौर-ट्रस्टींसोबत, तर शर्मिला ठाकरेंची अजित पवारांसोबत बैठक, अनियमिततेची चौकशी होणार

4. सरकारच्या नावातून शिव शब्द का काढला? जयभगवान गोयल यांच्या वादग्रस्त पुस्तक प्रकरणी टीका करणाऱ्या सरकारला उदयनराजेंचा पलटवार, 'जाणता राजा'वरुन शरद पवारांवरही हल्लाबोल

5. मंदी, बेरोजगारीपाठोपाठ महागाईचा ताप, भाजीपाला, दूध, डाळी, महागल्याने सामान्यांचं बजेट कोलमडलं, 5 वर्षांतील उच्चांकावरुन काँग्रेसचं टीकास्त्र

6. वानखेडे स्टेडियमवर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरचा धुमाकूळ, फिंच-वॉर्नरच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा, कांगारुंची मालिकेत आघाडी

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.