Todays Deadline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  


संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपणार


पत्राचाळ घोटाळााप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपतेय. त्यामुळे आज त्यांना पुन्हा पुढील रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 


बीडच्या  शिरूर कासारमध्ये मोर्चा 
मराठा समाजाला 50 टक्केमधून कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्याच्या मागणी साठी आज शिरूर कासारमध्ये सकाळी 10.30 वाजता मोर्चा होणार आहे.  
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  भंडारा दौऱ्यावर


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला नाना पटोले उपस्थित रहाणार आहेत. 
  
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईनच्या पायाभरणीचा शुभारंभ
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईनच्या पायाभरणीचा शुभारंभ केलं जाणार आहे. याला रावसाहेब दानवे, भागवत कराड उपस्थित रहाणार आहेत. 
 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘महर्षी’ पुरस्कार देण्यात येणार 


नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज दिला जाणार आहे.  पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात होणार आहे. 


मंत्री चंद्रकांत पाटील  सोलापूर दौऱ्यावर


उच्च आणि तंत्रक्षिण मंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आहेत.  जिल्ह्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. 
 
 जामखेडच्या खर्ड्यात आज महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन 
जामखेडच्या खर्ड्यात आज महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन होणार आहे. संभाजीराजे छत्रपतींसह रामायण मालिकेतील कलाकार या रावण दहनासाठी उपस्थित राहणार आहेत. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता, दारिद्रय अशी दहा तोंड असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन होणार आहे. 75 फुटी रावणाची प्रतिकृती असणार आहे.
 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले  जळगाव दौऱ्यावर  


केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.


जोधपूर 
भारतीय हवाई दलात आजपासून लढाऊ हेलीकॉप्टर (एलसीएच) सहभागी होणार आहे. मंत्री राजनाथ सिंग आणि एअर चीफ मार्शल वी आर चौधरी यांच्या उपस्थित आजपासून 10 हेलिकॉप्टर कमिशन होणार आहे.  


 अमित शाह आजपासून जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या व्यस्त कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत.
 
 जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांची  पत्रकार परिषद
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज दुपारी 12.30 वाजता राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेला संबोधित करतील.