Todays Headline 27th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन


भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्या सायंकाळी 6 वाजता पु.ल.देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 


अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार


अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हायकोर्टानं यावर तातडीनं सुनावणी सुरू केली आहे. मंगळवारच्या सुनावणीत देशमुखांच्यावतीनं त्यांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. आज ईडीच्यावतीनं एएसजी अनिल सिंह आपला युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानं हायकोर्ट यावर लवकर निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.


खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर


खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत.  लाखेवाडी येथे  भोंडल्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी निमगाव या ठिकाणी  शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 


भारत आणि दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेला सुरूवात


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (India vs South Africa) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून (28 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानात सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.