मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस 


 विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव असणार आहे. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे सरकारची स्थापना या मुद्यावर आक्रमक होतील. हीच आक्रमकता सभागृहाच्या बाहेरही पाहायला मिळेल. सकाळी दहाच्या आधी विरोधकांचं पाय-यांवर ही आंदोलन होणार आहे. 


आज गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्णाचा जन्मदिवस


आज गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्णाचा जन्मदिवस.  श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
 


आज मुंबईतल्या पहिल्या एसी डबल डेकर बसचं लोकार्पण


बेस्टच्या पहिल्या डबलडेकर एसी बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे.  त्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 


आज  जागतिक हेलियम दिवस'


18 ऑगस्ट हा 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो.


भारत वि.  झिम्बाब्वे  पहिला क्रिकेट सामना


भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून आजपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. केएल राहुलने दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. झिम्बाब्वेविरोधात राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. राहुलने याआधी एका कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. पण अद्याप राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा विजय झालेला नाही. राहुल कर्णधार म्हणून पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.