Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देणार
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांतर निवडणूक आयोगाने दोन्ही  गटांना तीन चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावं देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाने तीन चिन्ह आणि तीन नावे सुचवली आहेत. उद्या शिंदे गट आपले नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्यानंतर दुपारनंतर निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देईल. 


रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन 
मुंबईत रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. मोकळ आयुष्य जगण्यापासून वंचित असलेल्या वृद्धांसाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे. 


दिल्लीत आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक 


आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक आज सकाळी ११ वाजता. होणार आहे. या बैठकीत लालू प्रसाद यादव ८ व्यांदा पक्षाचे अध्यक्ष होतील 


मुंबई गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी 


मुंबई-गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी


मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी होणार आहे. साध्वी प्रज्ञाशी संबंधित महत्त्वाच्या साक्षीदारांची सध्या उलट तपासणी सुरू आहे- अमेय
 


भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर दौऱ्यावर 


भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आज कोल्हापुरात आहेत.  


नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होणार आहे. सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच डीपीडीसीची बैठक होत आहे. नाशिकच्या साधारणपणे ६०० कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती आज उठणार का?  सुहास कांदे यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती.
 
 मनसे नेते अमित ठाकरे हिंगोली  जिल्हा दौऱ्यावर


 मनसे नेते अमित ठाकरे हिंगोली  जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांना ते हजेरी लावतील. तसेच,  नरसी नामदेव आणि औंढा नागनाथ या दोन्हीही ठिकाणी अमित ठाकरे दर्शन घेणार आहेत. 
 
 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला आणि अमरावतीच्या दौऱ्यावर
 
 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला आणि अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहतील. 
 
वर्ध्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी, ओबीसी संघटना व विद्यार्थी सहभागी होणार आहेत, दुपारी १ वाजता. 
 
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते भरुच येथे उद्घाटन होणार आहे, सकाळी ११ वाजता. तसेच अहमदाबाद येथे शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे, दुपारी ३.१५ वाजता. त्यानंतर जामनगर येथे विविध योजनांचं लोकार्पण होणार आहे, संध्याकाळी ५.३० वाजता.