LIVE UPDATES | दिल्लीतील पार्श्वभूमीवर भिवंडी शाहीनबाग आंदोलनात पोलिस दाखल

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2020 11:32 PM
दिल्लीच्या शाहीनबागमध्ये पुन्हा झालेल्या फायरिंगमुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भिवंडीत सुरू असलेल्या भिवंडी शाहीनबाग आंदोलनात पोलीस दाखल झाले आहेत.
रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नीची पोलिसात तक्रार..परिवारावरील संकट दूर करण्यासाठी लाखो रुपयाला गंडा घातल्याची तक्रार.
नाशिक : येवला तालुक्यातील सुकी गावात भाऊ बंदकीच्या वादातून लष्करी सेवेतून सेवानिवृत झालेल्या जवानाने शेतीच्या वादातून गोळी झाडल्याची घटना घडली असून यात परशराम थोरात हा गोळी लागून गंभीर जखमी झालाय. भिमराज थोरात हे लष्करातून निवृत्त झाले असून ते नाशिक येथे राहतात. संध्याकाळच्या सुमारास काका पुतण्यात शेतीच्या जमिनीवरुन वाद झाला आणि सेवानिवृत्त काकाने आपल्या जवळील बंदुकीने परशराम याच्यावर गोळी झाडली. यात परशराम गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणाचा तालुका पोलिस अधिक तपास करीत आहे.
मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात सुरू असलेल्या महिलांचे आंदोलन आज स्थगित करण्यात आल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता.मात्र अजूनही आंदोलन सुरूच असून आता मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी आंदोलनाला जमल्या आहेत.आज या ठिकाणी या महिलांना समर्थन देण्यासाठी अभिनेता सुशांत सिंग देखील उपस्थित होता
जालना : तरुण तरुणीला मारहाण आणि विनयभंग केल्याचे प्रकरण, जालना जिल्हा वकील संघाकडून आरोपीचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय, आरोपी कोर्टात हजर, सुनावणी सुरू
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी रिकव्हर झाल्यानंतर पहिला ट्विट
LIVE UPDATES | अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण...
पंढरपूर : वेळापूर-पुणे रोडवर होंडा सिटी आणि सिमेंट ट्रकची धडक, 5 जणांचा मृत्यू, होंडा सिटी कार बार्शी तालुक्यातील वैराग येथील असल्याची प्राथमिक माहिती
बीड जिल्ह्यातील चारा छावण्यातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जनांची समिती तपास करणार
औरंगाबाद : दरोडेखोर- पोलिसांमध्ये चकमक, दरोडेखोरांची पोलिसांवर दगडफेक, पोलिसांडून हवेत गोळीबार. भेंडाळा शिवारात रात्री दीड वाजताची घटना, एक दरोडेखोर अटकेत
सांगली : कडकनाथ घोटाळा प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक, सातारा जिल्ह्यातील फलटणमधील फूड बर्ड अॅग्रो प्रायव्हेट कंपनीच्या कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणातील एक संशयित आरोपी सचिन बाळासाहेब पाटीलला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, आरोपीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
पालघर : पश्चिम रेल्वेच्या केळवेरोड-पालघरदरम्यान आज 1.10 ते 3.30 वाजेदरम्यान मेगाब्लॉक, अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...




1. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थ संकल्प सादर करणार, मंदी, बेरोजगारी, महागाईत गुरफटलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं आव्हान, अर्थसंकल्पाकडून देशाला मोठ्या आशा

2. जालना विनयभंग प्रकरणी मुख्य आरोपी आतिष खंदारेसह 5 जणांना अटक, माझाच्या बातमीनंतर तपास यंत्रणा कामाला, व्हायरल व्हीडिओवरुन राज्यभरात संताप

3. कोरेगाव-भीमाची चौकशी करणारं आयोग कामकाज गुंडाळण्याच्या मनस्थितीत, सरकार पुरेशी सुविधा पुरवत नसल्याची तक्रार

4. मुस्लीम आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा, तर पदोन्नतीतील आरक्षणावर तोडगा काढण्याची जबाबदरी मुख्य सचिवांकडे

5. बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र, विद्युत विभाग परिवहन विभागाला पोसत असल्याचा ठपका, मुंबई मनपाकडून आरोपांचं खंडन

6. लागोपाठ दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये सुपर विजय; पालघरच्या शार्दूल ठाकूरचा मारा सामन्यात निर्णायक, मालिकेत 4-0 अशी आघाडी

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.