LIVE UPDATES | हिंगोली आजपासून पुढील पाच दिवस बंद

राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात सर्वदूर पाऊस पडेल. आज शुक्रवारी आणि शनिवारी अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबईसह राज्यभरातील पाऊस (Mumbai and Maharashtra Rain Update) कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2020 11:53 PM
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे आणि CEO काहुराज बगाटे यांना कोरोनाची लागण
राज्यात आज 6555 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. एकूण संख्या आता 206619 अशी झाली आहे. आज नवीन 3658 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 86040 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 6555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 3658 रुग्ण कोरोनामुक्त, आज एकूण 151 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर आजपर्यंत 1,11,740 रुग्णांची कोरोनावर मात
हिंगोली शहरातील तलाब कट्टा, गांधी चौक, रिसाला बाजार, या भागामध्ये कोरोणाचे रुग्ण आढळून आले असल्याने हिंगोली नगर परिषद भागात आज पासून पुढील पाच दिवस पूर्णत : बंद करण्यात आले आहे. या कालावधीत केवळ शासकीय कामासाठी तसेच बँकेची रोकड ग्रामीण भागात घेऊन जाण्यासाठी मुभा असणार आहे. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या व्यक्तींनाच शहरात जाता येणार आहे. यापूर्वी जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी पाचपर्यंत चालू करण्यात चालू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळात कोणी विनाकारण रस्त्यावर फिरल्यास कायदेशीररीत्या कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 295 च्या घरात पोहोचली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, आज मातोश्रीवर पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात बदल्यासंदर्भात होणार चर्चा, आज DCP बदल्या स्थगितीनंतर पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विशेष महत्व
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते..त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत..दरम्यान त्यांच्या कुटुंबीयातील इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट केली असता कुटुंबातील आठ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत..
मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी अनेक देश औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप तरी त्यांच्या या प्रयत्नाला यश आले नाही. परंतु, असे असले तरी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी मात्र जलनेती हा उपाय वापरुन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो असा दावा केला आहे.
3 दिवसाच्या आतच मुंबईतील पोलिस उप आयुक्तांच्या बदल्या रद्द.

मुंबई मध्ये 10 पोलीस अशोक उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या...

झालेल्या बदल्या रद्द करून पूर्व ठिकाणी पोलीस उप आयुक्तांना आपल्या जुन्या कर्तव्य ठिकाणी जाण्याचे आदेश

उरण तालुक्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, न्हावा-शेवा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, उरण न्यायालयातील एका पोलीस अंमलदाराला कोरोनाची लागण
सरकारने आदेश दिल्यास मंदिर उघडण्यास अडचण येणार नाही, सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा,
साईसंस्थानने तयारी केलीय पूर्ण,
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी साई संस्थानकडून प्रभावी उपाययोजना,
एका तासात 300 भाविकांना दर्शन देण्याचे नियोजन,
दिवसभरात फक्त 3 ते 3500 भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था,
सरकारच्या आदेशानंतर सुरू होवू शकते साईमंदिर,
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची माहिती
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 च्या परिस्थितीचा घेतला आढावा, कल्याण येथील होली क्रॉस हॉस्पिटलला दिली भेट, हॉस्पिटलमध्ये घेतली आढावा बैठक, बैठकीला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महापालिका आयुक्त, अधिकारी, भाजपचे आमदार होते उपस्थित
अकोल्यात काल दिवसभरातील रुग्णसंख्या 38 वर, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 1703 वर, आज उपचारादरम्यान आणखी एका रूग्णाचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 89 वर, तर 1255 रूग्ण आतापर्यंत झालेत कोरानामुक्त. सध्या 359 रूग्णांवर उपचार सुरू
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा आता 16 जुलै ऐवजी तीन ऑगस्ट पासून घेण्यात येणार आहेत. या संदर्भात विद्यापीठाकडून संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यात कोराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्या त्या परिस्थितीनुसार आणि शासनाच्या आदेशानुसार परीक्षांच्या वेळापत्रकात विद्यापीठाकडून बदल करण्यात आले. 5 जून रोजी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र आता 16 जुलै ऐवजी तीन ऑगस्ट पासून परीक्षांचे नव्याने आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉक्टर अजित पाठक यांनी दिली आहे.
वाशिम :ट्रक कार अपघातात तिघांचा मृत्यू, वाशिमच्या मालेगाव मेहकर मार्गावर चांडस नजीक घटना, मृतक वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे येथील, मृतकांमध्ये एक महिला, दोन पुरुषांचा समावेश
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 128 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, त्यामध्ये 65 पुरूष, 63 महिला आहेत, आतापर्यंत एकूण 6641 कोरोनाबाधित आढळले असून 3241 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 300 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3100 रुग्णांवर उपचार सुरू .
पालघर - जव्हार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा न्याहाळे येथील एका शिक्षकाने काही दिवसांपूर्वी शाळेत जाऊन 106 विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केले होते. तो शिक्षक पॉझिटिव्ह आला आणि एकच खळबळ उडाली यात चार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली तर यातील तीन कर्मचारी व एक पालक अशा आठ जणांचे अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे. लागण झालेला शिक्षक एका प्रतिबंधित इमारतीत राहत होता पूर्वी त्या इमारतीत एक रुग्ण आढळून आला होता. त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्यांला गावाकडे जायचे म्हणून तपासणी केली तो पॉझिटिव्ह आला, याच दरम्यान हा शिक्षक त्यांच्या संपर्कात आला असे संपर्कातून संपर्क होत गेला आणि न कळता शाळेत पुस्तके वाटप करण्यात आले. त्यातूनच कोरोनाचा फैलाव वाढला आहे.
ग्रामीण अदिवासी भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यात आश्रमाशाळेत आदिवासी विद्यार्थीना पुस्तक वाटप करण्यात आले, ही गंभीर बाब असून यामुळे ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. आजतागायत ते १०६ विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय असे एकूण २५० व्यक्तींची चाचणी पूर्ण झाली असून, यातील ४ विद्यार्थ्यांना लागण झाली असून हे सर्व विद्यार्थी १४ ते १५ वयोगटातील आहेत, तसेच शाळेतील तीन कर्मचारी व एक पालक असे एकूण आठ व्यक्तिंना लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून संपर्कातून संपर्क असे पुढील तपास सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
धुळे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 24 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या1 हजार 248 वर पोहोचलीय . शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात 24 रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यात धुळे शहरातील 20, धुळे ग्रामीण मधील 1 तर शिरपूर मधील 1, शिंदखेड्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे .
परळी आजपासून 8 दिवस लॉकडाऊन, काल परळी शहरातील शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियातील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परळी शहर पुढच्या 8 दिवसांसाठी संपूर्ण लॉक डाऊन असेल. 12 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय मध्यरात्री जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला आहे..

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाण्याच्या शेगाव इथं गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी जमते. गजानन महाराजांना गुरू मानत दर्शनाकरता शेगावी भाविकांची गर्दी होत असते. वर्षभराचे दिवस आनंदित जावे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूला नमन करून नवीन वर्षाची सुरुवात करावी हा उद्देश ठेऊन भाविक मोठ्या प्रमाणावर शेगाव इथं येतात. मात्र,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज मंदिर बंद आहे. पहिल्यांदाच शेगाव इथं गुरुपौर्णिमाला गजानन महाराज मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.गुरुपौर्णिमेला मंदिर परिसर गर्दीने फुललेला असतो मात्र,आज रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळतोय.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार आहे. महापौरांना ताप आल्यानंतर त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार आहे. महापौरांना ताप आल्यानंतर त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
आत्ता आलेली वीजबिले ही अंदाजित आहेत. जेव्हा प्रत्यक्ष मीटर तपासले जातील. तेव्हा यातील वीजबिलातील तफावत ग्राहकांना व्याजासकट परत पाठवली जाईल : बेस्ट
औरंबादमध्ये कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारासंबंधात औरंगाबाद खंडपीठ सुमोटो याचिका दाखल करत माहिती घेतली. यावेळी प्रशासनाला काही सुचना देखील कोर्टाने दिल्यात.
पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का. शिवसेनेच्या 5 नगरसेवांचा राष्ट्रवादीत प्रवेश. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी केला प्रवेश. पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का.
भूमीपुत्रांसाठी रोजगाराची संधी; स्थलांतरित मजुरांमुळे पायाभूत प्रकल्पांची विकासकामं रखडली. यासाठी राज्यातील तरुणांना रोगाराची मोठी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. एमएमआरडीए कंत्राटदारांकडील 17 हजार पदांच्या भरतीसाठी 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे भरणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज वरिष्ठ विधीज्ञांसमवेत बैठक झाली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

येत्या मंगळवारी न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपिठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही सुनावणीच्या अनुषंगाने यावेळी विस्तृत चर्चा झाली. शनिवारी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी, परमजितसिंग पटवालिया, विजयसिंह थोरात, अनिल साखरे सहभागी झाले होते.
सोलापुरात तूर्तास पुन्हा लॉकडाऊन नाही, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण, 'चर्चा करून निर्णय घेऊ' लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाल्यास किमान 5 दिवस आधी सांगू.
महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पनवेलमध्ये पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीची घेतली गंभीर दखल. रायगड एसपींना प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधीत आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरातील कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. एमआयडीसी परिसरात कामगार वस्तीमध्ये आजपासून 12 जुलैपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त आढावा घेत आहेत. बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, तिसगाव, सिडको वाळूज महानगर, साजापूर, रांजणगाव आणि साऊथ सिटी या गावांमध्ये संचार बंदी असेल. या संचारबंदीमधून कारखाने, दूध, दवाखाने आणि मेडिकल यांना सूट देण्यात आली आहे.
सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. आयकर परताव्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पुण्यात रात्रभरात 198 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 26341 वर आतापर्यंत 822 कोरोनाबाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 16156 वर
जालना जिल्ह्यातील मंठा येथे नवविवाहित्येच्या निर्घृण हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाऊन पीडित गोरे कुटुंबाला न्याय देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय, या संबंधीचे ट्विट करूनत्यांनी ही माहिती दिलीय, कालच या परिवाराची राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी केली होती...30 जून रोजी वैष्णवी गोरे या नुकताच विवाह पार पडलेल्या तरुणीची तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने भर बाजारात चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली होती.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 78 पुरूष, 60 महिलांचा समावेश. आतापर्यंत एकूण 6402 कोरोनाबाधित आढळले असून 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत
मंत्र्यांच्या आलिशान गाड्यांवर उधळपट्टी करणारे सरकार असंवेदनशील आहे. एकीकडे सरकारी कर्मचारी, कोविड योद्धे डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलिसांना पूर्ण पगार देत नाही आणि मंत्र्यांना गाड्या घेतात हे अव्यवहार्य आहे - विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका
सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणे बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन कंपन्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात बहुतांश जिल्ह्यातून सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी आल्या होत्या यात एकट्या बीड जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगानं ग्रीन गोल्ड कंपनीवर परळीमध्ये तर जानकी व यशोदा या कंपन्यावर बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याच अनुषंगानं परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सीड्स औरंगाबादच्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे

याच प्रमाणे बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये अकोल्याच्या जानकी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड व हिंगणघाट वर्धा इथल्या यशोदीप हायब्रीड सीड्स या कंपन्या वरती सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार वस्तीमध्ये संचार बंदी, आजपासून 12 जुलैपर्यंत ही संचार बंदी असणार आहे. वाळूज औद्योगिक नगरीत कोरोनचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या परिसरातील बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी , तिसगाव, सिडको वाळूज महानगर ,साजापूर, रांजणगाव आणि साउथ सिटी या गावांमध्ये संचार बंदी असेल. या संचारबंदीमधून कारखाने, दूध ,दवाखाने आणि मेडिकल यांना सूट देण्यात आली आहे.
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार वस्तीमध्ये संचार बंदी, आजपासून 12 जुलैपर्यंत ही संचार बंदी असणार आहे. वाळूज औद्योगिक नगरीत कोरोनचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या परिसरातील बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी , तिसगाव, सिडको वाळूज महानगर ,साजापूर, रांजणगाव आणि साउथ सिटी या गावांमध्ये संचार बंदी असेल. या संचारबंदीमधून कारखाने, दूध ,दवाखाने आणि मेडिकल यांना सूट देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड : माजी विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन. साने यांना 25 जूनला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुरुवातील काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं आढळत होती, पण नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना साने यांना कोरोनाची लागण झाली होती.
मे 2020 च्या सीए परीक्षा रद्द, आता नोव्हेंबर 2020 ला पुढील सीए परीक्षा होणार, सीए इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ट्विटरवरुन माहिती

पार्श्वभूमी

पुणे : यंदा वेळेवर आलेल्या मान्सूनचा काही काळ खंड पडला. मात्र थोड्याशा खंडानंतर अरबी समुद्रात मान्सूनला पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय.

पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात सर्वदूर पाऊस पडेल. आज शुक्रवारी आणि शनिवारी अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे. सहा आणि सात तारखेनंतर पावसाचा प्रमाण कमी होईल. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तास जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात अनेक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडेल. पाच तारखेला नंतर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर पुढील 48 तासात नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे.
पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. माञ घाट माथ्यावर पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा आहे. तर पाच, सहा आणि सात तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. माञ पाच ते सात तारखेला घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय.तर मराठवाड्यात ही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद आणि लातूरला आज शुक्रवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात आज शुक्रवारी अनेक ठिकाणी पाऊसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. चार ते सात तारखेपर्यंत चार दिवस सर्वदूर पाऊस पडेल. मात्र सहा आणि सात तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.