LIVE UPDATES | वणी तालुक्यातील डोरली गावाच्या नाल्याला आलेल्या पुरात 3 जण वाहून गेले

जगभरात कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात एक कोटी 21 लाख 55 हजार कोरोनाबाधिता आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूची संख्या 5 लाख 51 हजार वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 70 लाखांहून अधिक लोकं कोरोनामुक्त झाली आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,158,726 कोरोनाबाधित आहेत. अमेरिकेत 134,853 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. तर ब्राझिल दुसऱ्या नंबरवर असून 1,716,196 लोकं तिथं बाधित झाली आहेत. तर 68,055 लोकांचा मृत्यू झालाय. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 769,052 कोरोनाबाधित आढळले आहेत तर आतापर्यंत 21,144 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jul 2020 09:02 PM

पार्श्वभूमी

जगभरात कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात एक कोटी 21 लाख 55 हजार कोरोनाबाधिता आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूची संख्या 5...More

शिराळा तालुक्यातील शंभरी पार केलेल्या वृद्धाला 27 जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्‍यानंतर त्‍यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. दरम्‍यान, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यापूर्वी या रुग्णालयातील 94 वय असणाऱ्या एका वृद्ध महिलेनेही कोरोनावर मात केली होती. त्यानंतर या दुसऱ्या वृद्धाने कोरोनावर मात केली आहे. यामुळे योग्‍य उपचारातून कोरोनावर मात करता येते हे दिसून आले आहे. मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून कोरोना बाधित आणि संशयित असणाऱ्या रुग्णांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात सुमारे पंधरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या या रुग्णालयात 80 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.