LIVE UPDATES | आज राज्यात 5024 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 2362 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात काल विक्रमी 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. काल 3 हजार 661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 77 हजार 453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 63 हजार 343 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 192 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 6 हजार 931 लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Jun 2020 08:24 PM
आज राज्यात 5024 नवीन रुग्णांची नोंद, 2362 रुग्ण कोरोनामुक्त तर आजपर्यंत 79,815 रुग्णांची कोरोनावर मात, तर आज 175 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
मनमानी करणाऱ्या गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारकडून अखेर चाप, घर कामगार व वाहन चालक यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याबाबत सहकार विभागाने जरी केले परिपत्रक, लॉकडाऊनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवाशी आणि घर कामगारांचे होत होते हाल, मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचे केले स्पष्ट, तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मनमानी नियम तयार करू नये अशा स्पष्ट सूचना सरकारने गृह निर्माण संस्थांना दिल्या आहेत.
अकोल्याचे वादग्रस्त जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली. मुली बेपत्ता प्रकरणातील बेपर्वाई आणि वादग्रस्त कारभार भोवला. 28 फेब्रूवारीला गृहमंत्र्यांनी केली होती अधिवेशनात बदली. तब्बल तीन महिन्यांनंतर अधिक्षक गावकरांच्या बदलीवर कारवाई. 'एबीपी माझा'नं लावून धरलं होतं प्रकरण. जी. श्रीधर अकोल्याचे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे भीषण कार अपघात. पाच जणांचा जागीच मृत्यू, दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश. मुंबईहुन सुरतकडे जाणारी वॅगणार कार डीवाइडरला धडकून विरुद्ध वाहिनीवर गेल्याने घडला भीषण अपघात. तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल.
नवी मुंबईत 29 तारखेपासून शहरात लॉकडाऊन लागू होणार. शहरातील 44 कंटेनमेंट झोनमध्ये 7 दिवसांचा लोकडाऊन असणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत निर्णय. लॉकडाऊन काळात घरोघरी मास स्क्रिनिंग होणार.
29 जून ते 2 जुलैपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदीचा प्रस्ताव. कोणी शहरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास होणार गुन्हे दाखल.
यंदा आषाढी यात्रा नसल्याने शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान कोरोनविरोधात जीव धोक्यात घालून काम करणारे सफाई कर्मचारी दाम्पत्यास देण्याची नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केली प्रशासनाकडे मागणी
मुंबई : एस.टी. महामंडळ प्रशासनाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी केवळ 50 टक्के वेतन अदा करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आता महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉंग्रेस संघटनेने विरोध दर्शवला आहे. संघटनेच्या वतीने विरोध करणारं पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अँड.अनिल परब यांना पाठवण्यात आलं आहे. तसेच पत्रामध्ये कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार देण्यासाठी 1000 कोटींचे अनुदान एस.टी. महामंडळाला द्या अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पत्रामध्ये देशातील इतर राज्यांप्रमाणे प्रवाशी कर 17.5 टक्के ऐवजी 7 टक्के आकारण्यात यावा. महाराष्ट्र राज्यातील सर्व टोल टँक्स माफ करण्यात यावा. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
जालना : जिल्ह्यात 6 राज्य राखीव दलाच्या जवानांसह रात्रीतून 18 जणांना कोरोनाची लागण झालीय, काल 75 जणांच्या स्वॅबचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते त्यातील 18 जणांचे आज अवहाल पॉझिटिव्ह आलेत, यापैकी सहा जवान हे जालना एसरपीएफचे आहेत, जिल्ह्यात आता कोरोनाचा आकडा 425 वर पोहचला असून 13 जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर आजवर 287 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 146 वी जयंती...पण कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे ही जयंती कोल्हापूरमध्ये अत्यंत साधेपणाने करण्यात आलीय.. आज कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शाहू जयंती सोहळा पार पडला... कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये येऊन मान्यवरांनी शाहु महाराजांना अभिवादन केलं... या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर मधल्या दसरा चौकातील शाहू महाराज यांचा पुतळाही सजवण्यात आला असून दरवर्षी या जयंतीच्या निमित्ताने मिरवणुका आणि शोभा यात्रांचे आयोजन केलं जातं... पण यंदा साधेपणाने शाहू जयंती साजरी करण्याचा निर्णय करवीरवासियांनी घेतला...
कर्नाटकातील वर आणि कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील वधू यांच्या लग्नाचा सोहळा काही नातेवाईकांच्या उपस्थितीत कर्नाटकात आयोजित केला होता. दोन्ही बाजूंनी सर्व परवानगी काढली होती. पण महाराष्ट्रातील वधूला कर्नाटकात सकाळी 7 पासून प्रवेश मिळेना. आता नवऱ्याला सीमेवर बोलवून हायवेवर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काही वेळात नवरा मुलगा आल्यावर लग्न सोहळा होईल
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्याही अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री कार्यालयाची ट्वीटद्वारे माहिती, मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय

वारी पंढरीची : कोरोनाच्या सावटाखाली पार पडत असलेल्या जगद्गुरु संत तुकोबांच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडलं. पालखी सोहळा देहूनगरीत मुक्कामी असताना हे कसं पार पडलं असा प्रश्न वारकरी संप्रदयांसह अख्ख्या महाराष्ट्राला पडला असेलच. तर परंपरेनुसार जिथं नीरा स्नान पार पडायचं तिथून देहू संस्थानने रात्रीतच हंडाभर पाणी आणले आणि तुकोबांच्या मंदिरा लगतच्या इंद्रायणी नदीत हा सोहळा पार पाडला. तुकोबांच्या पादुका मंदिरातून इंद्रायणी नदीत नेहण्यासाठी फुलांच्या पायघड्या ही टाकण्यात आल्या होत्या. इंद्रायणी नदीत आरती आणि विधिवत पूजा पार पडल्या. कोळी समाज त्यांच्या होडीतून पालखी नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेंव्हा इथं पादुकांना स्नान घालण्यात यायचं. तेंव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाल्याचं समोर आलं आहे.कोरोना बाधितांची संख्या 17 हजार 296 ने वाढली तर मृतांचा आकडा 401 ने वाढला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 90 हजार 401 झाला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 85 हजार 637 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 58.24 टक्क्यांवर आला आहे.
औरंगाबादमध्ये वाळूज भागातील बजाज कंपनीत 79 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बजाजकडून दोन दिवस कंपनी बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.
गोव्याच्या धर्तीवर आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर देखील बीच शॅक्स उभारले जाणार आहेत. त्यामुळ कोकणातील पर्यटनाला तर चालना मिळणार आहे. शिवाय, स्थानिकांना देखील रोजगार निर्मिती होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे आणि गुहागर या ठिकाणी 1 सप्टेंबर 2020पासून हे बीच शॅक्स उभारले जाणार आहेत. त्यामुळे या बीचसवर पर्यटकांना मर्यादित स्वरूपात बिअर, जेवण, चहा आणि नाश्ता मिळणार आहे.
वाशिम जिल्ह्यात काल रिसोड तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होतं धुवादार बरसल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकतीच शेतकऱ्यांना पेरणी आटोपली होती आता पंचनामे झाल्यावर शेतीचं किती नुकसान झालं आहे त्याची सविस्तर माहिती मिळेल.
मुंबईतील नामवंत झेवीयर्स महाविद्यालयात कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुलभ कशी होईल याचा विचार केला गेला आहे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञनाचा वापर करण्याचा झेवीयर्स महाविद्यालयाने ठरवलं असून देशातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षा देऊन या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. बीएमएम, बीएमएस, एमएस्सी, एम सायकॉलॉजी आणि इतर दोन अभ्यासक्रमासाठी एक अजेंन्सी नेमून त्याद्वारे जुलै महिन्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून त्यात सॉफ्टवेअरमध्ये डोळ्यांच्या व इतर हलाचलीद्वारे कमांड देऊन विद्यार्थी लॉग इन करू शकतील व ही प्रवेश परीक्षा सुलभतेने देऊ शकतील शिवाय यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट सुद्धा ऑनलाइन सबमिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यात काल दिवसभरात 10 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची रुग्णसंख्या 72 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात जनता कोरोनाचा संकटात असताना विद्युत मंडळाचा महावितरण कंपनीने घरगुती विजेची बिले अवाजवी पाठवून लोकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम सुरु केले आहे, खरं तर लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण वीजबिल सरकारने माफ करायला हवीत? शिवसेना नेते खासदार संजय राऊत सामनातून केंद्र सरकारचा इंधन वाढीवर लिहतात, मग विजेच्या अवाजवी बिलावर का लिहत नाही? असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे .
हिंगोली : हिंगोली च्या औंढा तालुक्यातील वसई मार्गावरील असेल्या मोतना नदीवरील डांबरी रस्त्यासह सिमेंट फूल वाहून गेल्याने या मार्गावरील दहा गावांचा संपर्क तुटला आहे.पूर, कंजारा, जांगव्हाण, रेणापूर, पिंपळदरी, आमदरी, नांदापूर, इतर ही गाव संपर्कहीन झाली आहेत. पर्यायी मार्ग नसल्याने या गावातील नागरिकांना रात्रीपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या भागातील अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात शेतकरी आंदोलक झाले आहेत. या भागातील सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नोकरीचा प्रश्न चिघळला आहे. गेली अनेक वर्षे धोपटाळा प्रकल्पग्रस्तांनी पाठपुरावा व निवेदने करून आपले प्रश्न व्यवस्थापनापुढे मांडले होते. मात्र कोळसा खाण व्यवस्थापनाने या मागण्या गांभीर्याने न घेतल्याने आता शेतकरी संतापले आहेत. कोळसा खाणीच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयापुढे असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक शेतकऱ्यांमध्ये मारोती मावलिकर -संजय बेले- विलास घटे यांचा यात समावेश आहे. दरम्यान या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कोळसा खाण व्यवस्थापन व आंदोलक शेतकरी यांच्यात बातचीत करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोळसा खाणीचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रकल्पग्रस्तांना अभद्र वागणूक देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या या मनमानी कारभाराविरोधात धोपटाळा खाण प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या भूमिकेत आल्याने खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला मदतीचा हात

करोना महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. असाच मदतीचा हात पुढे करत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला सहकार्य केले आहे.

‘बिग बाज़ार’चे १५०० रुपयाचे ५०० कूपन्स अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केले आहेत. नुकतेच महामंडळाच्या ५०० सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले. या कूपन्स अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

या मदतीबद्दल 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.
1 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यानच्या प्रवासासाठी नियमित वेळेत ठरलेल्या सर्व गाड्यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहे : रेल्वे प्रशासन'
या वर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार तात्याराव लहाने यांना घोषित. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुरस्कार जाहीर केला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पुरस्कार वितरण सोहळा होणार. यंदाचा हा 35 वा राजर्षी शाहू पुरस्कार आहे. 1 लाख रोख रक्कम आणि मानपत्र असं पुरस्काराचे स्वरूप.

चीन नेपाळ पाठोपाठ आता भूतानकडून भारताची अडवणूक, आसाममध्ये येणारं कालव्याचं पाणी रोखल्याने धान पीक संकटात.
आज मंगळवार दि 25 जून मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय

1.महाराष्ट्र राज्य व्यवसाय,व्यापार,आजिविका व नोक-या यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर(सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

2.महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

3.रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ.

4.हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.

5.माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण - २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ.

6.कोविड-१९ च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.

7.राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी.समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार.

8.नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.

9.आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ.राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा.

10. एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार

11 गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना

12. कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता
येत्या 28 जूनपासून सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. फक्तं केस कापण्याची परवानगी असेल. दाढी करण्याची परवानगी सध्या नाही. केस कापणाऱ्याने आणि कापून घेणारे दोघांनाही मास्क बंधनकारक असेल, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती.
सीबीएसईच्या 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द, CBSE ने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
नागपूरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत एका गुन्हेगाराने रस्त्यावर पळवत एका महिलेची हत्या केली आहे. नंदनवन परिसरात आरती गिरडकर या महिलेची अनेकांच्या देखत गुंड वृत्तीच्या बंटी टापरे याने हत्या केली. पोलीस जरी या मागे पार्किंगचा वाद असल्याचे सांगत असले तरी नातेवाईकांनी या घटनेमागे आरोपीच्या नेहमीच्या गुन्हेगारीच्या कृत्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई न करणे हे कारण असल्याचे आरोप केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांनी काल पंढरपूर येथे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकाणी आंदोलने सुरु केली होती. बारामती शहर पोलीस ठाण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्याविरोधात तक्रार दाखल कारण्यात आली होती. त्यानुसार युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात 502/ 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारो वाईन प्रेमींचा सुला फेस्ट 2021 रद्द, सुला विनयार्डची घोषणा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नाशिकच्या सुला विनयार्ड मध्ये साजरा होत असतो सुला फेस्ट, देश विदेशातील हजारो वाईन प्रेमीची असते हजेरी, भारतीय आणि विदेशी कलाकारांचे सादरीकरण मुख्य आकर्षण, 14 वर्षात प्रथमच खंड
गलवान घाटीमध्ये नदीवरील पुलाचे काम सुरू असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात भारतीय लष्करातील 2 जवान पाण्यात पडल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. सचिन मोरे हे 115 इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये काम करीत होते. आज सकाळी त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली. सचिन मोरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुली, आई वडील असा परिवार आहे. मोरे यांची एक वर्ष सेवा बाकी होती. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच साकुरी गावावर शोककळा पसरली आहे

पुणे : पुण्यात हॉटेल व्यवसायकाची आत्महत्या, प्रेमनाथ शेट्टी या हॉटेल व्यवसायिकाची आत्महत्या, धायरी परिसरातील राज या हॉटेलच्या मॅनेजरची आत्महत्या, प्रेमनाथ शेट्टी या या 43 वर्षीय हॉटेल व्यावसायिकांना सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केली, शेट्टी यांनी हॉटेल भाड्याने घेतलं असून तो या हॉटेलचा मॅनेजर होता.

प्राथमिक अंदाजानुसार मानसिक नैराश्यामुळं आत्महत्या केल्याची माहिती
येत्या संपूर्ण वर्षासाठी आयआयटी मुंबईने क्लासरुम लेक्चर्स रद्द केले, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्णय, वर्षभर क्लासरुम लेक्चर रद्द करणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही देशातील पहिली मोठी शैक्षणिक संस्था बनली आहे.
नाशिक महापालिकेची आजची ऑनलाईन महासभा रद्द, शहरात लॉकडाऊन लागू करावा या मागणीसाठी विशेष सभेत होणार होती चर्चा, वाढत्या कोरोना बधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर होणार होती सभा, लॉकडाऊनला राज्य सरकार कडून परवानगी नसल्यानं महासभेत होणार होती चर्चा, मनपा मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्यानं सभा रद्द, इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सभा रद्द, महापालिकेच्या 23 कर्मचाऱ्यांना कोरोना, मनपा मुख्यालय मधील 5 कर्मचारी, सातपूर विभागीय कार्यालय 7, डॉ झाकीर हुसेन रुग्णालय 8, मोरवाडी रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांना लागण
कोल्हापूर - 1 जुलै पासून मुंबई विमानसेवा सुरू होणार ,

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवाही एक जुलैपासून ,

लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद होती विमानसेवा ,

Tru जेट आणि इंडिगो या कंपन्यांची विमानसेवा ,

मुंबई आणि तिरुपतीसाठी ऑनलाईन बुकींग सुरू,
दिव्या खोसला कुमारचा जोरदार पलटवार.
अबू सालेम आणि सोनू निगमचे संबंध असल्याचा आरोप. तपास करण्याची मागणी. सोनूच्या पत्नीने सोनूवर केलेल्या आरोपांची करून दिली आठवण.
सोनूच्या व्हिडिओमुळे आपल्याला पतीला आणि मुलाला मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या येत असल्याचा केला उच्चार.
कॅम्पेन तातडीने बंद करण्याची ताकीद.
मारीना कुंवरचे आरोप फेक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ,

कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले तर मृतांचा आकडा 418 ने वाढला,

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 73 हजार 105, त्यापैकी एकूण 2 लाख 71 हजार 697 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 57.42 टक्के,

सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 86 हजार 514,

गेल्या 24 तासांत 13 हजार 012 रुग्ण बरे झाले, 418 मृत्यूमुखी,

देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 894 वर
मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई मनपाने क्लिनअप मार्शल नेमले आहेत. मात्र मुंबईकरांना शिस्त लावण्याऐवजी या क्लिनअप मार्शलच्या रोजच गुंडगिरी आणि लूटमारीच्या घटना समोर येत आहे. मुंबई पूर्व उपनगरात तर या क्लिनअप मार्शल्सनी आपली दहशतच जणू निर्माण केली आहे. या क्लिनअप मार्शलच्या गुंडगिरीचा फटका आज एबीपी माझाचे रिपोर्टर निलेश बुधावले आणि कॅमेरामॅन मनोज जैस्वाल यांना बसला आहे. सायन पनवेल महामार्गावर एका क्लिन अप मार्शलने या दोघांना शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा आणि मनोज जैस्वाल यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मानखुर्द पोलिसांनी फरीद रहीम शेख या क्लिनअप मार्शलला बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात 1 जून ते 24 जून दरम्यान एकूण 39 आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : पहिल्या वहिल्या ऑनलाईन कॅरम स्पर्धेकरता रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदमची निवड झाली आहे. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.15 वर्षीय आकांक्षा उदय कदम ही या स्पर्धेतील सर्वात कमी वयाची कॅरमपट्टू आहे. विशेष म्हणजे ती महिला वरिष्ठ गटातून या स्पर्धेत खेळणार आहे. यापूर्वी मालदीव येथे झालेल्या स्पर्धेत भारताला तिने पदार्पणातच सुवर्ण पदक मिळवून दिले होते.
नागपुरातील नंदनवन भागात एका महिलेची हत्या करण्यात आली. आरती गिरडकर असे मृत महिलेचं नाव आहे. आरोपी बंटीने धारधार शस्त्राने वार करून आरती यांची काल रात्री हत्या केली. पार्किंगच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.आरोपी बंटीला पोलिसांनी अटक केली असली तरी तो गुन्हेगार वृत्तीचा असून त्याच्यावर या पूर्वीही गुन्हे दाखल आहेत. नागपूरात 1 जूनपासून आतापर्यंत हत्येची ही पंधरावी घटना आहे.
नागपुरातील नंदनवन भागात एका महिलेची हत्या करण्यात आली. आरती गिरडकर असे मृत महिलेचं नाव आहे. आरोपी बंटीने धारधार शस्त्राने वार करून आरती यांची काल रात्री हत्या केली. पार्किंगच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.आरोपी बंटीला पोलिसांनी अटक केली असली तरी तो गुन्हेगार वृत्तीचा असून त्याच्यावर या पूर्वीही गुन्हे दाखल आहेत. नागपूरात 1 जूनपासून आतापर्यंत हत्येची ही पंधरावी घटना आहे.
सर्व काही सुरळीत होत असताना परभणीत एकाच दिवशी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 102 वर गेला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून परभणी शहर आणि पाच किलोमीटरच्या परिसरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या तीन दिवसात केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आजपासून 27 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परभणीकरांना घरात बसावे लागणार आहे.
सर्व काही सुरळीत होत असताना परभणीत एकाच दिवशी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 102 वर गेला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून परभणी शहर आणि पाच किलोमीटरच्या परिसरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या तीन दिवसात केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आजपासून 27 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परभणीकरांना घरात बसावे लागणार आहे.
भंडारा - दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पवनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने अटक केली. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सावरला गावातून दारु नेण्यात येत होती
औरंगाबादमध्ये काल एका दिवसात 200 कोरोनाबाधित रुग्ण वाढले तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 112 आणि ग्रामीण भागातील 88 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 4036 कोरोनाबाधित रुग्ण असून 2217 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1601 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 218 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांचा आचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे आस्तिक कुमार, त्यांच्या पत्नी औरंगाबाद ग्रामीणच्या एसपी मोक्षदा पाटीलही होम क्वॉरन्टाईन झाल्या आहेत. त्यांच्यासोबतच आणखी 36 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात काल विक्रमी 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. काल 3 हजार 661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 77 हजार 453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 63 हजार 343 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 192 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 6 हजार 931 लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.