LIVE UPDATES | महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची वर्णी, अजाॅय मेहता यांना मुदतवाढ नाही

मुंबई : काल 24 जून रोजी, चोवीस तासात देशामध्ये 15 हजार 968 रुग्णांची वाढ झाली आहे. तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा 15 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण वाढले आहेत. याआधी, शनिवारी दिवसभरात 15 हजार ४१३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या चोवीस तासांमध्ये 465 मृत्यू झाले असून एकूण मृत्यू 14 हजार 476 झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या अपडेटसह अन्य महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jun 2020 07:31 AM
औरंगाबाद : काल एका दिवसात वाढले 200 रुग्ण तर 12 रुग्णाचा मृत्यू, औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 112 आणि ग्रामीण भागातील 88 कोरोनाबाधित रुग्ण, आतापर्यंत जिल्ह्यात 4036 कोरोनाबाधित रुग्ण, 2217 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले, 1601 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू , आज पर्यंत 218 रुग्णांचा मृत्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारच्या घरात कोरोनाचा शिरकाव. मातोश्रीच्या शेजारचा बंगला नंबर 26 मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण. मुख्यमंत्र्यांचा शेजारचा बंगला पालिकेकडून सील.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची वर्णी, अजाॅय मेहता यांना मुदतवाढ नाही, मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी मेहतांना संधी मिळण्याची शक्यता
परभणी शहरात पुन्हा संचारबंदी आदेश लागू, आज मध्यरात्रीपासून 27 जूनपर्यंत संचारबंदी लागू, परभणी शहर आणि 5 किलोमीटर परिसरात संचारबंदी, आज एकाच दिवशी 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने निर्णय, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आदेश
गोपिचंद पडळकर यांची व्हिडीओ, ऑडिओ क्लीप चेक करा. पोलीस महासंचालकांना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे आदेश. आक्षेपार्ह विधान असेल तर पुढील कारवाई करू, शंभुराज देसाई यांची पत्रकार परिषदेत ग्वाही.
विठ्ठल महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याची पूजा करण्याचा मान आहे. तिसऱ्या व्यक्तीने सल्ला देणे योग्य नाही. विठ्ठलाची पूजा करणे हा मुख्यमंत्र्यांचा नुसता मान नाही तर प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांनी येऊ नये ही भूमिका चुकीची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढीला विठ्ठलाची पूजा पहिली करावी की दुसरी करावी याचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
आमदार गोपीचंद पडळकर तुम्ही स्वतःहून क्वॉरंटाईन व्हा, अन्यथा राष्ट्रवादीच्या महिला तुम्हाला कम्पल्सरी क्वॉरंटाईन करतील, शरद पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांचा इशारा
एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे 50 टक्केच वेतन मिळणार. उत्पन्न घटले, प्रवासी नाहीत. डिझेल भाडेवाढ ह्या कारणांमुळे 50 टक्के वेतन देण्याचा निर्णय.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय कडून चौकशी करण्याची मागणी प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी केली आहे.
कोरोना संसर्गावरील औषधावरुन पतंजली नव्या वादात, कोरोना किट लाँच करेपर्यंत आयुष मंत्रालयाला माहिती नसल्याचं स्पष्ट, रामदेवबाबांकडून मंत्रायलयाच्या पोचपावतीचं ट्वीट
पंढरीच्या विठ्ठलाला वज्रलेपनाची प्रक्रीया पूर्ण, औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाकडून चौथ्यांदा देवाच्या मूर्तीला वज्रलेपाची प्रक्रिया
औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण. आस्तिक कुमार होम क्वॉरंटाईन.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक मात्र, ते आमचे शत्रू नाही, असे शब्द वापरणं चुकीच : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस
खासगी रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी बसवण्याची गरज, त्यामुळे खासगी रुग्णांलयांवर नियंत्रण ठेवता येईल. शासकीय दराव्यतिरिक्त दर आकारत असतील तर तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू होणे गरजेचं आहे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर : 1 जुलैपासून ताडोबामध्ये पुन्हा पर्यटनाला सुरुवात होणार असून बफर क्षेत्रातील 13 प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक गेटमधून सकाळी आणि दुपारी सोडणार 6-6 जिप्सी सोडण्यात येणार आहेत. 18 मार्चपासून कोरोनामुळे ताडोबातील पर्यटन बंद आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुवारी सकाळी आंदोलन करणार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय आक्षेपार्ह्य भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असं वक्तव्य करणं, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का असा प्रश्न राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी सांगितलं आहे. तसेच हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

अकोल्यात आणखी 54 नवे रूग्ण आढळले आहेत. रुग्णांमध्ये 18 रुग्ण जिल्हा कारागृहातील कैदी आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा आता 1298 वर पोहोचला आहे. तर रात्री तीन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 70 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 832 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 396 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. शहरात पोलिस पेट्रोलिंग करत असताना आरोपी सापडले. शहरातील माळेगाव रोडवर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. राजेंद्र सर्जेराव भंडलकर आणि प्रतिक भालचंद्र शिंदे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
जालना : बोगस बियाणे कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी खदानीच्या पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले आहे. महामंडळाच्या बोगस बियाणां विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून कारवाईची मागणी करत परतूर तालुक्यातील खडकी गावातल्या खदानीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
बुलडाणा : आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बुलडाण्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील बुलडाणा चिखली, मेहेकर, साखरखेरडा, हातनी, मालगनी या भागात दमदार पाऊस झाला असून या पावसाने जिल्ह्यातील शेतकरी काही प्रमाणात सुखावला आहे.
अकोला जिल्हा कारागृह कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. तब्बल 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून जिल्हा कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा कारागृह सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
टी सीरिजचा मनसेकडे माफीनामा, पाकिस्तानी गायकांची गाणी काढली, अतिफ अस्लमचे किन्ना सोना हे गाणे यू ट्यूबवरुन हटवले, यापुढे पाकिस्तानी गायकांना न घेण्याबद्दल पत्र दिलं, अमेय खोपकर यांची फेसबुक लाईव्ह माहिती
टी सीरिजचा मनसेकडे माफीनामा, पाकिस्तानी गायकांची गाणी काढली, अतिफ अस्लमचे किन्ना सोना हे गाणे यू ट्यूबवरुन हटवले, यापुढे पाकिस्तानी गायकांना न घेण्याबद्दल पत्र दिलं, अमेय खोपकर यांची फेसबुक लाईव्ह माहिती
खासदार अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, बहुजन समाजातील लोकांवर शरद पवारांनी अन्याय केला,
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची पवारांवर टीका
पावसाळा सुरु झाल्यानंतर आता कोकणातील धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांचं आकर्षण पर्यटकांना देखील मोठ्या प्रमाणात असते. दरम्यान, राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा देखील सध्या फेसाळून वाहत आहे. पण, कोरोनामुळे पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत असलेल्या तिवंदामाळ येथून जाता येते. कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा या भागांतून देखील पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात.
रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावात सरपंच आणि शिवसेना उपतालुकाप्रमुखाचा नवा प्रताप उघड झाला आहे. चंद्रकांत उर्फ बाबा चव्हाणनं गावातील गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेश द्वाराला आपल्या वडिलांचं नाव दिलं आहे. दरम्यान, ही जमिन गावातील स्वर्गिय तुकाराम महाडिक यांनी दान केलेली असून त्यांच्याच नावावर आहे. शिवाय, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही मालमत्तेला अशा प्रकारे कोणाचेही नाव देता येत नाही. त्यानंतर आता गावच्या नागरिकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेत यावर कारवाईची मागणी केली आहे.
अहमदनगर : आज जिल्ह्यात आणखी 10 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. नगर शहरातील 8 रुग्ण, जामखेड तालुक्यात 1 तर संगमनेर तालुक्यात 1 रुग्ण आहे. त्यामुळे कोरोना बधितांचा आकडा 314 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 254 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त बिपीन शर्मा यांनी पदभार स्वीकारला. ठाणे महापालिका नरेंद्र बल्लाळ सभागृहात कामकाजासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरु आहे.
कोविड-19 आणि इतर कामकाजाबाबत ही बैठक आहे.
अकोला जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कारागृहातील दोन कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे कैदी सहा महिन्यांपासून शिक्षा भोगत आहेत. कोरोनाची लागण झालेले दोन्ही कैदी जिल्ह्यातील अकोटचे रहिवाशी आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यात एकाच रात्रीत 2 ठिकाणी दरोडा पडला आहे. जामखेड तालुक्यातील तात्याराम पोकळे यांच्या घरावर तर कर्जत तालुक्यातील मिराजगाव येथील अॅड.मधुकर कोरडे यांच्या घरावर दरोडा पडला आहे. पोकळे यांच्या घरून दीड लाख रुपये रोख रक्कम आणि 10 तोळे सोनं लंपास केलं आहे.
तर कोरडे यांच्या घरून 3 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी जामखेड आणि कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील ख्वाजा युनूस कथित कोठडी मृत्यू प्रकरणात गुन्हे अन्वेशन विभागाने दोषारोपपत्र ठेवलेले वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि तीन अंमलदारांना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्याच्या निर्णयाला ख्वाजाच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने तिच्या याचिकेची दखल घेत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना नोटीस बजावली आहे.
सातारा : जिल्ह्यात 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून सातारा जिल्हयातील कोरोना बाधितांचा आकडा आता 852 वर पोहोचला आहे. तर आजपर्यंत 678 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुण्यात रात्रभरात 192 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील रुग्णांची संख्या 17043 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 617 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 10288 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
विविध शासकीय पदांची भरती सरळसेवेमार्फत होणार होती. त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया देखील पार पडली होती. मात्र कोरोनामुळे प्रक्रिया थांबली आहे. कोरोनाचे संकट संपले की निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील सहा वर्षांच्या करीना नावाच्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तिने अन्न-पाणी सोडले होते. तिला सलाईन लावण्यात आलं होतं. तिच्या रक्ताचे, लघवीचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. या वाघिणीचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्याचा अहवाल आज येईल.
सांगली : मिरजेतील एका प्रसिध्द डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली आहे. मिरजमधील प्रसिध्द डॉ. शिरीष चव्हाण यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चव्हाण यांचे हॉस्पिटल आणि त्यांचे घर कंटेन्मेंट झोन म्हणून सील केले आहे. हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या लोकांचा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शोध सुरु आहे.
नाशिक : मका लागवड सध्या नाशिक जिल्हयात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. जिल्हयातील कळवण,देवळा,सटाणा या तालूक्यात अनेक शेतकऱ्यांनी मका लागवड केली. मात्र मका थोडा मोठा होऊ लागताच त्यात लष्करी अळीचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. त्यामुळे या परिसरातील मोठ्या प्रमाणावर मक्याचे क्षेत्र धोक्यात आले आहे. त्यामुळे निराश झालेल्या देवळा तालूक्यातील शेतकरी नंदलाल निकम यांनी ल्ष्करी अळीमुळे बाधित झालेल्या पाच एकर क्षेत्रावर अखेर रोटर फिरवत संपुर्ण मक्याच क्षेत्र नष्ट केले.
भिवंडी तालुक्यातील शेलार मीठपाडा येथील भांड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत हजारो रुपयांची भांडी जळून खाक झाली आहेत. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग विझविण्यात यश आलं आहे. आगीचे कारण अजूनही असपष्ट असून शॉर्टसर्किट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 125 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून कोरोना बाधितांची संख्या 3961 वर पोहोचली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी 87 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 38 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2136 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 206 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1619 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र सायबर सेलला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार-पाच दिवसांमध्ये भारतात चीनकडून सायबर अटॅक करण्यात आले. देशाच्या पायाभूत सुविधा, माहिती आणि बँकिंग क्षेत्रावर सायबर अटॅक केले आहेत. हे सायबर आणि हॅकिंग अटॅक चीनच्या चंडू भागातून झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसात 40 हजार 300 अटॅक करण्यात आले. हे तीन प्रकारचे हल्ले आहेत. डिनायल सर्विस अटॅक, हायजॅकिंग अटॅक आणि फिशिंग अटॅक. या तीनही हल्ल्यांचा परिणाम सरकारी केंद्रांवर झाल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली आहे.
अंबरनाथ : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉक 1 सुरु झाल्यानंतर अंबरनाथ शहरात दुकानं आणि सगळे व्यवहार सुरु झाले होते. मात्र यामुळे कोरोनाचा फैलाव शहरात अधिक वेगाने होत असल्याचं काही दिवसांतच लक्षात आलं. शहरात सध्या 1322 रुग्ण असून दररोज ही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नगरपालिकेकडे केली होती. त्याला शहरातल्या नागरिकांनीही पाठींबा दिला होता. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी अंबरनाथ शहरात 30 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात शहरातली मेडिकल, किराणा, भाजीपाला आणि अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सगळी दुकानं बंद असतील. शिवाय किराणा आणि भाजीपाला सुद्धा फक्त होम डिलिव्हरी पद्धतीनेच विकता येणार आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होणार आहे.
नाशिक : नाशकात महापालिका चालक, नगररचना कर्मचारी यांच्यानंतर मनपा आयुक्तांच्या स्वीय सहायकला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मनपातील अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत.
पंढरपुरातील कुर्डुवाडीमध्ये तिघांनी व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळीबार केल्याचीही माहिती मिळत आहे. जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी सोलापूरमध्ये हलवले. मार्केट यार्ड परिसरात रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली
नारायणपूर : नक्षल्यांचा गड असलेल्या अबुजमाडमध्ये छत्तीसगड पोलिसांचे डीआरजी, एसटीएफने मोठी कारवाई करत नक्षल्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला. तसंच नक्षल्याचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारुगोळा, स्फोटके, भुसुरुंग स्फोटाचे साहित्य, वायर बंडल, किराणा सामान आणि इतर नक्षली साहित्य सापडले. सुरक्षा बलाचे जवान आपल्या दिशेने येत असल्याचे बघून नक्षली घटनास्थळावरुन पसार झाले. त्या भागात अजूनही कॉम्बिंग ऑपरेशन सुरु आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या तलेवाडी गावात तलावात बुडून 5 मुलींचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना उघडकीस आलीय, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास तलावाशेजारी खेळताना एका खोल खड्ड्यात एक मुलगी पडली, दरम्यान तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर 4 मुली या खड्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोलापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवणार, 'प्रहार' संघटनेच्यावतीने इशारा, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे, कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले, असे असताना देवेंद्र फडणवीस यांना सोलापुरात येण्याचा कोणताही अधिकारी नाही, सोलापूरात आल्यास त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा
हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भुंकपाचे सौम्य धक्के, वारंवार भूगर्भातून गूढ आवाजाच सत्र सुरूच, संध्याकाळी 5.28 वाजता जिल्ह्यातील वसमत, औंढानागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचा धक्का

आई रुख्मिनीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार, शासनाची मान्यता, अमरावती जिल्ह्यातील माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. सव्वाचारशे वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या या पालखीत कोरोना संकटामुळे खंड पडणार नाही. आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली.
एकाही शेतकऱ्याला खत मिळणार नाही असं होणार नाही. दुकानदारांनी शेतकऱ्यांना खत तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, खताचे लिंकिंग करु नका. दुकानात फलक लावून खताचे दर; उपलब्धता हे बोर्डवर लावणं अनिवार्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी धावून आला. त्यामुळे त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहावं, असं राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले. सोयाबीन उगवलं नसेल तर त्याची कारणं शास्त्रज्ञ तपासून पाहत आहेत. यामध्ये कोणी दोषी असेल तर म्हणजे महाबीजही दोषी असेल तरी कारवाई केली जाईल. पण तोपर्यंत महाबीज किंवा इतर कंपन्यांनी बियाणं उपलब्ध करुन द्यावं, असंही ते म्हणाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नायडू आणि ससून रुग्णालयांची पाहणी करणार आहेत. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात फडणवीस नायडू रुग्णालयात दाखल होतील. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नायडू आणि ससून रुग्णालयांची पाहणी करणार आहेत. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात फडणवीस नायडू रुग्णालयात दाखल होतील. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
गडचिरोलीच्या भामरागड तालुका मुख्यालयाल लागून असलेल्या पर्लकोटा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भामरागड तालुक्यात आणि छत्तीसगढ राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या वर्षाचा मान्सून परत एकदा भामरागडवासियांसाठी धोक्याच्या घंटा ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पर्लकोटा नदीला महापूर आल्याने संपूर्ण भामरागड शहर 70 टक्के पाण्याखाली गेलं होतं. मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन करुन घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे लागले होते. जनजीवन विस्कळीत झालं होतं. संपूर्ण मान्सूनमध्ये अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा पाण्याची पातळी वाढल्याने भामरागडच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यात काल रात्री काही भागात रिमझिम पाऊस पडला, मात्र सध्या ढगाळ वातावरण आहे.

एबीपी माझाच्या बातमीची महाराष्ट्र सरकारकडून दखल घेतली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर रत्नागिरीतल्या कर्दे गावातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे पालकमंत्री अनिल परब यांचे आदेश दिले आहेत.
नुकसानग्रस्त कुटुंबीयांनाही लवकरात लवकर मदत मिळणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी 3.30 सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उपसमितीचे सदस्य विजय वडेट्टीवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होतील.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीन .

भाजपच्या आंदोलनाला मंत्री हसन मुश्रीफ यांचे खुले आव्हान
,
भाजपच्या आंदोलनाचा कोल्हापूर जिल्ह्यात उडाला फज्जा असल्याची खोचक टीका,
,
पत्रक काढून मुश्रीफ यांनी केली भाजपवर टीका
सीबीएसई परीक्षा रद्द करण्याबाबतचा विचार अंतिम टप्प्यात आहे, उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची आशा, महाधिवक्ता तुषार मेहता यांची सर्वोच्च न्यायालयात माहिती, उर्वरित पेपर रद्द करुन अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुण देण्यासंदर्भातील याचिकेवर आज दुपारी दोन वाजता कोर्टात सुनावणी होणार
कोरोना महामारीचा सामना धैर्याने केला जात नाही आणि जसे प्रयत्न आवश्यक आहेत, तसे होताना दिसत नाहीत. यातच आणखी एक संकट म्हणजे सीमेवरील वाद. हा वाद समर्थपणे सोडवला नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. मी सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करतो, असं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह म्हणाले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला प्राथमिक आहे. उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मध्यरात्री 2.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 13 जूनला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. लिव्हर आणि किडनीच्या विकाराने ते त्रस्त होते. सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात ट्रीटमेंट घेत होते.

6 जूनला सोलापूरमधील रुग्णालयातून उपचार घेऊन ते घरी परतले होते. यावेळी कोरोनाची बाधा झाला होती, अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. लिव्हर आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने सोलापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तेथे मृत्यू झाला.

आत्तापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची रुग्णांची संख्या 183 झाली असून त्यापैकी 136 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 40 जण आणखीही उपचार घेत आहेत.
सोलापूर : आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगाव येथील ( ता. बार्शी ) येथील CRPF जवान सुनिल काळे शहीद
सोलापूर : आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगाव येथील ( ता. बार्शी ) येथील CRPF जवान सुनिल काळे शहीद
सोलापूर : आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगाव येथील ( ता. बार्शी ) येथील CRPF जवान सुनिल काळे शहीद
लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय,
मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती केली रद्द,
3 फुटांची मूर्ती बसवून साजरा करणार गणेशोत्सव,

मूर्ती लहान आणून उत्सवांची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांची माहिती
मानखुर्द येथील झोपडपट्टीत भीषण आग, मंडला परिसरातील केमिकल, भंगारच्या गोदामांना आग लागल्याची माहिती, अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल, नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु
मानखुर्द येथील झोपडपट्टीत भीषण आग, मंडला परिसरातील घरांना आग. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु, कारण अस्पष्ट
निकृष्ट बियाणे पुरविणार्‍या महाबिजच्या दोषी अधिकार्‍यांवर, बोगस बियाणे पुरवठादार कंपन्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याबाबत तसेच विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी तातडीने मदत पुरविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

निकृष्ट बियाणे पुरविणार्‍या महाबीजच्या दोषी अधिकार्‍यांवर, बोगस बियाणे पुरवठादार कंपन्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याबाबत तसेच विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी तातडीने मदत पुरविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांचं पत्र
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.

मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते .

दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3721 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,35,796 वर गेली आहे. तर दिवसभरात 62 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1962रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नाना पटोले पुन्हा दिल्ली दौऱ्यावर,

गेल्या पंधरा वीस दिवसात नाना पटोले यांचा दुसरा दिल्ली दौरा,

आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचीही भेट घेणार,

प्रदेशाध्यक्षपदी इच्छुक असलेल्या नाना पटोले यांचा दुसरा दिल्ली दौरा,

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्षपदासाठी जास्त उत्सुक
नाशिकनंतर दुसऱ्यांदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या येवल्याच्या एकाच कुटुंबातील गर्भवती महिला आणि सहा वर्षाच्या चिमुकल्यांसह तिघांनी कोरोनावर मात करत आज सकाळी घरवापसी केली. या सर्वांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नागरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले होते. येवला शहर आणि तालुक्यात कोरोना बधितांची संख्या 109 वर पोहोचली असून यातील 55 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली तर 7 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला असून उर्वरित 47 जणांवर उपचार सुरु आहेत. वाढत्या कोरोनाबधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी येवल्यात उद्यापासून तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूची नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घोषणा केली आहे.

गृह मंत्रालयात भारत-चीन सीमा व्यवस्थापनाबाबत बैठक सुरु, गृहसचिव एके भल्ला, बॉर्डर मॅनेजमेंटच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु, बैठकीत बॉर्डर रोड ऑर्गेनायझेशन, आयटीबीपी, सीपीडब्लूडी आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित, सीमेवर लवकरच रस्ते बांधणीचं काम पूर्ण केलं जाणार, गृह मंत्रालयात एकाच आठवड्यातील ही दुसरी बैठक, 32 रस्त्यांचं काम लवकरच पूर्ण करणार, केंद्र सरकारने विस्तृत योजना आखली.

गृह मंत्रालयात भारत-चीन सीमा व्यवस्थापनाबाबत बैठक सुरु, गृहसचिव एके भल्ला, बॉर्डर मॅनेजमेंटच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु, बैठकीत बॉर्डर रोड ऑर्गेनायझेशन, आयटीबीपी, सीपीडब्लूडी आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित, सीमेवर लवकरच रस्ते बांधणीचं काम पूर्ण केलं जाणार, गृह मंत्रालयात एकाच आठवड्यातील ही दुसरी बैठक, 32 रस्त्यांचं काम लवकरच पूर्ण करणार, केंद्र सरकारने विस्तृत योजना आखली.
कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाण्याच्या प्रवाहामुळे कसबा बावडा इथे असलेल्या राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेला. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसामुळे पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. राजाराम बंधारा आठ दिवस पाण्याखाली असल्यामुळे आज पाणी ओसरल्यानंतर बंधाऱ्यावर टाकलेला स्लॅब वाहून गेल्याचे लक्षात आलं. राजाराम बंधार्‍यावरुन वाहतूक होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील पेढांबे दाबाडेवाडीतील गर्भवतीची शनिवारी वाटेतच प्रसुती झाली. पक्का रस्ताच नसल्याने या महिलेला कळा सोसत रात्र काढावी लागली. पहाटे डोलीतून नेत असताना वाटेतच तिची प्रसुती झाली. मनिषा संतोष शेळके या गर्भवतीला रात्री प्रसुती वेदना होऊ लागल्या. परंतु इतक्या रात्री पायवाटेने आणि आडवाटेने दवाखान्यापर्यंत नेणार कसं, हा मोठा प्रश्न होता. अखेर सकाळ झाली आणि काही ग्रामस्थांनी तिला डोलीतून दवाखान्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अर्ध्या वाटेतच तिची प्रसुती झाली. दाबाडेवाडी ते मुख्य रस्ता असं साधारणपणे तीन किलोमीटरचं अंतर आहे. हा रस्ता करावा आणि इथल्या ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटूनही इथे अद्याप रस्ता झालेला नाही. साधारणपणे तीस घरं आणि दोनशे लोकांची या ठिकाणी वस्ती आहे. रस्ता नसल्याने येथे वाहन येत नाही. त्यामुळे आजारी माणसाला दवाखान्यापर्यंत नेणं जिकरीचे होऊन बसतं.
मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना रत्नागिरीतील जयगडमध्ये रविवारी (21 जून) दुपारी घडली आहे. वीरांची विलास खापले असं बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी समुद्राला भरती होती. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण बुडाला. मित्रांनी आरडाओरडा करताच स्थानिक मदतीसाठी धावून आले. पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल पूर्ण दिवस पावसाने उसंती घेतल्यानंतर आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील दोडामार्ग, वैभववाडी, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 966 मिमी पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. माडखोल, ओझरम, निळेली, हरकुल लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.
जालना : रात्रीतून 17 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 378 वर, आजवर कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू, तर उपचारानंतर 245 जणांना डिस्चार्ज
कोल्हापूर : यंदाच्या पन्हाळा-पावनखिंड सर्व मोहिमा स्थगित,

महाराष्ट्रासह बेळगावमधील संयोजक संस्थांनी घेतला निर्णय,

पन्हाळा-पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीची स्थापना,

पन्हाळा ते पावनखिंड मार्गावरील गावांना देणार याबाबत निवेदन,

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर बाजीप्रभूंच्या पुतळ्याचे आणि पावनखिंडीत होणार केवळ पूजन,

वैयक्तिकरित्या कुणीही मोहीम काढू नये असं केलं आवाहन,

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, यामध्ये 49 स्त्री व 53 पुरुष, कोरोनाबाधितांची संख्या 3632 वर, यापैकी 1968 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 191 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू . 1473 रुग्णांवर उपचार सुरू .

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, यामध्ये 49 स्त्री व 53 पुरुष, कोरोनाबाधितांची संख्या 3632 वर, यापैकी 1968 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 191 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू . 1473 रुग्णांवर उपचार सुरू .
मुंबईतील मालाडच्या मार्वे बीचवर फिरायला आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी दोन मुले बुडल्याची घटना काल (21 जून) संध्याकाळी घडली. यातील एकाचा मृतदेह मिळाला असून एकाचा शोध सुरु आहे. मालवणी गेट नंबर 7 जवळ राहणारे मोहसीन शहा आणि अश्रफ चौधरी ही अल्पवयीन मुले त्यांच्या इतर चार मित्रांसह मारवे बीचवर काल संध्याकाळी फिरायला गेली होती. साडेपाचच्या सुमारास यातील अश्रफ आणि मोहसीन हे समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांच्या मित्रांनी याची माहिती घरच्यांना देताच त्यांच्या कुटुंबाने पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवलं. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बचाव पथक दाखल झाले आणि त्यांनी शोधकार्य सुरु केले. यातील अश्रफचा मृतदेह संध्याकाळी सापडला आहे. मात्र मोहसीनचा शोध अजूनही सुरु आहे.
साताऱ्यात रात्रभरात 20 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 838 वर पोहोचला आहे. आजपर्यंत 643 जण कोरोनामुक्त होईन घरी परतले आहेत. तर सध्या 156 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 39 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवडमधील कंटेन्मेंट झोनमध्ये दोन गटातील वाद उफाळला. अजंठानगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दोन रिक्षांसह काही वाहनांची तोडफोड झालीये. आज ज्याच्या रिक्षाची तोडफोड झाली त्याच्या भावाने गेल्या आठवड्यात एकाला मारहाण केली होती. त्यातूनच आजची ही तोडफोड झाल्याची पोलिसांची माहिती आहे. निगडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

पार्श्वभूमी

Corona Live Update : मोठा गाजावाजा करत आज रामदेवबाबांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध पतंजलीनं तयार केल्याचा दावा केला. मात्र अवघे चार-पाच तास उलटायच्या आतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं या औषधाची जाहीरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत या औषधाची नीट चाचपणी होत नाही, तोपर्यंत ही जाहीरात थांबवण्याचे आदेश देण्यात आले.


मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत हरिद्वारमध्ये रामदेवबाबांनी हे औषध जगासमोर आणलं. त्यावेळी हे औषध सगळ्या मेडिकल चाचण्यांनी प्रमाणित असल्याचाही दावा त्यांनी केला. पण या औषधाला नेमकं कुणी प्रमाणित केलं आहे, याबाबत मात्र सगळा सावळागोंधळ आहे. कारण इंडियन मेडिकल कौन्सिलनं याबाबत आधीच कानावर हात ठेवले होते. त्यातच ज्या आयुष मंत्रालयाच्या अधिकारात हा सगळा विषय येतो त्यांनी आता याबाबत पतंजलीकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.


या औषधाची, त्यातल्या प्रमाणांची सर्व चाचपणी करण्यासाठी आता पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय केवळ उत्तराखंड सरकारच्याच प्रमाणपत्रावर हे औषध तयार झाल्याचं दिसतंय. उत्तराखंड सरकारनं नेमकी कुठली लायसन्स या औषधाला दिलीयत, त्याचीही कागदपत्रं आयुष मंत्रालयानं मागवली आहेत.


बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवर आयुर्वेदिक औषध बनवण्याचा दावा केला आहे. पतंजलीचे बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत औषधाच्या चाचणीत सहभागी असलेले वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधकही उपस्थित होते. कोरोनावरील या औषधाला कोरोनिल हे नाव देण्यात आलं होतं.


संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस  असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे, अशी माहिती बाबा रामदेव यांनी दिली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.