LIVE UPDATES | लातूर जिल्ह्यात आज 9 लोकांना कोरोना पॉझिटिव्ह
देशात पहिल्यांदाच काल, शनिवारी 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली तर 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
21 Jun 2020 09:55 PM
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 हदशतवाद्यांना कंठस्नान
लातूर जिल्ह्यात आज 131 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 लोकांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. आज उपचार घेत असलेले तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कुरुक्षेत्र, सूतरगढ, सिरसा आणि लखनऊमध्ये रिंग ऑफ फायर, नेपाळ, ओमान, दुबईतही सूर्यग्रहणाचं दर्शन, पंढरपुरात विठुरायाला चंद्रभागेच्या जलाचा अभिषेक
हिंगोलीत पेरणीचे काम आटोपून घराकडे परतणाऱ्या बैलगाडीला भरधाव ट्रकने चिरडले. हिंगोली ते नांदेड रोडवर कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सावा फाटी दरम्यान ही घटना घडली. यामध्ये एका 16 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय तर बैलगाडी मध्ये बसलेली इतर चारं जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
पुण्याच्या हडपसर परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाला कपडे फाडून बेदम मारहाण करण्यात आली. हडपसर परिसरातील भिमाले हाईट्स या इमारतीत हा प्रकार घडला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. याप्रकरणी संदीप विठ्ठलराव भोईटे यांनी तक्रार दिली आहे.
चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त अर्टीगा गाडीचा टायर फुटल्याची प्राथमिक माहिती. नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणारी ही गाडी अतिशय वेगात होती आणि त्यामुळे टायर फुटल्यावर नियंत्रित झाली नाही आणि किमान 100 फूट घासत गेली.
जीवंत वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने 5 म्हशींचा मृत्यू झाला आहे. अलिबाग तालुक्यातील आवास येथे ही घटना घडली. आवास ते किहीम दरम्यानच्या जंगलात चरण्यासाठी गेल्या असताना म्हशींचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
हिंगोली जिल्ह्यातील जगप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावन तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ या पावन नगरीत डोगराच्या पर्वतरांगामध्ये दगडाच्या कोरीवशिल्पकलेचे पांडव कालीन हेमांडपंथी श्री नागनाथ देवाचे मंदीर आहे. श्री नागनाथ मंदिर कोरोना पार्श्वभूमीवर बंद आहे. आज सूर्यग्रहण असल्यामुळे नागनाथ देवाची पिंड ही पांढरे शुभ्र धोतराचे वस्त्र ओले करून श्रीच्या पिंडवर ठेवण्यात आली आहे. तसेच श्रींच्या पिंडीवर सतत पाण्याची धार ठेवलीय. सूर्यग्रहण संपेपर्यंत देवाचा अंगावर सतत पाण्याची धार ठेवणे, महादेवाची पिंड ओल्या वस्त्रामध्ये झाकून ठेवण्यात आलेली आहे. अशी माहिती मुख्य पुजारी हरिहर भोपी यांनी दिलीय. सूर्यग्रहणामध्ये देवाच्या पिंडीला ओले ठेवणे शास्त्रीय कारण आहे. सूर्यग्रहण हे दहा ते दोन या वेळेत असून या वेळामध्ये मुख्य पुजारी हे ओम नमः शिवायचा जप करत आहेत.
सुर्यग्रहणामुळे बेळगाव शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.रस्ते निर्मनुष्य झाले होते.अनेक मंदिरात ग्रहणानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील बाजारपेठेत दुकाने उघडी होती. पण ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत फिरकलेच नाहीत.सुर्यग्रहणामुळे जनतेने घरीच बसणे पसंद केले.रविवारी परगावचे लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात पण आज परगावचे लोकही आलेच नाहीत.अनेक ठिकाणी परातीत ग्रहण काळात मुसळ उभे करण्यात आले होते. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात नवग्रह यज्ञ आणि रुद्र पठण करण्यात आले होते. ग्रहण काळात अनेकांनी भिक्षुकाना दान केले.शहरात बससेवा सुरू होती. पण बसमध्ये प्रवासी तुरळक होते.नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या मध्यवर्ती बस स्थानकावर देखील शुकशुकाट होता.
पुण्यात रात्रभरात 179 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 15183 तर आत्तापर्यंत 584 कोरोना बाधितांचा मृत्यू, एकूण 9257 रुग्णांना डिस्चार्ज
कोल्हापूर : सूर्यग्रहनाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अनुष्ठान, ग्रहणकाळ पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार अनुष्ठान, 10 वाजून 3 मिनिटांनी अनुष्ठानाला झाली सुरुवात
,
ग्रहणामुळे दुपारी 12 वाजता होणाऱ्या नित्यपूजेत बदल,
ग्रहण पूर्ण झाल्या नंतर दीड वाजता होणार पूजा
आज कंकणाकृती सूर्यग्रहणानिमित्त विठुरायाच्या नित्योपचारात बदल करण्यात आले असून सूर्यग्रहणाच्या स्पर्श होताच सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी देवाला चंद्रभागेच्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. आज सकाळी मंदिरातील पुजाऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर जाऊन हे पवित्र जल स्नानासाठी विठ्ठल मंदिरात आणले. ग्रहणाला सुरुवात होताच देवाला हा पहिला अभिषेक घालण्यात आला. आज दुपारी देवाचा महानैवेद्यही थेट दुपारी चार वाजता दाखवण्यात येणार असून आज स्नानानंतर देवाला सुकामेव्याचा नैवेद्य दिला जाणार आहे. दुपारी दीड वाजता ग्रहण संपल्यानंतर पुन्हा एकदा देवाला चंद्रभागेच्या पवित्र जलाचा अभिषेक होणार आहे.
पुणे: पुण्यात नेपाळी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, सुरज लालसिंग सोनी आणि करुणा सुरज सोनी असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव, समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पदमजी पार्क सोसायटीत आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली घटना.
सूर्यग्रहणाची सुरुवात झाली असून गुजरातच्या अहमदाबादमधून ग्रहणाचं एक छायाचित्र समोर आलं आहे. यात सूर्यावर चंद्राची सावली पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. नीट पाहिलं तर सूर्य वरील बाजूला थोडा कट झाल्यासारखा दिसत आहे. तो कटलेला नसून ती चंद्राची सावली आहे.
सूर्यग्रहणाची सुरुवात झाली असून गुजरातच्या अहमदाबादमधून ग्रहणाचं एक छायाचित्र समोर आलं आहे. यात सूर्यावर चंद्राची सावली पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. नीट पाहिलं तर सूर्य वरील बाजूला थोडा कट झाल्यासारखा दिसत आहे. तो कटलेला नसून ती चंद्राची सावली आहे.
सूर्यग्रहणाची सुरुवात झाली असून गुजरातच्या अहमदाबादमधून ग्रहणाचं एक छायाचित्र समोर आलं आहे. यात सूर्यावर चंद्राची सावली पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. नीट पाहिलं तर सूर्य वरील बाजूला थोडा कट झाल्यासारखा दिसत आहे. तो कटलेला नसून ती चंद्राची सावली आहे.
जगभरात सूर्यग्रहणाला सुरुवात, अबूधाबीमधून समोर आलं पहिलं छायाचित्र,भारतातही अनेक ठिकाणी लोकांना या सूर्यग्रहणाचं दर्शन होणार आहे. यावेळी अद्भुत असं रिंग ऑफ फायर लोकं पाहू शकतील. देशातील बहुतांश भागात मात्र सूर्यग्रहण खंडग्रास पद्धतीनं दिसेल.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे थैमान, गेल्या दहा दिवसात नाशिक जिल्ह्यात 911 नवे रुग्ण तर 53 मृत्यू, कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या नाशिक शहरात दहा दिवसात 589 नवे बाधित तर 33 मृत्यूची नोंद, शहरात काल एकाच दिवसात कोरोनाचे 5 बळी, नाशिक शहरातील रुग्णसंख्येने ओलांडला अकराशेचा टप्पा, एकूण 1101 कोरोनाग्रस्त तर 56 मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील एसएम हायस्कूल समोरील उड्डाणपुलाची संरक्षण भिंत खचल्याने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्वरीत डागडुजी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे. कणकवली एस.एम.हायस्कूल ते जाणवली नदीपात्र यापर्यंत खचलेला रस्ता, महामार्गावर पडलेल्या भेगा यांची जागेवर जाऊन पाहणी करत महामार्ग ठेकेदाराला रस्त्याला भेगा पडल्याने पावसात अपघात होण्याची शक्यता असल्याने डागडुजी करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी नागरिकांनी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून गेला आहे. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर हा गाळ काढून घ्यावा अशी मागणी प्रांताधिकारी याच्याकडे केली. खचलेली गटारे, रस्त्यावर येत असलेल्या पाण्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या. त्यावर दोन दिवसांत उपाय योजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी यांनी दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, आज सकाळी 137 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, यामध्ये 44 स्त्री व 93 पुरुष, कोरोनाबाधितांची संख्या 3497 वर. यापैकी 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 187 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, 1453 रुग्णांवर उपचार सुरू
पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीत पुन्हा एकदा नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. तसेच सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील प्रवेश टाळण्याची विनंती केली गेलीय. 30 जूनपर्यंत हा निर्णय घेण्यात आलाय. एक नगरसेविका, प्रभाग कार्यलयातील कर्मचारी आणि पालिका परिसरातील बँक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना प्रादुर्भाव पालिका इमारतीत वाढू नये आणि तसेच कर्मचाऱ्यांना केवळ कोरोनाच्या अनुषंगानेच अधिकचं काम करता यावं म्हणून पालिका आयुक्तानी हे पाऊल उचललं आहे.
इंदोर कडून मुंबईकडे बटाटे घेऊन जाणारा ट्रक तापी नदीत कोसळून दोन जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे . ही घटना धुळे जिल्ह्यातील दभाशी या तापी नदीवर असलेल्या पुलावर घडलीय. टायर फुटून ट्रक नदीत कोसळला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. सहा तास नदी पात्रात शोध कार्य करण्यात आलं मात्र रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अंधारामुळे शोध कार्य थांबवण्यात आलं. आज (रविवारी) पुन्हा शोध कार्य सुरू होईल.
चीन भारतावर सायबर हल्ला करण्याची शक्यता; खासगी आणि आर्थिक ईमेल टारगेट होण्याचा धोका!
राज्यात आज 3874कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1,28,205 अशी झाली आहे. आज नवीन 1380 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 64,153 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 58,054 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
वाशिममध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्येमध्ये वाढ. आज पुन्हा नवीन 7 रुग्ण वाढले. 72 वरून रुग्ण संख्या 79 वर. 19 जण डिस्चार्ज तर दोन जणांचा मृत्यू.
निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने निलंगा शहरात 16 व 18 रोजी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यामुळे निलंगा शहर संपूर्णपणे तीन दिवसासाठी सील करण्यात आले आहे.
जालना शहरात कोरोनाचा 11 वा बळी, आनंदनगर भागातील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू. आजवर 359 जणांना कोरोनाची लागण, तर उपचारानंतर 221 जणांना डिस्चार्ज.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर तिघांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर पाच जण मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
चालक व सहायकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरमुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अमरावतीत आज सकाळी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 411 वर, 17 जणांचा आतापर्यंत मृत्यू, 264 बरे होऊन घरी गेले. सध्या 130 जणांवर उपचार सुरु
वाढत्या रुग्ण संख्येमुळे इगतपुरीमधील व्यापाऱ्यांनी पुकारला असून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.
आज पासून पुढील पाच दिवस दुकाने बंद राहणार आहे.
नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. पॉईंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा घेऊन थेट आयुक्तच आक्रमक झाले. हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असताना, भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आवाज चढवला. जर नगरसेवक आवाज चढवणार असतील तर मी इथे बसणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी भर सभेत महापौरांना आणि सभेला सांगितले. त्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेले.
हिंगोली : शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून शेतकऱ्यांसह बैल जोडीचा मृत्यू, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील घटना, उकंडी गिरे असं मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव, आज सकाळी घटना उघडकीस, शेतातून घरी न आल्याने शोधाशोध केल्यानंतर शेतात आढळून आला मृतदेह
सध्या उत्तर मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबई शहरातील कोरोनाचा ग्रोथ रेट कमी होत असताना पश्चिम उपनगरे आणि विशेषत: उत्तर मुंबईतील काही भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. उत्तर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सील इमारतींमधील नियमांच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर, महापालिकेचे नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यात रात्रभरात 111 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील रुग्णांची संख्या 14,292 तर आत्तापर्यंत 560 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 9002 वर पोहोचली आहे.
औरंगाबादमध्ये रोज 100 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असतानाच आता कोरोनाने इंडस्ट्रीमध्ये देखील शिरकाव केलेला आहे. औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील नामांकित बजाज कंपनी मध्ये गेल्यात पाच-सहा दिवसात 20 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर याच भागातील स्टारवेज नावाच्या कंपनीत ही वीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर वाळुज पंढरपुर भागात दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. बजाज कंपनीने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आपल्या चुलत भावाची मामाने केलेल्या हत्येचा बदल घेण्यासाठी जामिनावर बाहेर आलेल्या मामाला टेम्पोखाली चिरडून केलेला अपघाताचा बनाव पोलिसांनी उघड केला असून चौघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे 2018 मध्ये मामा सावकार उर्फ महादेव साळुंखे यांनी त्याचा भाचा सीताराम सुरवसे याची हत्या केली होती . याप्रकरणी मामा महादेव साळुंखे आणि त्याचे वडील गोवर्धन साळुंखे हे जामिनावर बाहेर आले होते. काल महादेव साळुंखे गोपाळपूर येथून रांजणीकडे दुचाकीवरून येत असताना एक टेम्पोने चुकीच्या दिशेने येत या दुचाकीला धडक दिली होती. पहिल्यांदा हा अपघात असल्याचे दिसत होते मात्र नंतर पोलिसांनी तपस सुरु केला असता हा घातपात असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणी दत्त सुरवसे, योगेश चौघुले, सुरज दांडगे आणि दत्ता पवार या चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
17 जूनला जयगड येथे ओएनजीसीच्या शिप मधून आलेल्या पाच पैकी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुंबईतून सुटलेली ही शिप 17 जूनला सकाळी 10 वाजता जयगड येथे दाखल झाली होती. या शीप मधून पाच कामगार रत्नागिरीत दाखल झाले होते. या पाचही जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या पाचही जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाला असून पाचपैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चारही जणांना शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर : मुसळधार पावसानं दरड कोसळली, गगनबावडा तालुक्यातील तिसंगी टेकवाडी इथं वेतवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, दगड, माती सह झाडांचा काही भाग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर. घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही
औरंगाबादमध्ये रोज 100 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. ही चिंतेची बाब असतानाच आता कोरोनाने इंडस्ट्रीमध्ये देखील शिरकाव केलेला आहे. औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील नामांकित बजाज कंपनी मध्ये गेल्या पाच-सहा दिवसात 20 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर याच भागातील स्टारवेज नावाच्या कंपनीतही 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर वाळूज पंढरपूर भागात दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. बजाज कंपनीने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावाच्या सरपंचाने मजूर महिला आणि तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काल सायंकाळी सहा सुमारास ही घटना आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात सरपंच चंद्रकांत चव्हाण (वय 53 वर्षे) याच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. सरपंचाविरोधात दाखल झालेला हा काही पहिलाच गुन्हा नसून यापूर्वीही त्याच्याविरोधात काही केसेस सुरु असल्याची माहिती आता समोर येत आहे.
राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद उमेदवारीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. राजू शेट्टी यांच्यासोबतच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी दूर झाली आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला.
सोलापुरातील दोघा शिक्षिकांचे सोलापूर-नळदुर्ग मार्गावर अपघाती निधन. तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन शिक्षिका जागीच ठार. शशिकला कोळी (वय 45), रोहिणी सपाटे (वय 41) अशी मृतांची नावे आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3827 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,24,331 आहे. तर दिवसभरात 142 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1935 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडल्याचा आरोप भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे लोकशाही विरोधी, नगरसेवकांच्या हक्क आणि कर्तव्यांची गळचेपी करणारे. महापलिकेच्या उद्याच्या सर्वसाधारण सभेत मुंढे येतील की नाही हे आम्हाला माहीत नाही. मात्र, लोकशाहीत अधिकारी सभागृहापासून तेव्हाच पळ काढतो. जेव्हा त्याची चूक असते. त्याचे निर्णय जनविरोधी असतात. मुंढेंनी नागपुरात अनेक नियमबाह्य कामे केले असून विकास कामांना ब्रेक लावला आहे. नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर भाजपचा मुंढे विरोधात आक्रमक पवित्रा. मात्र, आम्ही अविश्वास प्रस्ताव आणणार नाही. सभागृह नागपूरच्या जनतेच्या प्रश्नांसाठी बोलावला आहे. भाजप नेते दयाशंकर तिवारी यांची माहिती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले हा राज्यात पहिला तर उस्मानाबाद चा रवींद्र शेळके हा मागासवर्गवारीत प्रथम तर अमरावतीची पर्वणी पाटील महिला वर्गवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीबाबत आणि वडनरे समितीच्या अहवालावर उद्या सांगलीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पार पडणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार व वडनेरे समितीचे सर्व सदस्य बैठकीस उपस्थित असणार आहे.
राज्याच्या डिजस्टर मॅनेजमेंट समितीची बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागाचे सचिव उपस्थित होते. कोव्हिडं 19 बद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी अंतिम वर्षातील परिक्षांसदर्भातही चर्चा झाल्याची माहिती आहे.
सोशल डिस्टन्सिंग ठेवत महानगर पालिकेची आम सभा होऊ शकते. शासनाकडून आयुक्त तुकाराम मुंढे ह्यांना उत्तर. महापालिका आम सभा घेणे संयुक्तीक होणार नाही, असे म्हणत शासनाकडून मुंढेंनी मागितले होते मार्गदर्शन. पण ही सभा न होऊ देण्याचा घाट ह्या पत्राने मोडून काढला असेच म्हणावे लागेल.
कोविड मार्गदर्शक तत्व पाळत सभा घेता येईल, असे पत्रात नमूद तर काही नेते सभागृहात आणि इतर ऑनलाईन अशी ही सभा होऊ शकते असे पत्रात म्हटले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी आम सभा 20 तारखेला घ्यावी हा निर्णय एका बैठकीत करत ती आयुक्तांना त्याबाबत कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र, लोकप्रतिनिधी आणि मुंढे ह्या वाढत्या तणावात परत एकदा मुंढे हे लोकोप्रतिनिधींच्या ह्या मागणीशी सहमत नसल्याचे त्यांच्या शासनाशी झालेली कम्युनिकेशनमुळे वाटते.
औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी गावात एका 13 वर्षांच्या मुलीचा 18 वर्षांच्या मुलासोबत होणारा बालविवाह चिकलठाणा पोलिसांनी थांबवला. पोलिसांनी वधु-वराला ताब्यात घेतले. मुलीला बालसुधारगृहात पाठवलं तर नातेवाईकांना समज देण्यात आली.
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील आणखी पाच कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पूर्वीही 29 कैद्यांना आणि 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी पाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 3212 वर पोहोचली आहे. यापैकी 1753 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 1289 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे घडली आहे. या विद्यार्थ्याने यावर्षीच दहावीची परीक्षा दिली होती आणि आता पुढील शिक्षणासाठी त्याने घरच्यांकडे मोबाईल घेण्यासाठी तगादा लावला होता. मात्र घरच्यांकडून मोबाईल घेण्यास उशीर होत असल्याने त्यने याच निराशेतून घरचे लोक शेतात गेले असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठेवीदारांचे पैसे देण्यास असमर्थता दर्शविलेल्या रुपी सहकारी बँकेला तब्बल साडे एकोणीस कोटी रुपयांचा नफा झाल्याचे अहवालात समोर आले आहे, त्यामुळे हक्काचे पैसे परत मिळावे ही ठेवीदारांची मागणी पुन्हा जोर धरु लागलीय, गेल्या 8 ते 10 वर्षांपासून पुण्यातील ठेवीदार पैसे परत मिळवण्यासाठी आंदोलन करताहेत, मात्र अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाही, रुपी बँकेला जर नफा झालेला आहे तर ठेवीदारांचे पैसे बँकेने तत्काळ द्यावे अशी मागणी ठेवीदारांनी केलीय , वित्तीय वर्ष 2019- 20 साठी बँकेचे लेखापरीक्षण नुकतेच झाले आहे, कोरोना संसर्गाची परिस्थिती असूनही बँकेने 15 पूर्णांक 40 कोटींची वसुली केली आहे त्यामुळे आता तरी ठेवीदारांचे पैसे बँक देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल
कोल्हापूर : सरकारी नियम अटींसह कोल्हापुरात सुरू होणार तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, सर्व कलाकार कोल्हापुरात दाखल, सर्व कलाकारांचे रिपोर्ट निगेटिव्ह, येत्या 22 तारखेपासून सुरू होणार शूट
एमएमआरडीएकडून मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट रद्द, 10 मोनोरेलच्या रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट अंतिम टप्प्यात होते, मात्र दोन्ही चिनी कंपन्यांचे ते आता रद्द करण्यात आले आहे , त्या ऐवजी BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु
पुण्यात रात्रभरात 104 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 13,854 तर आत्तापर्यंत 552 कोरोना बाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 8524 वर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात तपासणी साठी आणलेला कैदी पळाला, जेल पोलिसांच्या हातात तुरी देऊन पळाला कैदी, गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु, 302 मधील हा कैदी होता, छातीत दुखत असल्याने त्याला काल तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. आज सकाळी त्याने पळ काढला. त्याच्या सुरक्षेसाठी 2 जेल पोलीस आणि 2 बेगमपुरा पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं. तरीही या पोलिसांच्या हातात तुरी देऊन हा कैदी पळाला आहे . या पूर्वी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले होते. त्यातील एक कैदी अद्यापही फरार आहे
औरंगाबाद : वैजापूर शहरात व्हाॅटस्अॅपवर पोस्ट टाकण्यावरून सहा जणांनी केली मारहाण, व्हाॅटस्अॅपवर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याच्या कारणावरून सहा जणांनी एकास बेदम मारहाण, मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 आरोपींना वैजापूर पोलीसांकडून अटक
सांगली-:
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात, काल 6 फुटावर असलेली पाण्याची पातळी आज सकाळी 10 फुटापर्यंत पोहोचली, कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि टेंभू योजनेसाठी केला जात असलेला पाणी पुरवठा बंद केल्याने नदीच्या पाणी पातळीत झाली वाढ, सांगलीवाडीचा बंधारा देखील गेला पाण्याखाली
मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम असा भाग ओळखला जाणारा बोरधा या गावातील शाम सज्जु तोटा या आठ महिन्याचा मुलाला त्याच्या आई-वडिलांनी 16 तारखेला भूमकाच्या सांगण्यावरुन संपूर्ण पोटावर गरम विळ्याने चटके दिले. आठ दिवसांपासून या बाळाला खोकला होता आणि त्याचे पोट फुगत होते. पण त्याला दवाखान्यात न नेता त्याचे कुटुंब भूमकाकडे घेऊन गेले आणि त्याचा सांगण्यावरुन मुलाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले. आजही मेळघाटात अंधश्रद्धा कायम आहे हे या प्रकारावरुन दिसून येते. अशा पोट फुगीला आदिवासी फोपसा म्हणतात. काटकुंभ येथील भरारी पथकाने, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इथे भेट दिली आणि बाळाला ग्रामीण रुग्णालयात चुरनी येथे आणले. सध्या त्या बालकावर उपचार सुरु आहेत.
मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम असा भाग ओळखला जाणारा बोरधा या गावातील शाम सज्जु तोटा या आठ महिन्याचा मुलाला त्याच्या आई-वडिलांनी 16 तारखेला भूमकाच्या सांगण्यावरुन संपूर्ण पोटावर गरम विळ्याने चटके दिले. आठ दिवसांपासून या बाळाला खोकला होता आणि त्याचे पोट फुगत होते. पण त्याला दवाखान्यात न नेता त्याचे कुटुंब भूमकाकडे घेऊन गेले आणि त्याचा सांगण्यावरुन मुलाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले. आजही मेळघाटात अंधश्रद्धा कायम आहे हे या प्रकारावरुन दिसून येते. अशा पोट फुगीला आदिवासी फोपसा म्हणतात. काटकुंभ येथील भरारी पथकाने, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इथे भेट दिली आणि बाळाला ग्रामीण रुग्णालयात चुरनी येथे आणले. सध्या त्या बालकावर उपचार सुरु आहेत.
तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. कर्नाटकातील सकलेशपुरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पच्छिम घाटातील जैववैविध्यात भर पडलीय. भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीर रचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 सालीच या पाल शोधल्या होत्या. मात्र गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींवर सविस्तर संशोधन करण्यात आलं. या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव "मॅग्निफिसंट डवार्फ गेको" असं करण्यात आलं. या चारही तरुणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या "झुटाक्सा" या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.
शिवसेनेचा आज 54वा वर्धापन दिन आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही. त्याऐवजी शिवसैनिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत. शिवसेना शाखेत आधीपासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरु करण्यात आलं. तसंच इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. 54 वर्षांच्या शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भात आज उद्धव ठाकरे आज दुपारी साडेबारा वाजता झूम अॅपद्वारे शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता बैठकीला सुरुवात होईल. या व्हर्च्युअल बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होतील.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुटांवर पोहोचल्यावर नागरिकांचं स्थलांतर केलं जाईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांवर अधिक लक्ष असेल. याआधी पाणीपातळी 43 फुटांवर पोहोचली तरी नागरिक स्थलांतर करत नव्हते. परंतु मागील वर्षी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट इतकी आहे.
पुण्यात एकाच कुंटुबातील चौघांनी गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अतुल दत्तात्रय शिंदे आणि जया अतुल शिंदे या दाम्पत्या त्यांच्या सहा वर्षीय मुलाचा तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे. गुरुवारी (18 जून) रात्री ही घटना उघडकीस आली. पण आत्महत्या काही दिवसांपूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुखसागर नगरच्या वाघजाईनगर हे कुटुंब राहत होतं. अतुल आणि जया यांचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मयत अतुल शिंदे हा ओळखपत्र बनवण्याचे काम करत होता. परंतु आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पार्श्वभूमी
नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच काल, शनिवारी 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली तर 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात काल 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1935 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त ज्यादा ॲक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. यानंतरर दिल्ली, तमिलनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. ॲक्टिव्ह केसेसमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.