आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, ही सत्ता फार काळ टीकणार नाही : देवेंद्र फडणवीस
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Dec 2019 11:42 PM
कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील मंदिराच्या घंटेला एका तरुणीचा मृतदेह आढळला. वाढदिवशी मृतदेह आढळल्याने आत्महत्या की घातपात याचं गूढ अजून कायम आहे. तारळे येथील मृत तरुणी अकरावीमध्ये शिकत होती. पोस्टमार्टम अहवालानंतर घटनेची उकल होणार आहे.
नाशिकच्या अंबड़ परिसरातील आज दुपारची संतापजनक घटना घडली. खेळण्याच्या बहाण्याने मुलीला आरोपीने स्वतःच्या घरी नेत चिमुरडीवर अत्याचार केला. कैलास कोकणी (26 वर्षे) असे आरोपीचे नाव असून अंबड पोलिस ठाण्यात कोकणीवर पॉक्सो कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाला लावली हजेरी, शेजारी बसून मारल्या मनसोक्त गप्पा
धुळे : धुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, एक किलोमीटर वाहनांच्या रांगा, फास्ट टॅगसाठी सवय लागावी असं टोल कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना उत्तर
आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, ही सत्ता फार काळ टिकणार नाही : देवेंद्र फडणवीस :- आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही. काळ कोणी आपल्याला मागे ठेवू शकत नाही. असा आत्माविश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये व्यक्त केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, राम सातपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना देशात 2,264 कोटी तर महाराष्ट्रात 149 कोटी 'निर्भया' निधी खर्चाविना पडून, देशात तब्बल 89 टक्के निधी वापरलाच नाही
बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना देशात 2,264 कोटी तर महाराष्ट्रात 149 कोटी 'निर्भया' निधी खर्चाविना पडून, देशात तब्बल 89 टक्के निधी वापरलाच नाही
भाजप मुंबईत क्रमांक एकचा पक्ष - आशिष शेलार
शरद पवारांना भाजपसोबत जायचे असते तर आम्हा सर्वांना घेऊन ते गेले असते,लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू, जर भाजपसोबत जायचे असते तर त्यांनीच ठरवले असते तर त्यांना कोणीही अडवले नसते : छगन भुजबळ
जालन्यातून अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार
,
23 दिवसांनंतर मुलीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका
मुंबई भाजपची संघटनात्मक बैठक सुरु, दादर वसंत स्मृती येथे बैठक, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार उपस्थित
महापोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
दिल्लीच्या फिल्मीस्तान परिसरात भीषण आग, आगीत 35 जणांचा मृत्यू, अनाज मंडीतील कारखान्यांना आग
शिवसेना खासदारांची माताेश्रीवर आज हाेणारी बैठक रद्द, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाेलावली हाेती बैठक
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. अन्याय होतच राहिल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल, एकनाथ खडसेंचा भाजपला निर्वाणीचा इशारा, पक्षातील नेते टार्गेट करत असल्याचाही आरोप
2. काँग्रेसची फरफट होऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते गरजेचे, अशोक चव्हाणांचा स्वपक्षाला सल्ला, तर संविधानाची चौकट ओलांडल्यास बाहेर पडू, सेनेला सूचनावजा इशारा
3. मातोश्रीवर शिवसेना खासदारांची आज बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत खलबतं
4. महापोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, ९,१० तारखेची पशुसंवर्धन विभागाची परीक्षाही पुढे ढकलली
5. न्याय तात्काळ असू शकत नाही, हैदराबादमधील एन्काऊंटरबाबत सरन्यायाधीश शरद बोबडे यांचं परखड मत, न्यायाने सूडाचे स्वरुप घेऊ नये, बोबडे यांची भूमिका
6. नवव्या वसई विरार मॅरेथॉनला सुरूवात, जवळपास अठरा हजार धावपटूंचा सहभाग, विविध गटातील स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद