नागपूरच्या मारोतराव मुळे विद्यालयातील 31 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Feb 2020 11:27 PM
उल्हासनगर महापालिकेचा ४८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर
,
पाणीपट्टीत दुपटीने वाढ, तर मालमत्ता करात वाढ नाही!
,
मालमत्ता कराची थकबाकी तब्बल ४८५ कोटी
नागपूरच्या मारोतराव मुळे विद्यालयातील 31 विद्यार्थ्यांना आज शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. मध्यान भोजन आहारात आज शाळेत खिचडी आणि उसळ देण्यात आली. जेवण झाल्यावर काही वेळेनंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळं या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 31 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर एका विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा
मनसेच्या 9 फेब्रुवारीच्या महामोर्चापूर्वी मनसैनिकांना, पदाधिका-यांना पोलिसांच्या नोटिसा, परळ, काळाचौकी परिसरात 9 तारखेच्या मोर्चात लोकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी जागोजागी चौकसभा घेतल्या जातायेत,
या चौकसभांमध्ये कोणतेही गैरकृत्य किंवा शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मनसेच्या आयोजक पदाधिका-यांना जबाबदार धरले जाईल असे सूचित करण्यात आले आहे, त्यानुसार कलम 149 ची नोटीस काळाचौकी पोलिस ठाण्याकडून बजावण्यात आलीय...
सांगली महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदावर पुन्हा एकदा भाजपाचेच वर्चस्व, महापौरपदी भाजपाच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी भाजपाचे आनंदा देवमाने
कोरोनाच्या संशयितामुळे पुण्यात एअर इंडियाचं विमान अडकून, एअर इंडियाच्या त्याच फ्लाईटनं प्रवास करण्यास प्रवाशांचा नकार
देशात बेरोजगारी एवढी वाढली आहे की तरुण मोदींना लाठ्यांनी मारतील, राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन लोकसभेत गदारोळ, गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज स्थगित करण्याची वेळ
सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार यांची निवड, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 7 मतांनी पराभव..
मुंबई : मराठा तरुणांचं विविध मागण्यासाठी 11 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु, मंत्र्यांसोबत बैठकीला आम्हाला न नेता वेगळ्याच मुलांना नेलं जातं, तरुणांचा गंभीर आरोप, घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी
लातूर | स्टोव्हचा भडका उडाल्याने तरुणीचा चेहरा भाजला, लातूरच्या दीपज्योती नगरमधील घटना, जखमी तरुणीवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु
#BreakingNews एल्गार परिषद प्रकरण, एनआयएकडे तपास सोपवावा का? याचा निर्णय 14 फेब्रुवारीला, एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवण्यास सरकारी वकिलांचा विरोध
वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेचा आज पाणीपुरवठा बंद. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांट आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत MSEB(म रा वि म)चे देखभाल दुरुस्तीसाठी शटडाउन असल्यामुळे ह्या वेळेत मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांट येथे विद्युत सप्लाय बंद राहणार असल्याने ह्या वेळेत सूर्या धरणाच्या दोन्ही योजनेतून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच विद्युत पुरवठा चालू झाल्यावर पाणी पुरवठा सुरू होईल. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आहवान वसई विरार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागकडून करण्यात आले आहे.
जालना : निवडणूक कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सहा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार निर्धारित वेळेत काम न करून कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : पाणीपुरी बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य, प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला 5 हजारांचा दंड, दिवानसिंह नावाच्या विक्रेत्यावर महापालिकेची कारवाई, सातपूर परिसरातील बजरंग नगरमध्ये स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेदरम्यान कारवाई
राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गट प्रयत्नशील, दिल्ली निवडणुकीनंतर भाजपचं पुन्हा महाराष्ट्रात मिशन कमळ - सूत्र
पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातर्फे रिव्हीजीटिंग गांधी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. या चर्चा सत्राचे उद्घाटन तुषार गांधी यांच्या हस्ते होणार होतं. तर बीजभाषण अन्वर राजन हे करणार होते. मात्र काल संध्याकाळी या दोघांनीही चर्चा सत्रातील त्यांचा सहभाग रद्द असल्याचं सांगण्यात आलं. मॉडर्न महाविद्यालय हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी तर्फे चालवलं जातं. डॉक्टर गजानन एकबोटे हे या संस्थेचे मुख्य सचिव आहेत.
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या, माजी सभापती मनोहर पाटील यांची हत्या, कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग घटना
वर्ध्यात पालकमंत्री सुनील केदार यांचे महिलांच्या सन्मानाच्या विचारधारेकरिता एक दिवस लाक्षणिक उपोषण
वर्धा : पुलगाव, आर्वी, सेलू येथे मोर्चाचं आयोजन, हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला जाणार
औरंगाबाद : जय भवानी नगरमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज साहेबराव संकपळे यांची आत्महत्या, 2017 मध्ये त्यांच्यावर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंकजने संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याचा आरोप केलाय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
पार्श्वभूमी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. हिंगणघाट जळीतकांडातील गुन्हेगारांचा हैदराबादसारखा फैसला करा, प्रणिती शिंदेंच्या मागणीला महिला नेत्यांचा दुजोरा, तर विशेष अधिवेशन बोलवण्याची सुधीर मुनगंटीवारांची मागणी
2. मुंबईत रेल्वे पुलावर दिवसाढवळ्या तरुणींचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद होऊनही पोलीस तक्रारीच्या प्रतीक्षेत, चोरीप्रकरणी अटकेतील आरोपीला जामीन
3. प्रदूषण रोखा अन्यथा कंपन्यांना टाळं ठोका, माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्री ठाकरेंचा डोंबिवलीतील कारखान्यांना इशारा, बेवारस वाहनांसंदर्भात लवकरच धोऱण
4. पक्षात असूनही फोन टॅपिंगची गरज काय? माझाला दिलेल्या मुलाखतीत खडसेंचा भाजपला सवाल, तर मनातलं बंड कायम राहणार असल्याची भावना व्यक्त
5. कोरोना व्हायरसमुळे तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा तैवान वृत्तसंस्थेचा दावा, चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप
6. जखमी प्रवाशासाठी ट्रेन उलटी चालवली, देवळाली ते भुसावळ शटलच्या मोटरमन आणि गार्डकडून माणुसकीचं दर्शन, सर्व स्तरातून कौतूक