LIVE UPDATES | पुढील दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळातील खातेवाटपावर निर्णय होण्याची शक्यता

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Dec 2019 11:49 PM
बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार :- राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी - विक्रीची गैरसोय होवू नये यासाठी बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. पणन संचालनालयांच्या वतीने परिपत्रकाद्वारे बाजार समित्यांना त्याबाबत कळवण्यात आले आहे.
पुढील दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळातील खातेवाटपावर निर्णय होण्याची शक्यता :- खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या नेहरु सेंटर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, उपस्थित होते. या बैठकीवेळी खातेवाटप लवकर करा अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्यामुळे पुढील दोन दिवसात खातेवाटपावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या संध्याकाळी पुन्हा शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीची खातेवाटपावर बैठक होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार होईपर्यंत तूर्तास गृह विभाग मुख्यमंत्र्यांकडेच असावा असा सूर बैठकीत पाहायला मिळाला.
मोबाईल क्लिप काढल्याने शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या,
शाळेच्या बाथरुममध्ये शुटिंग, पोलिसांकडूंन दोघांना अटक, हैदराबादचं प्रकरण ताजं असताना वाशिममधल्या घटनेने खळबळ
खातेवाटपावर सेना राष्ट्रवादी मध्ये बैठक सुरु,

नेहरू सेंटरमध्ये उद्धव ठाकरे , शरद पवार यांच्यात चर्चा सुरु

राष्ट्रवादी कडून जयंत पाटील, अजित पवार उपस्थित
,
तर सेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, सुभाष राऊत उपस्थित
आरोपींनी बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला, त्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले : पोलिस आयुक्त व्ही सी सज्जनार
आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवले जातील. आर्म्स अॅक्ट अंतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली आहे : पोलिस आयुक्त व्ही सी सज्जनार
BREAKING : निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्माचा दयेचा अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवला; सुत्रांच्या माहितीनुसार, हा दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस गृहमंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांचा गुन्हा पॉक्सो अंतर्गत सिद्ध झालेल्यांना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर करण्याची परवानगी देऊ नये : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालेल्यांना दयेचा अर्ज सादर करण्याची परवानगी देऊ नये : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नागरिकांकडून हैदराबाद पोलिंसांवर फुलांचा वर्षाव, पीडितेला न्याय मिळाल्याची सामान्यांची प्रतिक्रिया
आरोपींचा खात्मा केल्यानं आनंद, जे झालं ते योग्य झाल्याची सामान्यांची भावना, दिल्लीतील निर्भयाची आईची प्रतिक्रिया
हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन, मी त्यांना सलाम करते. पोलिसांवर ती एन्काऊंटर करण्याची वेळ आली. आता सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहावे. कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान झाला पाहिजे मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. आरोपींना थर्ड डिग्री टॉर्चर करुन एन्काऊंटर केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा मृत्यू झाला. तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला. हैदराबाद पोलिस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in




    1. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचं एन्काऊंटर, सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा मृत्यू

    2. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजितदादांना क्लीन चिट, एसीबीनं हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात नियमबाह्य व्यवहार नसल्याचं स्पष्टीकरण

    3. पुण्यातल्या पोलीस परिषदेनिमित्त  मोदी-उद्धव एकाच कार्यक्रमात, युती तोडून सेनेनं आघाडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच आमनेसामने

    4. ठाकरे सरकारचा नवा दणका, नगर विकास खात्याचा निधी रोखला, फडणवीसांनी घेतेलेल्या निर्णयांना ब्रेक लावनं सुरुच

    5. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 63 वा महापरिनिर्वाणदिन, राज्यभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर, एबीपी माझावरही खास कार्यक्रम

    6. हैदराबादेत आज भारत -वेस्ट इंडिजमध्ये पहिला टी-२० सामना, टीम इंडियाचा विजयी वारु रोखण्याचं वेस्ट इंडिजसमोर आव्हान


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.