LIVE UPDATE | येस बँकेतून फक्त 50 हजार रूपये काढण्याची लिमिट

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Mar 2020 09:33 PM
येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. येस बँकेतून ग्राहकांना आता फक्त 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत.
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार आज 5 तारीख उजाडली तरी झाले नव्हते. या संदर्भात एबीपी माझाने बातमी दाखवली. त्या बातमीनंतर लगेच दुपारपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात आले. त्यामुळे महानगरपालिकेत आनंदाचे वातावरणात होते. ठाणे महानगरपालिकेत एकूण 7 हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. मात्र दर महिन्याला 1 तारखेला होणार पगार आज 5 तारीख उलटली तरी झाला नव्हता, म्हणून सर्व कर्मचारी चिंतेत होते. अनेकांचे तर कर्जाचे हफ्ते देखील चुकले. तर अनेकांची देणी रखडली. त्यामुळे सर्व कर्मचारी वर्ग चिंतेत होता. मात्र एबीपी माझाने दाखवलेल्या बातमी नंतर प्रशासनाला जाग आली. आणि लागलीच सर्व पगार त्यांनी दिले. महानगरपालिकेने मार्च महिना असल्याने आयकर कपातिचे कारण यासाठी दिले. त्यामुळे पगार देण्यास उशीर झाल्याचे मान्य केले आहे.
औरंगाबाद विमानतळ नामकरण छत्रपती संभाजीराजे विमानतळ औरंगाबाद
CAA, NPR कायद्याबाबत अभ्यास करायला समिती स्थापन, सहा सदस्यीय समिती, अनिल परब अध्यक्षतेखाली अभ्यास करणार समिती
शिवसेनेचे खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 7 मार्चच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भेट
जालना : जालना शहराजवळील MIDC परिसरात एका स्टील कंपनीत वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने 4 कामगारांचा होरपळून मृत्यू, 8 कामगार जखमी, जखमी पैकी तिघांची प्रकृती गंभीर, जखमींना औरंगबादच्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवलं,
सांगलीत युवक काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि युवक काँगेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की, केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हा युवक काँगेसचं आंदोलन, युवक काँग्रेसच्या आंदोलनकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
केंद्र सरकारनं पीएफवरील व्याजदर पुन्हा घटवले, पीएफवरील व्याजदर 8.65 टक्क्यांवरुन 8.50 टक्क्यांवर, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांची माहिती
चंदा कोचर यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. आयसीआयसीआय बँकेनं त्यांच्याविरोधात केलेली कारवाई कायदेशीर - हायकोर्ट. बडतर्फीला आव्हान देत आपला थकीत परतावा मिळवण्यासाठी चंदा कोचर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली
मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेसचा कांदाप्रश्नी रास्ता रोको,चांदवड येथे महामार्गावर रास्ता रोको, कांद्याला हमी भाव मिळावा, निर्यातबंदी उशीरा सूर का? वारंवार निर्बंध घालू नये या मागण्यांसाठी रास्ता रोको
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, 1 तारखेला होणारे पगार अजून न झाल्याने कर्मचारी चिंतेत, एकूण सात हजार कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक, इंग्लंड विरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द

नाशिक : एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाला जप्तीची एकलहरे ग्रामपंचायतीची नोटीस, थकीत घरपट्टी 17 मार्चपर्यंत भरली नाहीतर कोणत्याही क्षणी वीज निर्मिती केंद्राची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाची 2 कोटी 15 लाख 66 हजार 732 रुपयांची थकबाकी, 2018-19 आणि 2019-20 या दोन वर्षांची थकबाकी
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दरवर्षी मुंबईत होणाऱ्या कलाकारांच्या धुळवडीला यंदा ब्रेक, हिंदी पाठोपाठ मराठी कलाकारांनीही धुळवडीचं सेलिब्रेशन केलं रद्द
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने चंदनऊटी सह दैनंदिन वापरासाठी 180 किलो चंदन खरेदी केलं. कर्नाटकातील बंगळुरू येथून खरेदी करण्यात आलेल्या या चंदनाची किंमत 30 लाख रुपये आहे. पुढची दोन वर्ष या चंदनाचा वापर करून दोन्ही मूर्तीला गंध लावण्यात येणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची माहिती.
सांगली : सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. रात्रीच्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्सप्रेसमधून तीन मुलाना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. साताऱ्यात मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं, तीनही मुले सुखरूप.
राज्यसभेच्या जागेवरुन काँग्रेस- राष्ट्रवादीत वाद, सूत्रांची माहिती. राज्यसभेतील राष्ट्रवादीची एक जागा काँग्रेसला देण्याची मागणी, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दुय्यम खाती मिळाल्यानं राज्यसभेची एक जागा मिळावीअशी काँग्रेसची मागणी, फौजिया खान यांच्या जागेवर काँग्रेसचा दावा
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या आठवड्याला आयुक्तांची मंजूरी, दोन दिवसांत परिपत्रक निघून येत्या दोन दिवसात अंमलबजावणी सुरु होणार, मात्र या पाच दिवसांच्या आठवड्यासाठी एका तास जास्त काम करावं लागणार
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश, लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप. जिल्हा जात पडताळणी समितीने दाखल अवैध ठरवल्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांनी न्यायालयात दाखल केली होती फिर्याद

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 29 वर, कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने गुडगावमध्ये पेटीएमचं कार्यालय बंद

2. कोरोना संशयितांच्या सॅम्पल्सची मुंबईतही तपासणी होणार, कस्तुरबा रूग्णालयात 5 तासांत अहवाल मिळणार, मुंबई विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी

3. दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी, भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देष

4. विधीमंडळाचा आजचा दिवस महिला प्रश्नांसाठी समर्पित, सभागृहात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाचा ठराव येणार

5. खासदार जयसिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल करा, सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश, लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप

6. महिला टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडसोबत, आतापर्यंत विश्वचषक गाजवलेल्या शेफाली वर्माच्या फलंदाजीकडं सर्वांचं लक्ष

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.