JNU Violence | जेएनयू परिसरात फ्लॅग मार्च, स्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती, 18 जखमी विद्यार्थी एम्समध्ये भर्ती

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jan 2020 11:35 PM
जे एन यु मध्ये झालेल्या हल्याचा निषेध म्हणून मुंबई आयआयटीत विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलन


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करतच म्हटलं आहे की, तोंडाला स्कार्फ बांधून काही लोकांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर क्रूर हल्ला केला आहे. या घटनेत काहीजण गंभीर जखमी आहेत. निडर विद्यार्थ्यांना फॅस्टिस्ट शक्ती घाबरल्या आहेत. जेएनयूतील आजचा हिंसाचार याचेच प्रतिबिंब आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की, जेएनयू परिसरात फ्लॅग मार्च केला जात आहे. आता स्थिती नियंत्रणात आहे. जेएनयूमधील 18 जखमी विद्यार्थ्यांना एम्समध्ये भर्ती करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल ट्वीट केलं आहे. जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून मला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रूरपणे हल्ला केला गेला आहे. पोलिसांना तातडीने ही हिंसा थांबावी व शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल? , असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
जेएनयु घटनेवर अभाविपचं काय आहे म्हणणं-
अभाविपने दावा करताना म्हटलं आहे की, डाव्या विद्यार्थी संघटना एसएफआय, आयसा आणि डीएसएफच्या सदस्यांनी आमच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हॉस्टेलमधील अनेक अभाविप सदस्यांवर हल्ले होत आहेत, वसतीगृहात तोडफोड देखील करण्यात आली आहे.
दिल्लीतल्या जे एन यू विद्यापीठात अभाविप आणि डाव्या संघटनांमध्ये राडा, दगडफेक, तोडफोड, काही विद्यार्थी गंभीर जखमी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यामध्ये अमुलाग्र बदल करण्याचं निश्चित, नव्या झेंड्यामध्ये आता भगवा रंग प्रामुख्याने दिसणार, या झेंड्यामध्ये शिवरायांची मुद्राही छापली जाणार, राज ठाकरे यांचं राजकारण आता मराठीच्या मुद्द्यावरुन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकणार का? अशी चर्चा , बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी नव्या झेंड्याचं अनावरण होणार असल्याची माहिती
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुले पिंपळगाव येथील मार्केट यार्ड भागातून पोलिसांनी 22 लाखांच्या गुटख्यासह एक टॅम्पो, छोटा हत्ती जप्त केला आहे. मात्र या वेळी गुटख्याचा काळा बाजार करणारे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. रात्री बारा वाजता माजलगाव पोलिसांनी छापा मारला असता 30 पोते गुटखा त्याची किंमत अंदाजे 22 लाख रूपये आहे. यामध्ये 22 लाखाचा गुटखा तर 8 लाखांचा आयशर टॅम्पो, 4 जितो छोटा हत्ती असे 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यामध्ये अमुलाग्र बदल होणार, नव्या झेंड्यामध्ये आता भगवा रंग प्रामुख्याने दिसणार, या झेंड्यामध्ये शिवरायांची मुद्राही छापली जाणार बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी नव्या झेंड्याचं अनावरण होणार असल्याची माहिती
महाराष्ट्रातील सरकार विश्वासघातानं तयार झालंय : देवेंद्र फडणवीस
नागपूरमधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका...नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेचे थेट प्रक्षेपण...
भाजपचे लोक निराशेच्या गर्तेत अडकले आहेत; संजय राऊत यांची टीका...
राज्यमंत्री अब्दुल सत्तार मातोश्रीवर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट, राजीनामा नाट्यावर चर्चा केल्याची माहिती
LIVE : राज्यमंत्री अब्दुल सत्तार मातोश्रीमध्ये दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार
LIVE : मी मुख्यमंत्र्यांना भेटून माझं मत मांडेल, त्यानंतर सविस्तार बोलेल, राज्यमंत्री अब्दुल सत्तार मातोश्रीकडे रवाना
वर्धा : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, आष्टी तालुक्यातील मलकापूर शिवारातील घटना, बकाराम धुर्वे असं मृताचं नाव, जंगल शिवारात आढळला मृतदेह
EXCLUSIVE : जी खाती वाटप केली आहे त्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. इको पर्यटन, आरोग्य पर्यटन करण्याची इच्छा आहे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करत राहणार, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया
गृह निर्माण मंत्रिपद मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं भावनिक ट्विट, लहापनी वास्तव्यास असलेल्या चाळीचा पत्ता टाकून दिला जुन्या आठवणींना उजाळा, शरद पवारांचे मानले आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजूरी
बुलडाणा : मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे आगीत पाच दुकानं जळून खाक, दुकानांचं मोठं नुकसान, व्यापाऱ्यांचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती, आगीचं नेमकं कारण अस्पष्ट
सोलापुरात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवेळी गॅसचा स्फोट, चौघे जखमी, उद्घाटनासाठी फुगे फुगवत असताना झाला स्फोट, जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

पार्श्वभूमी

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा




1. अखेर 5 दिवसांनंतर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे सुपूर्द, कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, संभाव्य यादी माझाच्या हाती

2. अब्दुल सत्तार गद्दार आहेत, चंद्रकांत खैरेंची सत्तारांवर जहरी टीका, तर योग्य वेळी उत्तर देणार, सत्तारांकडून स्पष्ट, औरंगाबाद झेडपी निकालावरुन शिवसेनेत वादंग

3. विश्वासघातानं चाललेलं सरकार 6 महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, फडणवीसांचं भाकित, खातेवाटप दिरंगाई आणि नाराजीवरुन ऑपरेशन लोटस सुरु झाल्याची चर्चा

4. सीएएसाठी भाजपनं दिलेला समर्थन नंबर ट्विटरवर ट्रोल, सनी लिओनीच्या नावानं फोन नंबर सोशल मीडियावर व्हायरल, लाखो जणांची फजिती

5. हाडं गोठवणाऱ्या थंडीत परभणी जिल्ह्यात सैन्य भरतीला सुरुवात, हजारो उमेदवारांवर कडाक्याच्या थंडीत बसण्याची वेळ, प्रशासनाकडून कुठलिही व्यवस्था नाही

6. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात गतविजेता बाला रफिक शेख आणि अभिजीत कटकेची विजयी सलामी, 61 किलो माती विभागात पुण्याच्या सागर मारकडला सुवर्ण

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.