- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
LIVE UPDATES | खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश
LIVE UPDATES | खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Mar 2020 11:53 PM
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मधूबन हॉटेलला भीषण आग, सदर हॉटेलमधील रूममध्ये अडकलेल्या नागरिकांना पोलीस आणि अग्निशमन जवानांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले,
चंद्रपूर : कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे वरोरा येथे आरोग्य विभागाच्या देखरेखित ठेवण्यात आलेला व्यक्ती दिल्लीला गेल्याची सूत्रांची माहिती, सदर व्यक्ती इराणवरून आल्याची माहिती
सोलापूर :
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश,
लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप,
जिल्हा जात पडताळणी समितीने दाखल अवैध ठरवल्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांनी न्यायालयात दाखल केली होती फिर्याद
तहसीलदारांनी नोंदविलेल्या जबाबानंतर न्यायालयाचे आदेश
निर्भया प्रकरण : दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी 30 मार्चला मतदान, 31 मार्चला मतमोजणी, आचारसंहिता लागू , अमरीश पटेल यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील बोरकनार गावात लग्न समारंभासाठी आलेले तिघे बुडाले, आईसह दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू, लग्न समारंभ असलेल्या घरी शोककळी पसरली, मृतकांमध्ये 32 वर्षीय मुक्ता पटले, 13 वर्षीय आदित्य पटले आणि 10 वर्षीय काजल पटले याचा समावेश आहे
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणखी एक कोरोना संशयित रुग्ण दाखल, अमेरिकेहुन आलेल्या 42 वर्षीय नागरिकाला त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी केले दाखल, थुंकीचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले
झी स्टुडिओजला मुंबई उच्च न्यायालयाकडून 'धक्का'. अमेय खोपकर आणि महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या 'दे धक्का २' या नव्या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा. कॉपीराईट कायद्यावरून कोर्टात आलेल्या 'झी'ला तूर्तास कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल, नेमंक कशासाठी दाखल केलं याबाबत अद्याप माहिती नाही
बीड : माजलगावच्या नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी, भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये नगराध्यक्षांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी घेतले होते ताब्यात, माजलगाव नगर पालिकेचं पाच कोटी रुपयांच्या अपहाराचं प्रकरण, माजलगाव मुख्याधिकारी व लेखापाल यांना 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
माजी भाजप आमदार नरेंद्र मेहतांना हायकोर्टाचा दिलासा, 20 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश, राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश, बलात्कार आणि अॅट्रॉसिटीच्या आरोपांखाली दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मेहतांची हायकोर्टात धाव
डोंबिवलीच्या पुलकोंडीमुळे नववर्ष स्वागतयात्रेचा मार्ग बदलला, यंदा पश्चिमेऐवजी पूर्वेतूनच स्वागतयात्रा निघणार, पुलकोंडीचा निषेध म्हणून मनसे उभारणार काळ्या गुढ्या
देशातील कोरोना व्हायरसच्या स्थितीबाबत पंतप्रधानांचे प्रधान सचिव आज दुपारी बैठक घेणार. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेणार
सिडकोच्या कामांवर कॅगचे ताशेरे, भाजप सरकारच्या काळातील कामांवर कॅगचे गंभीर ताशेरे, कॅग अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका, 50 कोटी पेक्षा जास्त कामाच्या 16 निविदा राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रात जाहिराती न देता काढता देण्यात आल्या, 890 कोटीची कामे अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आली, त्यांच्याकडे या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. 430 कोटी रुपयांच्या 10 कामात निविदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. यातील 70 कोटीची अतिरिक्त कामे निविदा न मागवता देण्यात आली, त्यात पारदर्शकता नव्हती. 15 कोटी पेक्षा जास्त किमतीची सात कामे देताना तांत्रिक मूल्यांकन करताना गोंधळ.
सारथी संस्थेच्या चौकशीसाठी पुन्हा दुसऱ्या समितीची स्थापना, सत्तेतील दोन पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे निर्णय, सारथी संस्थेसाठी 23 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले, त्यापैकी 11.50 कोटी रुपयांचे वाटप झालं त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा पहिल्या चौकशी समितीचा अहवाल, हा अहवाल राजकीय दबावापोटी तयार करण्यात आल्याचा संशयामुळे पुन्हा दुसरी समिती
कोरोना व्हायरसबाबत मुंबईत रणनिती तयार करण्यासाठी विशेष बैठक, कोरोनाबाबत मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी उद्या बोलावली विशेष बैठक, महापालिकेचे आरोग्य अधिकारी, प्रत्येक वार्ड ऑफिसर, महापालिकेच्या रुग्णालयाचे डीन, खासगी रुग्णालयातील अधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश, कोरोनाबाबत तयारी आणि उपाययोजना यावर चर्चा होणार
भारतात तब्बल 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक, या बैठकीत कोरोना रोखण्याबाबत उपाययोजनांबाबत चर्चा होणार
अंबरनाथमध्ये डिपार्टमेंटल स्टोअरला लागली आग, पटेल आर मार्ट दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दल वेळीच पोहोचल्यानं अनर्थ टळला
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. भारतात 6 जणांना कोरोना व्हायरसची लागण, उपाययोजनांसाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक, कोरोनामुळे लष्कराचा युद्धाभ्यास रद्द होण्याची शक्यता
2. मराठीजनांच्या दणक्यानंतर तारक मेहताच्या टीमकडून माफीनामा, मुंबईची भाषा हिंदी असल्याच्या संवादावरुन मालिकेवर चौफेर टीका
3. मुस्लीम आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ठरलीच नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर, मलिकांनी केली होती अध्यादेश काढण्याची घोषणा
4. मुंबईत लवकरच होर्डिंग पॉलिसी, होर्डिंग्समुळे झालेल्या वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची माहिती, औरंगाबादेत अवैध होर्डिंग्स काढण्याचे न्यायालयाचे आदेश
5. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना लवकरच गणवेश, अन्न आणि मानके सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर, महिन्यातून प्रत्येक डेअरीची किमान एकदा तपासणी
6. सोशल मीडिया सोडण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्वीटचा सस्पेन्स संपला, रविवारी महिला सांभाळणार पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंटस, महिला दिनानिमित्त घोषणा