महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलात छोटा बदल, एक अधिकचे कॅबिनेट मंत्री पद आता राष्ट्रवादीला
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Dec 2019 10:47 PM
चार तासांनंतर सह्याद्री अतिथीगृहामधील राज्याच्या कॅबिनेटची बैठक संपली,
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाली : एकनाथ शिंदे
माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम तिहार जेलमधून बाहेर, आयएनएक्स मीडियाप्रकरणी जामीन
महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलात छोटा बदल, एक अधिकचे कॅबिनेट मंत्री पद आता राष्ट्रवादीला/
15 /15/12 आधी ठरलेला फॉर्म्युला, त्यात शिवसेनाला 15 मंत्री अधिक मुख्यमंत्री म्हणजे 16 एकूण मंत्रिपदं होती
आता नवीन फॉर्म्युला.
शिवसेना 15 मंत्रिपद
त्यात 11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री ह्यात मुख्यमंत्री
राष्ट्रवादी 16
12 कॅबिनेट+ 4 राज्यमंत्री
ह्यात उपमुख्यमंत्री
काँग्रेस 13
9 कॅबिनेट+ 3 राज्यमंत्री + विधानसभा अध्यक्ष
वाशिम बाजार समितीमध्ये गेल्या पाच वर्षात सोयाबीनला सर्वाधिक भाव, गेल्या 5 वर्षात सर्वाधिक 4, 180 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, वाशीम बाजार समितीलगत असलेल्या यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यामधून सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी
सनातन संस्थेवर बंदी घातल्याने प्रश्न सुटणार नाही - शिवसेना खासदार संजय राऊत
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवेसना विरोध करणार, संसदेत शिवसेना या विधेयकाविरोधात मतदान करणार आहे, या विधेयकाला मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून यानंतर हे विधेयक उद्या लोकसभेत विधेयक मंजुरीसाठी पटलावर मांडलं जाणार आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपत्र प्रकरणी कोर्टात आज सुनावणी होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात याचिक दाखल करण्यात आली होती. नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायलायत ही सुनावणी होते आहे
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची निवड...
कांदयाचे चढ़े दर पाहता व्यापाऱ्यांच्या खरेदीवर केंद्र सरकारकडून मर्यादा, याआधी 50 मेट्रिक टन कांदा साठवणूक करण्याची मर्यादा आता 25 मेट्रिक टनावर करण्यात आलीय, तर किरकोळ व्यापारी 5 मेट्रिक टन कांदा साठवणूक करु शकणार, यासंबंधीत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर, देश सोडून न जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश, पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
साखर कारखान्यांना दिलेल्या हमीचं काय होणार? भाजप नेत्यांच्या कारखान्यांना दिली होती हमी. नवीन सरकार आल्याने भाजप नेते चिंतेत...
साखर कारखान्यांना दिलेल्या हमीचं काय होणार? भाजप नेत्यांच्या कारखान्यांना दिली होती हमी. नवीन सरकार आल्याने भाजप नेते चिंतेत...
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची छत्रपती संभाजी राजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कृषी विभागासारखं आव्हानात्मक खाते आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दर्शवली तयारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला मानाचे 'ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र', महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही : उद्धव ठाकरे
2. मी भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही : पंकजा मुंडे
3. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी तीन माजी संचालकांना अटक, आरोपींची संख्या 12 वर
4. आरे, नाणारप्रमाणे भीमा कोरेगाव आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घ्या; नितीन राऊत, धनंजय मुंडेंची मागणी
5. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर राज्यसरकार, महापालिकेकडून विविध सोयी-सुविधांची व्यवस्था
6. फेडररच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा सन्मान; स्वित्झर्लंडकडूनं चांदीचं नाणं बाजारात