विस्ताराला चार दिवस उलटून गेल्यानंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला, उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता

दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jan 2020 11:03 PM
सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना माहीम येथील रहेजा फोरटीज रुग्णालयात दाखल,

उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात केले दाखल,

, वाहिन्यावर डिबेटमध्ये त्यांना त्रास जाणवू लागला होता

अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
चेंबूर हिंसाचार प्रकरणी चौकशी अहवाल हायकोर्टात सादर
,
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचं प्रकरण,

तणावाखाली आत्महत्या केलेल्या वडिलांच्या अंत्ययात्रेदरम्यान उसळला होता हिंसाचार,

मुंबईतील चेंबूर परिसरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यामुळे तिच्या वडिलांनी तणावाखाली आत्महत्या केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. या घटनेमुळे चेंबूर येथे उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी तपासयंत्रणेनं आपला तपास अहवाल शुक्रवारी हायकोर्टात सादर केला. हायकोर्टाने हा अहवाल स्वीकारत या याचिकेवरील सुनावणी तूर्तास २७ जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.
सहलीवर गेलेले राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य औरंगाबादला पोहचले तर भाजपचे सदस्य नगरला पोहचले, राष्ट्रवादीच्या सदस्यांची धुरा धनंजय मुंडेंकडे, तर भाजपच्या सदस्यांची धुरा प्रीतम मुंडे यांच्याकडे
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एक मोबाईल सापडला,

तुरुंगाधिकारी राजेंद्र जाधव यांनी घेतलेल्या झडतीत सॅमसंग कंपनीचा मोबाईल सापडला ,


मोबाईल सोबतच चार बॅटऱ्या देखील सापडल्यामुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
रायगड जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षपदी शेकापच्‍या योगिता पारधी तर उपाध्‍यक्षपदी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली. दोन्‍ही पदांसाठी प्रत्‍येकी एकेकच अर्ज आल्‍याने ही निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना या आघाडीत सहभागी होणार की उमेदवार उभे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून लागून राहिले होते. सत्तेत सहभागी होण्‍यावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह होते. शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले नाहीत त्‍यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. रायगड जिल्‍हा परिषदेत शेकाप 23 , राष्‍ट्रवादी 11 , शिवसेना 18 आणि कॉंग्रेस व भाजप प्रत्‍येकी 3 असे पक्षीय बलाबल आहे.
खातेवाटप अपडेट -
काँग्रेसला बंदरे (पोर्टस), खार जमिनी आणि सांस्कृतिक खातं तर राष्ट्रवादीला माजी सैनिक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण ही दोन खाती तर कृषी खाते हे शिवसेनेकडे राहणार
महाराष्ट्रात एका रिक्त जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. धनंजय मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक होणार आहे. 14 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे तर 24 जानेवारीला मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी केली जाईल. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विधान परिषदेवर पहिली वर्णी कुणाची लागणार? याचा प्रश्न सर्वांना पडला आहे.
औरंगाबाद झेडपी निवडणूक उद्यावर ढकलली,
वैधानिक पेच निर्माण झाल्याने प्रशासनाचा निर्णय,
काँग्रेसचे 6 शिवसेनेचे 2 सदस्य फुटले
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपच्या रंजना पाटील विजयी, खडसे-महाजनांनी गड राखला..
रंगाबाद जिल्हा परिषदेत वैधानिक पेच निर्माण झाल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
महाविकासआघाडीचा पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती, पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला 13-13-10 हा असण्याची शक्यता, शिवसेना 13, राष्ट्रवादी 13, काँग्रेसचे 10 पालकमंत्री असण्याची शक्यता, काँग्रेसने एक पालकमंत्री वाढवून मागितल्याची माहिती, आमदारांच्या तुलनेत पालकमंत्री प्रत्येक पक्षाला मिळण्याची शक्यता
जळगांव निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजाप सदस्य सभागृहात दाखल
काश्मीरात वीरमरण आलेल्या सातारच्या वीरपुत्रावर आज अंत्यसंस्कार, शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव मुंडे गावात दाखल...
खाते वाटपाचा पत्ता नाही, पण बंगले वाटपावरुन नाराजी, पसंतीचा बंगला न मिळाल्यानं मंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली नाराजी, तसेच पसंतीचा बंगला मिळावा यासाठी नेत्यांमध्ये सुरु आहे चढाओढ, अनेक मंत्र्यांना हवे आहेत पसंतीचे बंगले
चंद्रपुरात विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावातील घटना, रामन्नी देवलोहट (वय55) असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जागली करुन शेतातून आज सकाळी 6 वाजता परत येत असताना रस्त्यात विज पडून त्यांचा मृत्यू झाला.
जळगावात भाजप नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमध्ये अर्धा तास चर्चा, भाजपत सर्व काही आलबेल, भेटीनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया तर जिल्हा परिषदेशिवाय अन्य कुठल्याही विषयांवर चर्चा न झाल्याती खडसेंची माहिती
मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरु झाल्याचा रेल्वेचा दावा, बिघाड दुरुस्त झाल्यावर सकाळी 6.10 मिनिटांनी ट्रेन रवाना, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांची ट्वीटद्वारे माहिती
आंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड, कसारा- कल्याण वाहतूक ठप्प, कल्याणहून मुंबईला जाणारी वाहतूक अर्धा तास उशिरानं, एका वाळूच्या डंपरने रेल्वे गेटला धडक दिल्याने अपघात, त्यामुळे ओव्हरहेड वायरच्या विद्युत पुरावठ्यावर परिणाम

पार्श्वभूमी

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा...



1. 4 तासांच्या बैठकीनंतरही खातेवाटपाचं भिजत घोंगडं, 95 टक्के एकमत झाल्याची अजित पवारांची माहिती, खातेवाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

2. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज भास्कर जाधव गुहागरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार, तर तानाजी सावंतांसाठी उस्मानाबादचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

3. आरोप-प्रत्यारोपानंतर 24 तासांत खडसे आणि महाजनांचं मनोमिलन, रात्री उशिरा फडणवीस जळगावमध्ये दाखल, औरंगाबाद झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीही आज मतदान

4. आंबिवली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा वाहतूक विस्कळीत, मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम

5. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राजकारण तापलं, विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप तर संजय राऊतांचीही आगपाखड

6. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज जयंती, पुण्यात भिडे वाड्यापासून रॅली, तर सकाळी साडेनऊ वाजता सावित्रीबाईंची जीवनगाथा


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.