LIVE UPDATES | निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयची क्यूरेटिव याचिका पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने फेटाळली

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jan 2020 07:44 PM
यवतमाळ : शेतकऱ्यांची कामे न करणाऱ्या आणि शेतकऱ्यांशी अरेरावीने वागणाऱ्या तलाठ्याचे निलंबन, गावकऱ्यांनी वाटली गावात साखर,
अडेगाव तालुका झरी जामनीतील घटना
दिल्लीतील जामिया परिसरात रॅली दरम्यान गोळीबार, सीएए विरोधातील मोर्चात अज्ञाताकडून गोळीबार, तरूण जखमी, नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू
साईबाबांच्या जन्मभूमी वाद : साईबाबांच्या जन्मभूमिचा वाद कोर्टात जाणार, 5 फेब्रुवारीला पाथरीकर याचिका दाखल करणार; राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांची माहिती
निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयची क्यूरेटिव याचिका पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने फेटाळली, याचिकेमध्ये अशी कोणती गोष्ट नाही ज्यामुळे पुन्हा सुनावणीची गरज आहे, खंडपीठाचं मत. मुकेश आणि विनय यांची क्यूरेटिव याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. पवन यांनी अद्याप याचिका दाखल केली नाही. तसेच फाशीला स्थगिती देण्याची मागणी देखील या वेळी फेटाळण्यात आली आहे.
केरळमध्ये कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रूग्ण आढळला. चीनमधील हुआन विद्यापीठात हा शिक्षण घेत होता. विद्यार्थी तरूणाची प्रकृती स्थिर असून उपचारासाठी खास वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
कोकणातील हापूस आंब्याच्या आवकीला नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. दोन महिने आधीच कोकणातील हापूस दाखल झाल्याने व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सकाळी चार पेट्या हापूस मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून हापूस आंब्याची पारंपारिक पध्दतीने पुजा करण्यात आली. कोकणातील बिघडलेले वातावरण, पडलेला आवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे हापूस आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला होता. त्यामुळे झाडाला फळ लागण्यास उशीर झाला. अखेर मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने पिकवलेला हापूस एपीएमसीत दाखल झाला आहे. यावर्षी हापूस आंबा सिझन उशीरा सुरू झाला असला तरी मार्च, एप्रिल , मे आणि जून पर्यंत जोरदार हापूस आंबा मार्केट मध्ये येणार असल्याने खवय्यांना तो स्वस्तात चाकता येणार आहे.
महात्मा गांधीची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर, काँग्रेस नेत्यांकडूनही महात्मा गांधींना अभिवादन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी विद्या बाळ यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. विद्या बाळ या मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादिका होत्या. महिलांच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या अशी विद्या बाळ यांची ओळख होती.
विधानसभा निवडणुकांनंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर, राम शिंदे, मोनिका राजळे, कर्डिलेंची विखेंविरोधात तक्रार

नवं सरकार आल्यानंतर राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आता लवकरच आयपीएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी चांगल्या पदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल दिल्लीला जाणार आहे. त्यावर हे मोठे निर्णय अवलंबून आहेत.
एल्गार परिषदेच्या तपासाशी संबंधित कागदपत्र एनआयएला देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिलेला असताना, आता एनआयएने पुणे सत्र न्यायालयाकडून या प्रकरणातील न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा आणि कागदपत्रं मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी एनआयएकडून पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी पुणे सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.

राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सातारा, नाशिक, निफाड, नगर आणि मुंबईतही पारा चांगलाच घसरला आहे. महाबळेश्वरचं तापमान 4 अंशांवर पोहचलं असून वेण्णालेक परिसरातले दवबिंदू गोठले आहेत. तसेच नाशिकमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे. उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणंही नागरिकांना अवघड झाले आहे. थंडी पुन्हा परतल्याने लहान मुलांच्या शाळेची वेळ बदलावी, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.
शिवसेनेनं प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुनगंटीवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. नांदेडमधल्या एका विवाह सोहळ्याला मुनगंटीवार गेले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेनेवर खोचक टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. मुंबईच्या शक्तिशाली मातोश्रीचा शक्तिपात झाल्यामुळेच दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा म्हणजे 21व्या शतकातील आश्चर्य असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची घसरण झाली आहे. कमाल तापमानातील घट आणि दिवसा वाहणारे गार वारे अशा दुहेरी वातावरणामुळे मुंबई रात्रीसह दिवसाही गारठली आहे.
मुंबईत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ट्रकचा धक्का लागल्यानं पादचारी पुलाचा सांगाडा कोसळल्याची घटना घडली आहे. गोवंडीजवळच्या बैंगनवाडी सिग्नलवर मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली. पुलाच्या सांगाड्याखाली दबून 4 गाड्यांचा चुराडा झाला आहे. तर या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीबद्दल एक वक्तव्य केलं आहे. आणीबाणीच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. बीडमध्ये आयोजित संविधान महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. परंतु, आपल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलंय..यावेळी इंदिरा गांधींबाबत आपल्याला नितांत आदर असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान आव्हाडांच्या वक्तव्यानंतर 'जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं. पण काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांचा अनादर केलात तर चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांनी दिला आहे.' ट्विटरवरुन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


1. इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला, बीडमधल्या संविधान बचाव सभेत जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य, नेत्यांना अनादर केल्यास प्रत्युत्तर देण्याचा चव्हाणांचा इशारा


2. मध्य रेल्वेवरील पहिल्यावहिल्या एसी लोकलचं आज उद्घाटन, दुपारी 3 वाजता सीएसएमटीवरून लोकलला झेंडा, दिवसभरात 16 फेऱ्या


3. मेट्रोच्या आरे कारशेडचं स्थलांतर अव्यवहार्य असल्याचा अहवाल बंधनकारक नाही, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं पुन्हा वादंग, तर मेट्रो 3च्या भुयारीकरणारा 25वा टप्पा पूर्ण


4. अर्थमंत्रीपदी नवीन व्यक्ती नेमण्याच्या संघाच्या सूचना, सूत्रांची माहिती, तर मोदींनी सीतारमण यांच्या हातून सूत्र काढून घेतली, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा


5. चीनमध्ये कोरोना व्हायरसचे 132 बळी, 27 भारतीय हुबे युनिव्हर्सिटीत अडकलेत, गडचिरोलीतील 7 जणांचा समावेश, भारतीय दूतावासाकडे मदतीची मागणी


6. रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाची न्यूझीलंडवर सनसनाटी मात, हॅमिल्टनमध्ये टीम इंडियाचा ट्वेन्टी ट्वेन्टीत ऐतिहासिक मालिकाविजय साजरा.


एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.