LIVE UPDATES : नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Dec 2019 11:23 PM
अंबरनाथ : चुकीची औषधे आणि इंजेक्शन दिल्याने 10 ते 12 रुग्ण अत्यवस्थ, अंबरनाथ पालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयातील प्रकार, सर्व रुग्णांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवलं, रुग्णांना एक्सपायरी झालेली औषधं दिल्याचा अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांचा आरोप

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
सोनाई 'ऑनर किलिंग' प्रकरणी सहापैकी पाच जणांची फाशी हायकोर्टाकडून कायम. अशोक नवगिरे या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाकडून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. जानेवारी 2013 मध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून झाली होती तीन तरूणांची निर्घृण हत्या
महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार आणि इतर गोष्टींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज नवी दिल्लीत संध्याकाळी 6 वाजता सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.
पंकजा मुंडे भाजप सोडत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. त्या भाजपमध्ये होत्या आणि राहणार आहे. पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टचा वेगळा अर्थ काढू नये. अपघाताने आलेलं सरकार अफवा पसरवत आहे, असं स्पष्टीकरण भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलं.
मुंडे-महाजन कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत, परंतु याचा अर्थ त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं नाही या बातम्या चुकीच्या आहेत. पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट ही 12 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे : विनोद तावडे
नव्या मंत्र्यांच्या निवासस्थानांचं वाटप जाहीर झालं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला देण्यात आला आहे. तर छगन भुजबळ पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या 'रामटेक' बंगल्यावर परतणार आहे. याशिवाय विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' बंगल्यात जयंत पाटील राहतील. पंकजा मुंडे यांच्या 'रॉयल स्टोन' बंगल्यात एकनाथ शिंदे राहणार आहेत. तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वास्तव्य आता 'सागर' बंगल्यात असेल.
शिवसेच्या संपर्कात अनेक प्रमुख नेते आहेत, पंकजा मुंडेंबद्दल 12 डिसेंबरलाच कळेल : संजय राऊत
बुलेट ट्रेनचं ओझं आमच्या डोक्यावर नको : संजय राऊत
भाजप नेते अनंत हेगडे यांच्या दाव्यावर फडणवीस नाही तर मुख्य सचिव खुलासा करतील : संजय राऊत
आरे कारशेडनंतर ठाकरे सरकार आता बुलेट ट्रेनला स्थगिती देणार?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासांत केंद्राचे 40 हजार कोटी वाचवले; भाजप खासदार अनंतर हेगडे यांचं खळबळजनक विधान
कोल्हापुरातील जीवबा नाना पार्क आणि राजारामपुरी परिसरात 10 ते 12 जणांचा पोलिसांवर हल्ला. करवीर पोलीस ठाण्यातील हवालदारांसह दोन पोलीस जखमी, या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल. संशयित आरोपींपैकी 5 जणांना पोलिसांनी केली अटक, हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तिवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 7 डिसेंबर ते 27 डिसेंबर यादरम्यान बंद राहणार, मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम, प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार
माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ पत्रकार अरुण शौरी यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे भरती केलं, न्युरो सर्जन डॉ. सचिन गांधी यांच्या निगराणीखाली अरुण शौरींवर रुबी हॉल क्लिनिकच्या आयसीयुमध्ये उपचार सुरु, शौरी यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांबाबत डॉक्टरांकडून दुपारी अधिक माहिती दिली जाणार
एमपीएससीच्या पुढच्या वर्षीचं वेळापत्रक जाहीर, पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला, तर 8,9,10 ऑगस्टला मुख्य परीक्षा
दोन दिवसांत खातेवाटप करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, महाराष्ट्रातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याची प्रक्रियाही सुरु

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in



  1. दोन दिवसांत खातेवाटप करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, महाराष्ट्रातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याची प्रक्रियाही सुरु

  2. आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

  3. विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसाचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरेंच्या कोपरखळ्या आणि टोमणे, काँग्रेसमधल्या दिग्गजांना मागे टाकत नाना पटोले विधानसभाध्यक्षपदी विराजमान

  4. पुढच्या राजकीय वाटचालीसंदर्भात 12 डिसेंबरला निर्णय जाहीर करणार, पंकजा मुंडेंच्या फेसबूक पोस्टनं राजकीय वर्तुळात खळबळ, गोपीनाथ गडावर करणार घोषणा

  5. आता आठवड्याचे सातही दिवस 24 तास एनईएफटी सेवा, ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना मोठा दिलासा, तर उद्यापासून मोबाईल सेवा महागणार

  6. आज भारतीय नौदलात पहिली महिला पायलट रुजू होणार, दीड वर्षांच्या सरावानंतर शिवांगी स्वरुप यांची नौदल पायलट म्हणून नियुक्ती, कोच्चीत शिवांगीचं पोस्टिंग

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.