LIVE UPDATES | थेट जनतेतून संरपंचाची निवड रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jan 2020 09:15 PM
कुर्ला नेहरुनगरमध्ये चार मजली रहिवासी इमारतील एका फ्लॅटला आग, फायर ब्रिगेडचे दोन बंब आणि एक वॉटर टँकर घटनास्थळी दाखल
सोलापूर : अक्कलकोट येथील स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अन्नछत्र मंडळाच्या अध्यक्षांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अन्नछत्र मंडळाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बातमी केल्याने मारहाण केल्याचा पत्रकाराचा आरोप, जीवे मारण्याचा प्रयत्नसह अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
सरपंचांची निवड थेट जनतेतून निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मौजा पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलीस-नक्षलवादी चकमकीत 5 नक्षलवाद्यांना अटक, कुटूल नक्षल दलममधील दोन तर जनमिलिशियामधील तीन सदस्यांचा समावेश
कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी कोणालाही बोलावलं जाईल : आयोग
मालेगाव अपघात : मेशी देवळा भीषण अपघातात मालेगाव तालुक्यातील येसगावच्या एकाच मंसुरी कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली कुटुंबियांची भेट. लग्न ठरविण्यासाठी जाणारे हे सर्व होते अपे रिक्षात. बसनं दिलेल्या धडकेत, विहिरीतील पाण्यात बुडून झाला होता काल मृत्यू.
मालेगाव एसटी बस अपघातातील मृतांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे. बसचा वेग जास्त होता आणि त्यामुळे चालकाचा ताबा सुटला. परिणामी बस कठडा तोडून थेट विहिरीत पडली, अशी अपघाताबद्दल प्राथमिक माहिती मिळाल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसंच मानवी चुकांमुळे अपघात होणार असतील तर काही कठोर निर्णय करावे लागणार आहेत ते निर्णय मी घेणार आहे, असंही अनिल परब म्हणाले.
लातूर : कुलगुरूंसोबतची बैठक फिसकटली; आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची विद्यार्थ्यांची भूमिका. कृषी महाविद्यालय लातूरचे प्राचार्य ठोंबरेंच्या बदलीची मागणी फेटाळली.
नांदेडमधील सैनिकाच्या विधवा पत्नीच्या मुलांना ज्या शाळेमध्ये प्रवेश पाहिजे तिथे देणार, भाऊ म्हणून त्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, जितेंद्र आव्हाड यांची जाहीर भाषणात घोषणा
पत्रकार मुद्दामहुन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल, असं माझं बोलणं दाखवत असल्याचा आरोप कॅबीनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मेट्रो 3 प्रकल्पाच्या २५व्या भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची हजेरी
सलाईनच्या बाटलीत शेवाळ, बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, शासकीय पुरवठ्याच्या सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळल, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतमुळे हा प्रकार उघडकीस
पालघर बंदला घेऊन पालघर शहरात तणाव. बहुजन क्रांती मोर्चामार्फत भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये बंद पुकारण्यात आला होता. व्यापारी संघटना या बंदमध्ये सामील नसल्याचे म्हटले होते. याला भाजपनेही पाठिंबा दिला होता. मात्र, बंद केलेली दुकाने पुन्हा उघडण्यावरून वाद उफाळून आला. कायदा सुव्यस्था प्रश्न उपस्थित झाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात तैनात केला आहे.
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण : दोषी मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; फाशी कायम
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मालेगावमधील घटनास्थळी भेट देणार आहेत. बस आणि आपे रिक्षाच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना.
एनआरसी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी प्रजासत्ताक दिना दिवशी परळी शहरातील ईदगाह मैदानावर बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे, विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये साखळी पद्धतीने महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
मेट्रोचं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही, त्यामुळे आरेमध्येच मेट्रो कारशेडचं काम सुरु करावं अशी शिफारस 4 सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच या समितीची स्थापना केली होती. या समितीनं मुख्यमंत्र्यांना काल अहवाल सादर केला आहे.
सरकारी योजनेसाठी बिल्डर जी घरं बांधून देतील ती घरं खासगी विक्रीसाठी असणाऱ्या एकाच इमारतीत असतील. खाजगी विक्रीच्या आणि सरकारी योजनांअंतर्गत येणाऱ्या सदनिकांमध्ये बिल्डरला भेदभाव करता येणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
कांजूरमार्गमध्ये आंदोलकांचा काही काळ रेल्वे रोको, मध्य मार्गावरील वाहतूक 15 मिनिटं उशिरानं..
पुणे - कोंढवा, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ एका गोडाऊनमधे आग; अग्निशमन दलाच्या 4 फायरगाड्या घटनास्थळी दाखल. गोडाऊन फर्निचर व टर्पेंटाईनचे बॅरेल आहेत. जखमी कोणी नाही. अग्निशमन दलाच्या 4 फायरगाड्या व 2 टँकर आग विझवण्याचे काम करत आहेत.
पुणे - कोंढवा, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ एका गोडाऊनमधे आग; अग्निशमन दलाच्या 4 फायरगाड्या घटनास्थळी दाखल.
एकीकडे दिल्लीच्या शाहीन बागमध्ये महिला एनआरसी आणि सीएए विरोधात ठिय्या देऊन बसल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गेल्या तीन दिवसांपासून मुंबई सेंट्रलच्या नागपाडा भागात महिलांचे आंदोलन सुरु आहे. सलग तिसरी रात्र शेकडो महिला मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून या आंदोलनात सहभागी होत आहेत.
एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे.
कोल्हापुरात किणी टोलनाक्यावर काल (28 जानेवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस आणि राजस्थानमधील कुख्यात गुडांमध्ये चकमक झाली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गुंड जखमी झाला असून तीन गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानमधील हे कुख्यात गुंड बेळगावहून पुण्याच्या दिशेला निघाले होते. बेळगाव पोलिसही या गुंडांच्या मागावर होते. बेळगाव पोलिसांनी माहिती दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी किणी टोलनाक्यावर नाकाबंदी केली होती.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 25 वर गेला आहे तर 33 जण जखमी आहेत. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावातील जिल्हा रुग्णालयासह आजूबाजूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनं एका विहिरीत कोसळली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातात बस आणि रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


1. मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातातील मृतांचा आकडा 25 वर, तर 33 जण जखमी, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत


2. एनआरसी, सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक, तर कुठल्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा व्यापारी संघटनेचा ठराव


3. मुंबईच्या नागपाड्यात सलग चौथ्या दिवशी मुस्लिम महिलांचा ठिय्या, एनआरसीविरोधात ठराव आणण्याची असदुद्दीन ओवेसींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


4. कोरेगाव-भीमा प्रकरणात फडणवीसांना चौकशी आयोगापुढं हजर करा, संजय लाखेंचा अर्ज, तपासावरुन चंद्रकांतदादांचा सरकारला इशारा, तर प्रकाश आंबेडकरांचं भाजपला आव्हान


5. शुक्रवारपासून सलग तीन दिवस बँका बंद, वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा संप, अर्थसंकल्पाच्या दिवशीही बँका बंद राहणार


6. मॅन वर्सेस वाईल्डच्या शूटिंगदरम्य़ान सुपरस्टार रजनीकांत जखमी, कर्नाटकातल्या बांदीपूर जंगलात शूटिंग सुरु असताना दुर्घटना


एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.