LIVE UPDATE | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा उद्याच्या शपथविधीवर बहिष्कार
दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
29 Dec 2019 11:29 PM
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा उद्याच्या शपथविधीवर बहिष्कार, फसव्या कर्जमाफीचं कारण देत शपथविधीवर बहिष्कार
EXCLUSIVE : एनआरसीबद्दल ए टू झेड! केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी खास बातचीत...
गृहखातं कोणाकडे जाणार हे विस्तारानंतर कळेल : जयंत पाटील
आताचं खातं हे तात्पुरत्या स्वरुपाचं : जयंत पाटील
खातेवाटपाचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे : जयंत पाटील
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी नेत्यांची अर्धा तासापासून खलबतं सुरु, अजित पवार, प्रफुल पटेल, जयंत पाटलांसह राष्ट्रवादीचे नेते सिल्व्हर ओकवर उपस्थित
दादासाहेब फाळके पुरस्काराने अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सन्मान, राष्ट्रपतींच्या हस्ते बच्चन यांचा गौरव
कोल्हापूर : शिवसेनेने थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडला, चित्रपट गृहावरील पोस्टरही उतरवली, कर्नाटकात उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर शिवसेना आक्रमक
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल,
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणुगोपाल यांना भेटणार,
उद्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महापालिका हॉटेल्स, रेस्टॉरंट्सची झाडाझडती घेणार, अग्निसुरक्षा प्रतिबंधक उपाय आणि आवश्यक परवानग्यांचे प्रमाणपत्र तपासण्यासाठी महापालिकेची मोहिम
शरद पवार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला जाणार नाही, राज्यात उद्या मंत्रिमंडळ विस्तार आणि नियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने न जाण्याच निर्णय
जालना : शेततळ्यात बुडून दोन मुलाचा मृत्यू, अंबड तालुक्यातील दुधपुरी गावातील घटना, सिद्धेश्वर धांडे आणि शुभम पाटोळे मृत मुलांची नावे
कोल्हापूर : इचलकरंजीत 68 लाखांची वीजचोरी उघडकीस, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, जगन्नाथ लोले आणि शिवराज लोले यांच्या पावरलूम कनेक्शनची वीज जोडणी, थकबाकीमुळे बंद केलेलं कनेक्शन मीटरमध्ये तांत्रिक फेरफार करून सुरु केलेलं
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
कडाक्याच्या थंडीने राजधानीसह उत्तरेकडील सहा राज्य गोठली, दिल्लीत तापमानाचा पारा 2 अंशच्या खाली
कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बस बंद, कर्नाटकातून कोल्हापुराकडे येणाऱ्याही बस रद्द, सीमाप्रश्नावरून सुरू झालेल्या वादामुळे बस रद्द
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा...
1.दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र, जीआरमधल्या पाचव्या मुद्यामुळं सरकार टीकेचं धनी, शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
2. उद्धव ठाकरे सरकारचा उद्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष
3. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार होते, विखे पाटलांचं विधान, तर अशा वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नाही, बाळासाहेब थोरातांचं उत्तर
4. बेळगावमध्ये कर्नाटक नवनिर्माण सेनेचा उन्माद सुरुच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकृतीचं दहन, मराठी पाट्यांचीही तोडफोड
5. लखनौ पोलिसांनी गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा प्रियंका गांधींचा आरोप, पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियंका गांधी स्कुटीवरुन रवाना
6. ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवल्याप्रकरणी रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंगविरोधात बीडमध्ये गुन्हा, टीव्ही मालिकेतल्या आक्षेपार्ह विधानावर आक्षेप