LIVE BLOG | बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Dec 2019 07:41 PM
बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट
LIVE : लखनौमध्ये प्रियंका गांधी आणि स्थानिक पोलिसांमध्ये वाद, लखनौ पोलिसांनी गळा दाबून धक्काबुक्की केल्याचा प्रियंका गांधींचा गंभीर आरोप
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, कॉमेडीयन भारती सिंग आणि फिल्म मेकर फराह खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिघींच्या विरोधात बीड शहरातील शिवाजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 'बॅक बेंचर्स' या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या पवित्र ग्रंथ बायबलमधील 'हलेलूया' या पवित्र शब्दाचा अश्लिल उच्चार करुन ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. याप्रकरणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.
सलगच्या सुट्ट्यांमुळं पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी, उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा, ख्रिसमस आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी लोणावळा-मुंबईकडे निघालेल्यांची गर्दी, यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनांची लक्षणीय संख्या
डोंबिवलीत 25 हजार वडे तळण्याच्या विक्रमाला सुरुवात; शेफ सत्येंद्र जोग एकाच दिवसात तळणार 25 हजार बटाटे वडे, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार विक्रमाची नोंद.
अहमदनगर-सोलापूर रोडवर एसटी बस आणि ईनोव्हा कारचा भीषण अपघात, आंबेलवाडी शिवारात एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन अपघात, अपघातात तीन जण जागीच ठार तर तीन जण जखमी, जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात रवाना
कोल्हापुराती लक्षतीर्थ वसाहत येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर जवळच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील : मी भाजपनमध्ये आहे आणि राहणार, माझी आणि मल्लिकार्जुन खर्गेंची भेट सुद्धा झालेली नाही, माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येतात, फेक बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार
रत्नागिरी शहरातील पेठ्कील्ला येथे एका बंद असणाऱ्या फिशमिलच्या कंपाऊंड मध्ये असणाऱ्या फायबर बोटीला आग लागली आहे. नगरपालिकेचा बंब घटनास्थळी रवाना झाला असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
कळवा इथे मेडिकल मध्ये गोळीबार, गोळीबार मध्ये एकाचा मृत्यू, मेडिकल मालक प्रेमसिंग उर्फ जितेंद्र सिंग मोतिसिंग राजपुरोहित याचा मृत्यू, चोरीच्या उद्देशाने चोर मेडिकल मध्ये गेला असताना, प्रेमसिंग आत झोपला होता, त्यावेळी चोराने 2 राउंड फायर केल्या, ज्यात प्रेमसिंगचा झाला मृत्यू, कळवा पूर्व येथील वीर युवराज मेडिकल मधील घटना, कळवा पोलीस, ठाणे गुन्हे शाखा घटनास्थळी
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, पेण ते वडखळदरम्यान वाहतूक कोंडी, नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी पर्यटक कोकणात आणि गोव्याला निघाल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली
कोल्हापुरात पुन्हा आठ शेळ्यांची चोरी, जवाहरनगर येथील सुदाम पोळ यांच्या शेळ्या चोरीला, राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शेळ्या बकरी चोरीत वाढ
कोल्हापूर : अखिल भारतीय संत साहित्य परिषदेच्या आठव्या साहित्य संमेलनासा ग्रंथदिडींने सुरुवात, कोल्हापुरातील गांधी मैदानात पुढील तीन दिवस संमेलन सुरू राहणार
मुंबई मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू आहे. काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत मेट्रो रूजू होण्याआधीच मेट्रो स्थानकाच्या 'नावांचा' लिलाव होणार आहे. मुंबई मेट्रो प्रशासनाने याबाबतची निविदा काढली आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. मालमत्ता कराबाबत धोरण निश्चित होईपर्यंत 500 चौरस फुटांच्या घरमालकांना मालमत्ता करमाफ, महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा
2. 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के आयकराची शिफारस, 2020 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
3. अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, पुणे राष्ट्रवादीकडून शपथविधीसाठी आज शुभेच्छांचा कार्यक्रम
4. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये घरवापसीसाठी इच्छुक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेंसोबत बैठक केल्याची चर्चा
5. डोकं ठिकाणावर आहे का? नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, तर काँग्रेसकडून आज शांती मार्चचं आयोजन